चालू घडामोडी - १ व २ मार्च २०१५

·          १ मार्च १९९४- महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव दादा पाटील यांचे निधन

·          भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन प्रिमीअर लिगच्या (आयपीएल) स्पर्धेच्या अमेरिकेतील प्रसारणासाठीचे हक्क इएसपीएनकडे दिले आहेत. यासाठी कोटी २४ लाख डॉलरचा व्यवहार झाला आहे.

·          भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची मार्केटिंग समितीसोबत आज चेन्नईमध्ये बैठक झाल्यानंतर पेप्सी आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क २०१५ ते २०१७ या तीन वर्षांकरिता इएसपीएनला बहाल करण्यात आले आहेत.

·          लिलावाद्वारे करण्यात आलेल्या या निवडीसाठी तीन जणांचे प्रस्ताव आले होते. त्यामध्ये मे.विलो, टाईम्स इंटरनेट आणि इएसपीएन यांचा समावेश होता.

·          पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीचे (पीडीपी) ज्येष्ठ नेते मुफ्ती महम्मद सईद दुसऱ्यांदा जम्मू काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत.

·          सईद हे मूळ काश्‍मिरी. त्यांचा जन्म अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा गावात १२ जानेवारी १९३६ रोजी झाला. श्रीनगर आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले असून, व्यवसायाने ते वकील आहेत.

·          १९६२मध्ये ते आमदार बनले. १९८६ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात पर्यटनमंत्रीही होते. पुढे कॉंग्रेसच्या सहकार्याने २००२ मध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री बनले.

·          त्यांची मुलगी मेहबूबा मुफ्ती यांनी १९९९ मध्येपीडीपीची स्थापना केली. तेव्हापासून ते या पक्षाचे मार्गदर्शक आहेत.

·          सार्क यात्रेवर गेलेले परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सहकार्याबाबत भूतान सरकारबरोबर चर्चा केली. भूतानचे पंतप्रधान त्सेरिंग तोग्बे यांची जयशंकर यांनी भेट घेतली.

·          दिल्ली सरकारच्या हंगामी मुख्य सचिवपदी एस. एन. सहाय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डी. एम. स्पोलिआ हे वरिष्ठ अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी वरिष्ठ आयएएस अधिकारी असलेले सहाय यांची नियुक्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

·          गुजरात कॉंग्रेस अध्यक्षपदी आज माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आली. लोकसभेत पराभवाला सामोरे गेल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष अर्जुन मोधवादिआ यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिकामी होती.

·          बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिला स्वाइन फ्लू रोगाची लागण झाल्यामुळे सोनमला तातडीने राजकोटहून मुंबईला उपचारासाठी आणण्यात आले आहे.

·          सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादक कंपन्यांनी आज इंधनाच्या दरात वाढ केली. पेट्रोलच्या दरात ३.१८ रुपयांनी, तर डिझेलच्या दरात ३.०९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

·          जम्मू-काश्‍मीरचे शेवटचे राजे हरिसिंह यांचे अत्यंत निकटच्या सुरक्षा रक्षकाचा मुलगा असलेले भाजप नेते निर्मलसिंह यांनी जम्मू काश्मीर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

·          निर्मलसिंह यांनी राज्यात भाजप रुजविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. गेल्या २५ वर्षांपासून विविध निवडणुका लढविल्या असल्या, तरी यंदा प्रथमच ते निवडून आले आहेत.

·          राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक असलेल्या निर्मलसिंह यांनी जम्मू विद्यापीठातून इतिहास विषयात पीएच.डी. मिळविली आहे. याच विद्यापीठात त्यांनी अध्यापनही केले. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात ते राजकारणात आले.

·          अमेरिकेतील भारताचे राजदूत एस. जयशंकर यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याजागी आता अरुण सिंह यांची निवड करण्यात आली आहे.

·          अरुण सिंह हे आयएफएस अधिकारी आहेत. अरुण सिंह अमेरिकेतील राजदूत होणार असल्याने, बहारिनमधील भारताचे राजदूत असलेले मोहनकुमार हे आता अरुणसिंह यांची जागा घेतील.

·          फरिदाबाद येथे जगातील सर्वांत मोठा ध्वजस्तंभ उभारला जाणार असून, त्याची उंची तब्बल २४० फूट एवढी असेल. हा भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वांत उंच ध्वजस्तंभ असेल.

·          शहराच्या मध्यभागी असलेल्या सार्वजनिक उद्यानामध्ये हा ध्वजस्तंभ उभारला जाणार असून, मार्च रोजी या ठिकाणी ध्वजवंदन केले जाणार आहे.

·          गुजरातच्या गीर अभयारण्यातील आशियाई सिंहांच्या बचावासाठी आता इंग्लंडमधील झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनने पुढाकार घेतला आहे.

·          जंगलातील सिंहांची हालचाल आणि त्यांच्या संख्येची नोंद ठेवण्यासाठी अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार असून, यासाठी गुजरात सरकारचा वनविभाग आणि झूलॉजिकल सोसायटीमध्ये सामंजस्य करार झाला आहे.

·          लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या झकी-उर-रहमान लख्वी हा पाकिस्तान मधील रावळपिंडी येथील प्रसिद्ध अदियाला तुरुंगामध्ये ठेवण्यात आले आहे.

·          मात्र, त्याला तुरुंगामध्ये इंटरनेट, मोबाईल फोनसह इतर सुविधा पुरविण्यात आल्या असून; त्याला भेटायला येणाऱ्या ‘पाहुण्यां’वरही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत.

·          यामुळे देशामध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली जात असल्याच्या पाकच्या दाव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

·          भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी (बीसीसीआय) जगमोहन दालमिया यांची बिनविरोध निवड झाली. सी. के. खन्ना यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

·          तर, हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची सचिवपदी आणि खजिनदारपदी अनिरुद्ध चौधरी यांची वर्णी लागली आहे.

·          उत्तर कोरियाने त्यांच्या पूर्व किनाऱ्यावर कमी टप्प्याच्या दोन क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतल्याचे, दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले.

·          संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर घातलेली बंदी झुगारून देत त्यांनी या चाचण्या घेतल्या आहेत.

·          उत्तर कोरियाने घेतलेली हा चाचणी असामान्य आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे लष्कर संयुक्तिक सराव करत असताना या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आली.

·          अखिल भारतीय पेट्रोलियम वितरक संघटनेने २१ मार्चला १५ मिनिटांचा ब्लॅकआऊट घोषित केला आहे. यादरम्यान पेट्रोल पंपावरील सर्व दिवे बंद करण्यात येतील तसेच त्यादरम्यान पेट्रोलची विक्री बंद राहणार आहे.

·          पेट्रोलियम वितरकांना वेळोवेळी तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांविषयी जागरूकता पसरवण्यासाठी हा ब्लॅकआऊट घोषित करण्यात आला आहे.

·          उत्तर प्रदेशात ६१४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

·          द इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड द लिव्हंट (इसिल) या दहशतवादी संघटनेने गेल्या आठवड्यात अपहरण केलेल्या २२० ख्रिश्‍चन नागरिकांपैकी १९ जणांची सुटका केली आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा