चालू घडामोडी - १२ मार्च २०१५

·        १२ मार्च  १९१३ : यशवंतराव चव्हाण जन्मदिन.
·        तीन देशांच्या आपल्या दौऱ्यातील पहिल्या टप्प्यांतर्गत मंगळवारी रात्री रेंद्र मोदी सेशल्स येथे पोहचले.
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशल्सच्या नागरिकांना तीन महिन्यांसाठी मोफत व्हिसा आणि व्हिसा ऑन अरायव्हलची घोषणा केली. तसेच मोदींनी सेशल्समधील नव्या रडार सिस्टिमचे उद्‌घाटन केले.
·        भारत आणि सेशल्सNarendra Modi's meet Seychelles President James Michel या दोन्ही देशांनी चार करारांवर सह्या केल्या. या करारांमध्ये हायड्रोग्राफमध्ये (जलस्थिती) सहकार्य, ऊर्जानिर्मिती, संयुक्तपणे जलवाहतूक मार्ग विकसित करणे, अन्य देशांना विकण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक जलवाहतूक मार्ग तयार करणे आणि पायाभूत विकासाचा समावेश आहे.
·        सेशल्सचे राष्ट्रपती - जेम्स मायकेल
·        लोकप्रिय सर्चइंजिन गुगलने लंडनमध्ये आपले पहिलेच स्टोअर उघडले आहे. या शॉपमध्ये ग्राहकांसाठी अनेक आकर्षणे ठेवण्यात आली आहेत. गुगल अशा प्रकारची आणखी दोन स्टोअर लवकरच उघडणार आहे.
·        या स्टोअरबद्दल -
·        गुगल स्टोअरला क्रोमेझोन असे नाव.
·        व्हर्च्युअल स्पेस कॅम्पस द्वारे शालेय विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंग शिकविली जाणार आहे.
·        ऍड्रॉइड डिव्हाइस, ऍड्रॉइड ऍप्स, क्रोमबुक लॅपटॉप्स आणि अन्य उत्पादने हाताळणारा आणि वापरण्याला गुगलचा विशेष प्रशिक्षित कर्मचारीवर्ग.
·        ओपन होऊस इव्हंटस्‌ मध्ये शिक्षकांसाठी विविध प्रकारचे प्रभावी शैक्षणिक टूल्स असतील.
·        परस्परांशी कनेक्‍ट असलेल्या मोठ्या आकाराच्या स्क्रिनद्वारे (पोर्टल) ग्राहकांना गुगल अर्थ पाहता येऊ शकेल.
·        क्रोमेझोनमध्ये डुडल वॉल असेल. त्यावर विविध कृत्रिम स्प्रेच्या सहाय्याने ग्राहकांना गुगल डुडल तयार करता येऊ शकेल. तसेच तयार केलेले डुडल जीआयएफ फॉरमॅटमध्ये सेव्ह करता येईल.
·        एका पॉडद्वारे ग्राहकांना गुगल प्ले तसेच युट्युबला भेट देता येईल.
·        गुगलने तयार केलेली अत्याधुनिक आणि नवी उत्पादने येथे क्रोमोझोनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील.
·        भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) रेल्वेत आगामी पाच वर्षांत १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत दिली.
·        मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयकावर राज्यसभेने आज आवाजी मतदानाने मंजुरीची मोहोर उमटविली. या विधेयकावरील अध्यादेशाची मुदत संपण्याआधीच ते मंजूर झाले आहे.
·        नवा कायदा १९८८ च्या मूळ कायद्यात मोठ्या दुरुस्त्या करणारा आहे.
·        हा कायदा झाल्याने दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षांचा मार्ग मोकळा होणार आहे. मध्यंतरी न्यायालयाने दिल्लीत या रिक्षांवर बंदी आणली होती, त्यामुळे सरकारला अध्यादेश आणण्याचा मार्ग स्वीकारावा लागला.
·        रस्ते व महामार्ग विकास मंत्रालय केंद्रीय मंत्री - नितीन गडकरी
·        विरोधी भाजपने केलेल्या सभात्यागामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहार विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव सहज जिंकला. १४० विरुद्ध शून्य मतांनी हा ठराव संमत झाला.
·        १४० सदस्यांमध्ये जेडीयूचे १०९, राजदचे २४, कॉंग्रेसचे आणि भाकप व अपक्ष प्रत्येकी १, अशा १४० सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याचे विधानसभाध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी जाहीर केले.
·        विधानसभेत एकूण २३३ सदस्य असून, दहा जागा सध्या रिक्त आहेत. तसेच भाजपचे सभागृहात ८७ सदस्य असून, त्यांनी आवाजी मतदान आणि मतविभागणीत भाग घेतला नाही.
·        देशातील बहुचर्चित कोळसा खाणवाटप गैरव्यहार (कोलगेट) प्रकरणी विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या विरोधात समन्स जारी केले.
·        सिंग यांच्या बरोबर उद्योजक कुमार मंगलम बिर्ला, कोळसा मंत्रालयाचे तत्कालिन सचिव पी. सी. परख आणि हिंदाल्को समूहाच्या तीन अधिकाऱ्यांविरोधातही समन्स जारी केले.
·        त्यामुळे आता याप्रकरणात मनमोहनसिंग यांना आरोपी म्हणून एप्रिल रोजी न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
·        आम आदमी पक्षातील नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला.
·        विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्धShivajirao Deshmukh अविश्‍वास ठराव मांडण्यास सभागृहाने बुधवारी संमती दिली. हा ठराव मांडण्यासाठी परवानगी मागण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने २४ सदस्य (सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस) उभे राहिल्यानंतर उपसभापती वसंत डावखरे यांनी त्याला अनुमती देण्यात येत असल्याचे सांगितले.
·        नियमानुसार १० सदस्य अशा अनुमतीसाठी उभे राहणे आवश्‍यक आहे. त्यापेक्षा अधिक सदस्य उभे राहिल्याचे नमूद करून ठराव मांडण्यासाठी परवानगी मिळाल्याचे उपसभापतींनी घोषित केले.
·        अविश्‍वास ठरावावरील चर्चा अशा अनुमतीनंतर सात दिवसांत झाली पाहिजे, अशी वैधानिक तरतूद आहे. त्यामुळे चर्चेचा दिवस निश्‍चित करण्यासाठी सर्व पक्षांच्या सदस्यांची बैठक घेण्यात येईल, असे उपसभापती म्हणाले.
·        विधान परिषदेची सदस्यसंख्या ७८ आहे. अविश्‍वास ठराव मंजूर होण्यासाठी ४० सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणे आवश्‍यक आहे, असेही उपसभापतींनी स्पष्ट केले.
·        राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरसिंह पंडित आणि त्याच पक्षाच्या अन्य १९ सदस्यांनी सभापतींविरुद्ध आणलेल्या प्रस्तावात “महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय सभापतींनी सभागृहाचा विश्‍वास गमावला असल्याने त्यांना सभापतिपदावरून दूर करण्यात यावे” असे म्हटले आहे.
·        विधान परिषदेच्या सभापतींविरुद्ध अविश्‍वास ठराव मांडला जाण्याचा विधान परिषदेच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे.
·        कोळसा व खाण-खनिजविषयक वादग्रस्त विधेयकांवरील राज्यसभेच्या दोन निवड समित्यांतील सदस्यांची नावे निश्‍चित करण्यात आली. .
·        प्रत्येकी १९ सदस्यांच्या या समित्या विधेयकांची छाननी करून आगामी आठवडाभरात, म्हणजे येत्या १८ मार्चपर्यंत अहवाल देतील.
·        श्रीलंकेच्या समुद्रात शिकार करत असल्याचा आरोप असलेल्या श्रीलंकेच्या ताब्यातील ८६ भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
·        भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका भेटीच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
·        १९८७ साली तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी द्विपक्षीय भेटीसाठी श्रीलंकेला गेले होते. त्यानंतर प्रथमच भारताचे पंतप्रधान श्रीलंकेच्या दौऱ्यावर जात आहेत.

1 टिप्पणी: