चालू घडामोडी - ९ मार्च २०१५

·        ९ मार्च १६५० : संत तुकाराम पुण्यतिथी.
·        ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत स्पेनची जागतिक विजेती कॅरोलिना मरिन मार्टिन हिने सायना नेहवालला पराभूत केले.
·        ६२ मिनिटे चाललेल्या लढतीत साईनास २१-१६, १४-२१, ७-२१ अशा पराभवास सामोरे जावे लागले.
·        ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी सायना नेहवाल पहिली भारतीय महिला ठरली.
·        तसेच हि स्पर्धा जिंकणारी कॅरोलिना मरिन मार्टिन हि पहिली स्पॅनिश महिला ठरली.
·        ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेबद्दल .......
·        जगातील सर्वात जुनी व मानाची बॅडमिंटन स्पर्धा
·        १८९८ पासून सुरुवात व तेव्हापासून दरवर्षी आयोजित केली जाते.
·        सुरुवातील फक्त तीन प्रकारांमध्ये हि स्पर्धा खेळवली जात. १. पुरुष दुहेरी २. महिला दुहेरी ३. मिश्र दुहेरी
·        १९०० पासून पुरुष व महिला एकेरी स्पर्धेला सुरुवात झाली.
·        एकेरी पुरुष गटात प्रकाश पदुकोन (१९८०) पी. गोपीचंद (२००१) या भारतीयांनी हि स्पर्धा जिंकली आहे.
·        हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनी (८ मार्च) ‘आपकी बेटी हमारी बेटी’ योजना राज्यात सुरु केली.
·        ‘आपकी बेटी हमारी बेटी’ योजनेची वैशिष्ट्ये
·        हरियाणातील लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार.
·        शहरी व ग्रामीण दोन्ही
Manohar Lal Khattar
भागांमध्ये हि योजना राबविण्यात येईल.
·        या योजनेमध्ये अनुसूचित जाती आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात २२ जानेवारी २०१५ नंतर जन्मलेल्या पहिल्या मुलीचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व मुलींना २१,००० रु. दिले जातील.
·        तसेच जुळ्या मुली अथवा एकापेक्षा जास्त मुली जन्मलेल्या कुटुंबात प्रत्येक मुलीला २१,००० रुपये देण्यात येतील.
·        या योजनेबरोबरच हरियाणा सरकारने कन्या कल्याण व विकासासाठी ‘हरियाणा कन्या कोश’ देखील सुरु केला आहे.
·        पाकिस्तानने अण्वस्त्रवाहू शाहीन या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
·        या क्षेपणास्त्राचा पल्ला २,७५० किलोमीटर इतका आहे.
·        शाहीन ३ पाकिस्तानच्या ताफ्यातील मध्यम पल्ल्याच्या घोरी ३ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची जागा घेणार आहे.
·        ९ मार्च २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोटाव्हायरस विरुद्धच्या भारतीय बनावटीच्या रोटावॅक या लसीचे उद्घाटन केले.
·        भारताने अमेरिकेच्या सहाय्याने रोटावॅक या लसीची निर्मिती केली आहे.
·        अतिसार (डायरिया) आणि पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) यामुळे बालकांचे बळी घेणाऱ्या ‘रोटाव्हायरस’ला रोटावॅकच्या माध्यमातून आळा घालणे शक्‍य होणार आहे.
·        स्पेक्‍ट्रम लिलावासाठी सरकारला विक्रमी प्रतिसाद मिळाला असून, टू जी आणि थ्री जी स्पेक्‍ट्रमसाठी अपेक्षित उद्दिष्टापेक्षा दूरसंचार कंपन्यांनी जास्त बोली लावली आहे.
·        आतापर्यंत स्पेक्‍ट्रमसाठी ८६ हजार कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे.
·        नागालॅंडच्या दिमापूर शहरात बलात्कार प्रकरणातील आरोपीची संतप्त जमावाकडून हत्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अफवा पसरविण्यात येत असल्याने, पोलिसांनी इंटरनेट व एसएमएस सेवेवर बंदी घातली आहे.
·        या प्रकरणी आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे.
·        बोको हराम या दहशतवादी संघटनेविरोधात चाड व नायजर या देशांनी मोठी कारवाई सुरु केली आहे.
·        ईशान्य नायजेरियाच्या भागामध्ये बोको हरामविरुद्ध या दोन देशांनी हवाई हल्ले सुरु केले आहेत.
·        याचबरोबर या दोन देशांनी नायजेरियाच्या हद्दीमध्ये कारवाई करण्यासाठी सैन्याच्या तुकड्याही घुसविल्या आहेत. हे ठिकाण कॅमेरुन देशाच्या सीमारेषेपासूनही जवळच आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा