चालू घडामोडी - १७ व १८ मार्च २०१५

GudiPadva Marathi New Year
·        १८८२ : मराठी भाषेचे शिवाजीविष्णूशास्त्री चिपळूणकर पुण्यतिथी.
·        महाराष्ट्रासह देशभरातील ६२ टोल नाके बंद करण्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली.
·        यामध्ये विदर्भातील ४ टोलनाक्यांचा समावेश आहे.
·        किदांबी श्रीकांतने स्विस ओपन ग्रा. प्रि. गोल्डKidambi Srikant स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.
·        त्याने या स्पर्धेच्या निर्णायक लढतीत गतविजेत्या व्हिक्‍टर ऍक्‍सेलेसन याला तीन गेमच्या लढतीत हरविले.
·        जागतिक क्रमवारीत चौथा असलेल्या श्रीकांतचे वर्षातील हे पहिले विजेतेपद आहे.
·        त्याच्या कारकीर्दीमधील  हे त्याचे दुसरे विजेतेपद. त्याने २०१३ मध्ये थायलंड ओपन जिंकली होती.
·        ३१ मार्च २०१५ पूर्वी संचालक मंडळावर किमान एकही महिला नसलेल्या कंपन्यांविरुद्ध सेबी आवश्‍यक ती कारवाई करणार आहे.
·        संचालक मंडळाच्या निवडीदरम्यान केंद्रीय मनुष्यबळ संसाधन मंत्रालयाशी मतभेद निर्माण झाल्याने अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या (आयआयटी) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
·        देशातील वाघांच्या संख्येत ३० टक्‍क्‍यांची वाढ झाली असून वाघांची संख्या २२२६ वर पोचल्याची माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
·        एप्रिलपासून रेल्वे आरक्षण कालावधी वाढवण्यात आला असून ६० दिवसांऐवजी १२० दिवस अगोदर तिकीट आरक्षित करता येणार आहे. यामुळे दलाली टाळण्यास मदत मिळणार असून प्रत्यक्ष प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
·        लाहोरमध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर क्रीडा क्षेत्रातील पाकिस्तानच्या प्रतिमेला आणखी धक्का लागला आहे.
·        २०१८ मधील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीमधील लाहोर येथे होणारा सामना फिफाने तात्पुरता रद्द केला आहे.
·        मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या हल्ल्यात लष्करे तैयबाचा म्होरक्‍या झकीउर रहमान लख्वी याचा सहभाग असल्याचा ‘विश्‍वसनीय पुरावा’ अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे.
·        हे पुरावे डेविड हेडलीच्या चौकशीतून मिळाले आहेत.
·        जमीन आणि वाळू माफियांवर जोरदार कारवाई केल्याने नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरलेले आयएएस अधिकारी डी. के. रवी यांचा मृतदेह बंगळूर येथे त्यांच्या घरी संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
·        रवी यांनी आत्महत्या केली असल्याबाबत संशय व्यक्त होत आहे.
·        पंजाबमधील घुमान (जि. गुरदासपूर) येथे तीन ते पाच एप्रिलदरम्यान होणाऱ्या नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा संपूर्ण खर्च उचलण्याबरोबरच त्यास ‘स्टेट फंक्‍शन’ म्हणून विशेष दर्जा देण्यात येईल व त्यासाठीच्या सर्व सोयीसुविधा राज्य सरकारतर्फे पुरविण्यात येतील, असे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एका पत्राद्वारे कळविले आहे.
·        मायक्रोसॉफ्ट या लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टीमने मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या दहाव्या व्हर्जनमध्ये ‘हॅलो विंडोज’ नावाची फेस रिकगनेशन सुविधा देण्याची घोषणा केली.
·        फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटने मेसेंजरच्या सहाय्याने लवकरच पैसे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
·        या सुविधेद्वारे क्रेडिट कार्ड आणि बॅंक खात्याच्या सहाय्याने स्मार्टफोनच्या माध्यमातून फेसबुक फ्रेंडच्या खात्यात पैसे पाठविता येणार आहेत.
·        भारतीय महिलांनी दुसऱ्या टप्प्यातील वर्ल्ड हॉकी लीगचे विजेतेपद पटकाविले.
·        मेजर ध्यानचंद मैदानावर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत भारताने पोलंडचा ३-१ असा पराभव केला.
·        या विजेतेपदाने भारताने वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
·        देशाची प्रमुख सॉफ्टवेयर कंपनी विप्रो लिमिटेडने आबिद अली नीमचवाला यांची समूह अध्यक्ष आणि कंपनीचे मुख्य संचालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
·        याआधी आबिद टाटा कंसल्टेंसी सर्विसेस (टीसीएस) च्या वैश्विक बिजनेस प्रोसेस सर्विसेस विभागाचे प्रमुख होते.
·        क्रेडिट रेटिंग इनफॉर्मेशन सर्विसेस इंडिया लिमिटेड (क्रिसिल) ने १६ मार्च २०१५ रोजी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून आशु सुयश यांची नियुक्ती केली.
·        स्वादुपिंडाच्या कॅन्सरबाबत बहुमोल संशोधनासाठीMinoti Apate ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक मिनोती आपटे यांना २०१५ वर्षासाठीच्या ‘न्यू साऊथ वेल्स वुमन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
·        स्वादुपिंडाचा कॅन्सर वेगाने का पसरतो व त्याची तीव्रता अधिक का असते, याविषयी वैद्यकीय परिमाणाची आखणी केल्याबद्दल आपटे यांचा या पुरस्काराने गौरव झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा