चालू घडामोडी - १५ मार्च २०१५

·        १५ मार्च : आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन / नियोजन दिन / जागतिक अपंगत्व दिन
·        श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाफना शहराला भेट दिली.
·        अंतर्गत यादवीमुळे कोलमडलेल्या या तमीळबहुल शहराला भेट देणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यानंतर दुसरे आंतरराष्ट्रीय नेते ठरले आहेत.
·        अनुराधापूर येथील महाबोधी वृक्षाचे दर्शन घेऊन मोदी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने जाफना येथे आले. कोलंबोपासून हे शहर ४०० किलोमीटरवर आहे.
·        भूसंपादन विधेयकाच्या विरोधात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटणा येथे २४ तासांचे उपोषण सुरू केले. त्यांच्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारीही उपोषणाला बसले आहेत.
·        हरियाणा सरकारने कोणत्याही स्वरूपातील गोमांस विकण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
·        गायींची कत्तल करणाऱ्यास आणि गोमांसाची विक्री करणाऱ्यास दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
·        मात्र, गायींची कत्तल करणे हे खुनाच्या आरोपाखाली मानण्याचे फेटाळून लावण्यात आले आहे.
·        काही प्रसारमाध्यमांनी यापुढे गायींची कत्तल करणे हे खुनाच्या आरोपासारखेच मानले जाईल अशी बातमी दाखविली आहे परंतु ही माहिती चुकीची आहे.
·        म्यानमारमध्ये खराब हवामानामुळे २०९ प्रवाश्‍यांना घेऊन जाणारी नाव बुडाल्याने किमान ५० जणांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
·        मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यताही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
·        मालदीवचे माजीMohammad Nasheed अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते महंमद नशीद यांना दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत दोषी ठरवत १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
·        नशीद यांनी अध्यक्ष असताना एका वरिष्ठ न्यायाधीशाला अटक करण्याच्या आदेशावरून त्यांच्यावर हा खटला सुरू होता. त्यामुळे त्यांना या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे.
·        त्यांना माले जवळील धुनिधो येथील कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
·        २० मार्च रोजी अंटार्क्‍टिकावरून दिसणाऱ्या दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहणासाठी नॉर्वेतील स्वालबार्ड या बेटावर पर्यटकांनी मोठी गर्दी करण्यास सुरवात केली आहे.
·        खग्रास सूर्यग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार असून, त्याची सावली पृथ्वीवर पडणार आहे. हे खग्रास केवळ स्वालबार्ड आणि फॅरोई या बेटांवरून दिसणार आहे.
·        डेन्मार्कच्या ताब्यात असलेल्या स्वयंशासित फॅरोई बेटावर हे ग्रहण दिसणार असल्याने येथे हजार पर्यटक भेट देण्याची शक्‍यता आहे.
·        उत्तर आफ्रिका, युरोप आणि उत्तर आशियाच्या काही भागात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. या ग्रहणात चंद्र सूर्याचा ८४ टक्के भाग झाकणार आहे.
·        ब्रिटिश संसदेसमोरील पार्लमेंट स्क्वेअर येथे महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक पुतळ्याचे अनावरण ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन आणि भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते करण्यात आले.
·        ब्रिटिश संसदेसमोर अनेक मान्यवरांचे पुतळे आहेत. वर्णभेदविरोधी लढ्याचे नेते नेल्सन मंडेला मंडेलांच्या पुतळ्याच्या शेजारीच महात्मा गांधी यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
·        मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्करे तैयबाचा दहशतवादी झकीउर रहमान लख्वी याला पुन्हा एकदा सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली पाकिस्तान सरकारने ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
·        यामुळे त्याला आणखी महिनाभर तुरुंगातच राहावे लागणार आहे.
·        ६ मार्च २०१५ पासून १ रुपयाची नोटOne Rupee Note पुन्हा चलनात आली आहे.
·        सुती कापडाचा वापर करून ही नोट तयार करण्यात आली आहे.
·        नोटेचा रंग गुलाबी-हिरवा असून जाडी ११० मायक्रॉन आहे.
·        केंद्रीय वित्त सचिव राजीव महर्षी यांनी नाथद्वारा (राजस्थान) येथील श्रीनाथजी मंदिरात या नोटेचे अनावरण केले.
·        सरकारने १९९४ मध्ये सरकारने १ रुपयाच्या नोटेची व १९९५ मध्ये २ व ५ रुपयाच्या नोटेची छपाई थांबवली होती.
·        कर्नाटक संघाने तामिळनाडूचा पराभव करून यंदाचा रणजी करंडक जिंकला आहे.
·        कर्नाटक संघाचा कर्णधार करूण नायर हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
·        कर्नाटकचे हे ८ वे विजेतेपद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा