चालू घडामोडी - ११ मार्च २०१५

·        ११ मार्च १९६६ : लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी
·        सौर ऊर्जेवर चालणारे बहुचर्चित सोलर इम्पल्स-२ अहमदाबाद येथे उतरले. इंधनाचा एक थेंबही न वापरता जगप्रवासाला निघालेल्या या विमानाबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
·        असे आहे विमान ..............
·        २३०० किलो वजन
·        ७२ मीटर पंखांची लांबी
·        १७,२४८ सौर घटांची संख्या
·        कार्बन फायबर वापरून केलेले विमान
·        एक प्रवासी क्षमता
·        १०० किमी प्रतितास कमाल वेग
·        चार लिथियम पॉलिमर बॅटरी सौर घटांद्वारे चार्ज केल्या जातात
·        रात्रीही उड्डाण करता येणे शक्य
·        अहमदाबाद व वाराणसी येथे थांबणार
·        स्वच्छ ऊर्जेचा संदेश देणार
·        कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सदाशिवराव दादोबा मंडलिक (वय ८०) यांचे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले.
·        सदाशिवराव मंडलिक यांचा अल्प परिचय
·        नाव - श्री. सदाशिवराव दादोबा मंडलिक
Sadashivrao Mandlik
·        जन्मतारीख - ७ ऑक्‍टोबर १९३४.
·        शिक्षण - बी.ए. (ऑनर्स)
·        राजकीय कारकीर्द -
·        विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व - १९५६-६०.
·        अध्यक्ष, जि. प. बांधकाम व आरोग्य समिती - १९६७-१९७२.
·        आमदार : १९७२-७८, १९८५-९०, १९९०-९५, १९९५-९८.
·        अध्यक्ष, पंचायत राज समिती - १९८८.
·        राज्यमंत्री - १९९३-९५.
·        पाटबंधारे, शिक्षण, लाभक्षेत्र विकास पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र राज्य.
·        आमदार : १९७२, १९८५, १९९०, १९९५ अशी चार वेळा आमदार म्हणून यशस्वी कारकीर्द
·        खासदार : १९९८-९९ (१२ वी लोकसभा), १९९९-२००४ (१३ वी लोकसभा), २००४ पासून (१४ वी लोकसभा), २००९ (१५ वी लोकसभा)
·        लोकसभेच्या महत्त्वाच्या ८ समित्यांचे सदस्य म्हणून कार्यरत.
·        काळम्मावाडी (दूधगंगा) प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये पुढाकार. या प्रकल्पांतर्गत दूधगंगा नदीचे पाणी वेदगंगा नदीच्या पात्रात सोडून वेदगंगा खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिलासा (२ मार्च १९९४).
·        भारतापेक्षा पाकिस्तानकडे जास्त अण्वस्त्र असल्याचा दावा इंटरॅक्‍टिव्ह इन्फोग्राफिकने केला आहे.
·        गेल्या वर्षी पाकिस्तानकडे १२० अण्वस्त्रे होती. भारतापेक्षा पाकिस्तानकडे दहा अण्वस्त्रे जास्त होती, असे इंटरॅक्‍टिव्ह इन्फोग्राफिकने म्हटले आहे.
·        शिकागो विद्यापीठात वैज्ञानिकांनी १९४५ मध्ये इंटरॅक्‍टिव्ह इन्फोग्राफिकची स्थापना केली आहे. याद्वारे अण्वस्त्रांचा इतिहास व माहिती मिळते. या संस्थेकडून जगभरातील अण्वस्त्रांची माहिती मिळण्यास मदत होते.
·        १९८७ मध्ये जगभरातील अण्वस्त्रांची माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली होती.
·        सध्या अमेरिका व रशिया या देशांकडे पाच-पाच हजार, फ्रान्स ३००, चीन २५०, ब्रिटन २२५ आणि इस्राइलजवळ ८० अण्वस्त्रे आहेत.
·        एका रिऍलिटी शोच्या कॅमिली मफॅट, अलेक्‍सिस वॅस्टीन, फ्लॉरेन्स अर्थाउड शुटिंगदरम्यान अर्जेंटिना येथे दोन हेलिकॉप्टर्सची समोरासमोर धडक बसून दहा जण ठार झाले.
·        या दहा जणांमध्ये फ्रान्सचे ऑलिंपिक विजेती जलतरणपटू कॅमिली मफॅट आणि मुष्टियोद्धा अलेक्‍सिस वॅस्टीन या दोघांसह फ्रान्सच्या आठ नागरिकांचा समावेश आहे.
·        या अपघातात प्रसिद्ध खलाशी फ्लॉरेन्स अर्थाउड आणि एएलपी टीव्ही कंपनीचे कर्मचारीही मृत्युमुखी पडले. फ्लोरेन्स या उत्तर अटलांटिक समुद्र एकटीने पार करणाऱ्या पहिल्या महिला खलाशी होत्या.
·        तब्बल नऊ सुधारणा करून महत्त्वाकांक्षी भूसंपादन विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले.
·        परंतु, लोकसभेत विधेयक मंजूर झाले असले तरी राज्यसभेत अल्पमत असल्यामुळे सरकारची तेथे खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.
·        गुगलने आपल्या ब्लॉगिंग सेवेतील अश्‍लील मजकुरावर २३ मार्चपासून लागू होणारी बंदी हटविली आहे.
·        अनेक कालावधीपासून सुरू असलेले ब्लॉग तसेच गुगलच्या ब्लॉगिंग सेवेवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे यूजर्सनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये आढळून आल्याचे गुगलने म्हटले आहे.
·        त्या पार्श्‍वभूमीवर ही बंदी मागे घेण्यात आली असून अश्‍लील साहित्याबाबतचे यापूर्वीचे धोरण कायम राहणार असल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे.
·        मेघालयमधील साउथ गारो हिल्स येथे एका हल्ल्यात चार पोलिस हुतात्मा तर दोन जण जखमी झाले.
·        अमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ऍपलने तयार केलेले घड्याळ आयवॉच जगासमोर सादर करण्यात आलं.
·        ही आयवॉच आपण दिवसभरात किती चाललो, किती सायकल चालविली, एकाच ठिकाणी बसून किती वेळ काम केलं, आपल्या शरीरात किती कॅलरीज आहेत, किती आवश्‍यक आहेत आदी महत्वाच्या बाबी सांगणार आहे.
·        या आयवॉचमध्ये आपल्या हृदयाची धडधड आपल्या मित्र-मैत्रिणीला ऐकविण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
·        इसीस या दहशतवादी संघटनेचे फेसबुक आणि ट्‌विटर खाते बंद केल्यानंतर त्यांनी स्वत:चीच सोशल नेटवर्किंग साईट सुरु केली आहे.
·        5elafabook.com या नावाने ही साईट सुरु करण्यात आली आहे. या साईटच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांबाबतचे संदेश तसेच संघटनेमध्ये सदस्यांची भरती करण्यात येत आहे.
·        महेंद्रसिंह भट्टी हत्याप्रकरणी उत्तर प्रदेशतातील वादग्रस्त नेते डी. पी. यादव आणि इतर तीन जणांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
·        पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरुद्ध न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
·        लाल मशिदचे गाझी अब्दुल रशीद यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुर्शरफ एकदाही सुनावणीला उपस्थित न राहिल्याने अटक वॉरंट काढण्यात आले आहे.
·        राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्येने डॉ.मिसा भारती यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील इंडिया कॉन्फरन्समध्ये भाषण दिल्याचे फोटो आणि सोबत पत्रक सोशल मिडियावर अपलोड केले होते.
·        या पार्श्‍वभूमीवर हार्वर्ड विद्यापीठाने डॉ.भारती यांना इंडिया कॉन्फरन्समध्ये व्याख्याता म्हणून निमंत्रित करण्यात आले नसल्याचे पत्रक काढून स्पष्ट केले आहे. त्यामुळे लालूच्या कन्येचा बनावटपणा उघड झाला आहे.
·        आपल्या आकाशगंगेभोवती (मिल्की वे) परिभ्रमण करणाऱ्या तब्बल नऊ लघू आकाशगंगांचा शोध खगोलशास्त्रज्ञांना लागला आहे.
·        ही माहिती ‘ऍस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
·        लघू आकाराच्या या आकाशगंगांमध्ये प्रत्येकी साधारण काही अब्ज तारे आहेत. याउलट आपल्या आकाशगंगेत शेकडो अब्ज तारे आहेत.
·        तसेच या लघू आकाशगंगा ‘मिल्की वे’हून काही अब्जपट अंधूक आणि काही लक्षपट कमी वस्तुमानाच्या आहेत.
·        या नवीन नऊ आकाशगंगांपैकी सर्वांत जवळची आकाशगंगा ही ‘मिल्की वे’पेक्षा एक लाख प्रकाशवर्षे दूर आहे, तर सर्वांत दूरची आकाशगंगा १० लाख प्रकाशवर्षांपेक्षा दूर आहे.
·        वेस्ट इंडीजचे महान फलंदाज व्हिवियन रिचर्डस यांची सर्वकालीन सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
·        ‘ईएसपीएन’ क्रीडा वाहिनीच्या ‘क्रिकेट मंथली’ मासिकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारात रिचर्डस यांनी भारताच्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले.
·        या पुरस्कारासाठी रिचर्डस यांच्यासह सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, वसिम अक्रम, ऍडम गिलख्रिस्ट या पाच खेळाडूंना नामांकने मिळाली होती.
·        एकदिवसीय सर्वोत्तम संघ : ऍडम गिलख्रिस्ट, सचिन तेंडुलकर, रिकी पॉंटिंग, व्हिव रिचर्डस, जॅक्‍स कॅलिस, महेंद्रसिंह धोनी, सनथ जयसूर्या, कपिलदेव, वसिम अक्रम, शेन वॉर्न आणि ज्योएल गार्नर.
·        इसीस या दहशतवादी संघटनेने इस्रायली गुप्तचर असल्याचा आरोप ठेवत मोहम्मद मुसल्लम या किशोरवयीन तरुणाची लहान मुलाने हत्या केल्याचा व्हिडिओ प्रकाशित केला आहे.
·        संघटनेच्या एका मिडिया आऊटलेटवर हा व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला आहे.
                           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा