चालू घडामोडी - १६ एप्रिल २०१५


  • विश्व विजेत्या बलाढय़ ऑस्ट्रेलियाचे आव्हान मोडीत काढत न्यूझीलंडने सुलतान अझलन शहा चषक हॉकी स्पर्धा जिंकली. 
  • चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने पेनल्टी शुटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाचा ३-१ अशा गोल फरकाने पराभव केला. न्यूझीलंडच्या हॉकी संघाने ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली आहे.
  • या स्पर्धेत भारताने कोरियाचा पेनल्टी शुटआऊटमध्ये ४-१ असा पराभव करून तिसऱ्या स्थानासह कास्यपदक मिळविले. 
  • कॅनडाने यजमान मलेशियाचा पेनल्टी शुटआऊटमध्ये ३-१ असा पराभव करून या स्पर्धेत पाचवे स्थान मिळविले.
  • सुलतान अझलन शहा चषक :
    • ही मलेशिया देशात दर वर्षी खेळवली जाणारी एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे. 
    • ‘मलेशियातील हॉकीचे जनक’ मलेशियाचे नववे राजे सुलतान अझलन शहा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते.
    • इ.स. १९८३ साली सुरुवात झालेली ही स्पर्धा १९९८ सालापर्यंत द्वैवार्षिक होती पर्ंतु वाढत्या लोकप्रियतेमुळे ही स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येऊ लागली.
    • ऑस्ट्रेलिया संघाने ही स्पर्धा आजवर सर्वाधिक ८ वेळा तर भारताने चार वेळा जिंकली आहे.

  • योगगुरु रामदेव बाबा यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. 
  • रामदेव बाबा यांना योगविद्या आणि आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी हरियाणा सरकारचा ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. 
  • शेकडो प्रजातींच्या आयुर्वेदिक झाडं-झुडपांची निगराणी रामदेव बाबांच्या देखरेखीत केली जाईल.

    Shamina Singh
  • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय अमेरिकन व्यावसायिक महिला शमिना सिंग यांची आपल्या प्रशासनात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.
  • ओबामा यांनी शमिना सिंग यांची कॉर्पोरेशन फॉर नॅशनल ऍण्ड कम्युनिटी सर्व्हिसच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे. 
  • इंडियन अमेरिकन लीडरशिप इन्क्युबेटर (आयएएलआय) या संस्थेच्या संस्थापक सदस्य असलेल्या सिंग सध्या मास्टरकार्ड सेंटर फॉर इन्क्ल्युझिव्ह ग्रोथ याठिकाणी कार्यकारी संचालक आहेत. 
  • डिसेंबर २०१३ मध्येच त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी २०१० ते २०११ या कालावधीत सिंग यांनी नायकी कंपनीत सरकारी आणि सार्वजनिक व्यवहार विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून काम केले होते.

  • माहिती व प्रसारण मंत्री अरूण जेटली यांनी १४ एप्रिल रोजी आकाशवाणी दिल्लीच्या विविध भारती सेवेचे प्रसारण एफ. एम. चॅनलवर करण्याच्या सेवेचे उद्घाटन केले. 
  • हि सेवा एफ. एम. चॅनलच्या १०१.१ मेगाहर्ट्स चॅनलवर उपलब्ध असेल. तसेच हि सेवा मोबाईलवर देखील उपलब्ध असेल.

  • वॉलमार्ट इंडिया च्या तंत्रज्ञान प्रमुखपदी पंकज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.

    A. Raja
  • टू-जी स्पेक्ट्रम गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी स्पेक्ट्रम वाटपाबाबतच्या धोरणांच्या विषयावर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची दिशाभूल केली असा खुलासा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने विशेष न्यायालयापुढे केला.
  • इतर आरोपींसोबत कट रचून राजा यांनी आरोपी कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी टू-जी परवाने देण्याची मुदत वाढविली होती. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य हे धोरण बदलून काही आरोपी आणि राजा यांनी तत्कालीन केंद्रीय विधिमंत्र्यांचा प्रस्तावही फेटाळला होता.

  • समाजवादी पक्ष, संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल, भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि समाजवादी जनता पक्ष या सहा राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या दिल्लीमध्ये मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या सहा पक्षांच्या जनता परिवाराच्या एकीकरणाची घोषणा करण्यात आली.
  • नव्या पक्षाचे आणि पक्षाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्षपद सर्वांत ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांना देण्यात आले आहे. 
  • आता पक्षाचे नाव, निशाण आणि निवडणूक चिन्ह, तसेच ‘नीती व कार्यक्रम’ निश्चित करण्यासाठी मुलायमसिंह यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची एक समिती नेमण्यात आली असून, लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

  • श्रीमती मीनाक्षी मदन राय यांची सिक्कीम उच्च न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात. सिक्कीम उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
  • सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी राय यांना न्यायाधीशपदाची शपथ दिली.

  • मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.के. गांगले यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. राज्यसभेतील ५८ सदस्यांनी याबाबत ठराव मांडल्याने अध्यक्षांनी समिती स्थापन केली आहे.

  • भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रमवारी प्रथम स्थान पटकाविले आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार चीनच्या ली शुएरुई ही दोन क्रमांकांनी खाली गेली आहे. 
  • इंडिया ओपन ग्रँड प्रिक्स गोल्डमध्ये विजय मिळवून साईना ही जागतिक क्रमावारीत प्रथम स्थान मिळविणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली. त्यानंतर मलेशियन ओपन सुपर सीरिजनंतर ती दुसऱ्या क्रमांकावर गेली होती. 
  • मागील आठवड्यातील सिंगापूर खुल्या स्पर्धेतून शुएरुई बाहेर पडल्याने तिचे स्थान घसरल्यानंतर साईना पुन्हा अव्वल ठरली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा