प्रश्नसंच १२८ - राज्यघटना

[प्र.१] ९७व्या घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्थांबाबतच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या सातव्या भागात करण्यात आलेल्या आहेत कारण .........?
MT Quiz
१] हा भाग पूर्वी रद्द करण्यात आला होता.
२] हा भाग नव्याने समावेश करण्यात आला.
३] या भागातील कलम २४३चे पुनरुज्जीवन करण्यात आले.
४] या भागात कलम २४२ नव्याने समाविष्ट करण्यात आले.


४] या भागात कलम २४२ नव्याने समाविष्ट करण्यात आले.
----------------
[प्र.२] नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या बाबतीत कोणते विधान बरोबर नाही?
१] या पदाला घटनात्मक दर्जा आहे.
२] त्यांची नेमणूक राष्ट्रापातीद्वारे केली जाते.
३] त्यांचा कार्यकाळ ५ वर्षे किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो.
४] संसदेच्या सल्ल्याशिवाय राष्ट्रपती त्यांना पदावरून काढू शकतात.


३] त्यांचा कार्यकाळ ५ वर्षे किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो.
----------------
[प्र.३] योग्य विधाने ओळखा.
अ] कलम ४३ नुसार भारतात कुटीरोद्यागाला चालना देणे सरकारची जबाबदारी आहे.
ब] कलम ४० नुसार पंचायत राज्याची स्थापना करणे केंद्राची जबाबदारी आहे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही


३] वरील दोन्ही
----------------
[प्र.४] भारतात जनहित याचिकेची सुरुवात ................. झाली.
१] घटनादुरुस्तीने
२] न्यायालयीन पुढाकाराने
३] राजकीय पक्षांच्या पुढाकाराने
४] संसदेच्या कायद्याने


२] न्यायालयीन पुढाकाराने
----------------
[प्र.५] भारतात मतदानाचा अधिकार मिळविण्याकरिता वयोमर्यादा २१ वर्षावरून १८ वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार केली आहे?
१] ४२ वी [१९७६]
२] ४४ वी [१९७८]
३] ६१ वी [१९८९]
४] ५६ वी [१९८७]


३] ६१ वी [१९८९]
----------------
[प्र.६] भारतीय राज्यघटनेने राज्यसभेला दिलेल्या अधिकाराबाबत योग्य विधाने ओळखा.
अ] एखाद्या राज्याच्या नावात बदल करणे तसेच त्याचा भूप्रदेश कमीजास्त करणे.
ब] राज्य सूचीतील एखाद्या विषयावर कायदा करण्याबाबत तसेच अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्याबाबत संसदेला शिफारस करणे.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही


२] फक्त ब
----------------
[प्र.७] योग्य विधाने ओळखा.
अ] मतदार संघ पुनर्रचना आयोगाच्या शिफारसी लोकसभेत किंवा विधानसभेत सादर केल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा करता येत नाही..
ब] मतदार संघ पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींना कोर्टात आवाहन देता येऊ शकते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] यापैकी नाही


१] फक्त अ
----------------
[प्र.८] आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय संसद संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या काही भागासाठी कायदा करू शकते .................
१] सर्व राज्य सरकारांच्या सहमतीने
२] २/३ राज्य सरकारांच्या सहमतीने
३] संबंधित राज्य सरकारांच्या सहमतीने
४] कोणत्याही राज्य सरकारच्या सहमतीशिवाय


४] कोणत्याही राज्य सरकारच्या सहमतीशिवाय
----------------
[प्र.९] खालीलपैकी कोणत्या निगम (Bodies) यांचा भारतीय राज्यघटनेत नोंद नाही?
अ] राष्ट्रीय विकास समिती
ब] योजना आयोग
क] विभागीय परिषदा

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब
३] फक्त अ आणि क
४] अ, ब आणि क


४] अ, ब आणि क
----------------
[प्र.१०] खाली नमूद केलेल्या भारतीय राजकीय पक्षांचा त्यांच्या स्थापनेसंदर्भात योग्य कालानुक्रम लावा.
अ] द्र.मू.क
ब] साम्यवादी पक्ष (मार्क्सवादी)
क] आसाम गण परिषद
ड] तेलगु देसम पक्ष

१] अ – ब – क – ड
२] अ - ब – ड – क
३] ब – अ – ड – क
४] ड – क – ब – अ


२] अ - ब – ड – क
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा