प्रश्नसंच १४६ - मराठी व्याकरण

MT Quiz
[प्र.१] अं, अः यांना व्याकरणात काय म्हंटले जाते?
१] स्वरान्त
२] स्वर
३] स्वरादी
४] विजातीय स्वर


३] स्वरादी
----------------
[प्र.२] ‘गिरीश’ या जोडशब्दातील अचूक पोटशब्द कोणते?
१] गिरी + ईश
२] गिरी + इश
३] गीरी + इश
४] गिरि + ईश


४] गिरि + ईश
----------------
[प्र.३] खालील वाक्याचा वाक्य प्रकार सांगा.
“आता तुम्ही बाहेर जा”
१] गौण वाक्य
२] शुध्द वाक्य
३] मिश्र वाक्य
४] संयुक्त वाक्य


२] शुध्द वाक्य
----------------
[प्र.४] ‘आज मी मंत्रालय पाहिले.’ वरील वाक्याचा प्रयोग ओळखा.
१] कर्तरी प्रयोग
२] कर्मणी प्रयोग
३] भावे प्रयोग
४] अकर्तुक भावे प्रयोग


२] कर्मणी प्रयोग
----------------
[प्र.५] कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद ................ असते.
१] सकर्मक क्रियापद
२] अकर्मक क्रियापद
३] द्विकर्मक क्रियापद
४] उभयविध क्रियापद


२] अकर्मक क्रियापद
----------------
[प्र.६] पर्यायी उत्तरामधील चुकीचा शब्द ओळखा.
१] चपला
२] वसुंधरा
३] बिजली
४] सौदामिनी


२] वसुंधरा
----------------
[प्र.७] ‘गुरुजी म्हणाले, की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
१] केवलवाक्य
२] मिश्रवाक्य
३] संयुक्त वाक्य
४] प्रधानवाक्य


२] मिश्रवाक्य
----------------
[प्र.८] पुढीलपैकी कोणत्या शब्दात प्रत्यय नाही?
१] इमानदार
२] घरदार
३] जोरदार
४] खासदार


२] घरदार
----------------
[प्र.९] नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?
१] विकारी
२] अविकारी
३] एकवचनी
४] अनेकवचनी


१] विकारी
----------------
[प्र.१०] खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.
१] अध्यात्मिक
२] अध्यात्मीक
३] आध्यात्मिक
४] आध्यात्मीक


३] आध्यात्मिक
----------------

५ टिप्पण्या:

  1. उत्तर दाखवत नाही.
    किती वेळा क्लिक केलं तरी. एकतर सर्वात शेवटी स्वतंत्र् उत्तर द्यावित नाहीतर त्या प्रश्नाख़ाली उत्तर द्यावे.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. मी प्रश्नसंच 146 मराठी व्यकरण सोडवला आहे, पण मला त्याआधीचे प्रश्नसंच सोडवायचे आहेत ते आपल्या वेबसाईट वर कुठे दिसुन येत नाही

    उत्तर द्याहटवा
  3. उत्तरसाठी ऑप्शन वर क्लिक करता यायला पाहिजे म्हणजे आपल्याला क्लिक केल्यानंतर उत्तर दिसेल. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा