प्रश्नसंच १५२ - विज्ञान व तंत्रज्ञान


MT Quiz
[प्र.१] पदार्थ ऊर्ध्व दिशेने फेकला असता त्याची .....
१] गतिज उर्जा वाढत असते व स्थितीज उर्जा कमी होत जाते.
२] गतिज उर्जा कमी होत जाते व स्थितीज उर्जा वाढत जाते.
३] गतिज उर्जा व स्थितीज उर्जा दोन्ही वाढतात.
४] गतिज उर्जा व स्थितीज उर्जा दोन्ही कमी होत जातात.


२] गतिज उर्जा कमी होत जाते व स्थितीज उर्जा वाढत जाते.

[प्र.२] आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे?
१] अष्टकाचे तत्व
२] मूलद्रव्यांचे अणुअंक
३] मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान
४] त्रिकांचे तत्व


२] मूलद्रव्यांचे अणुअंक

[प्र.३] आकाशाचा रंग निळा आहे कारण .............
१] पांढऱ्या प्रकाशाचे अपवर्तन
२] पांढऱ्या प्रकाशाचे परावर्तन
३] हवेतील प्रकाशाच्या पांढऱ्या रेणूचे विकिरण
४] यापैकी नाही


३] हवेतील प्रकाशाच्या पांढऱ्या रेणूचे विकिरण

[प्र.४] सुपरकंडक्टर म्हणजे काय?
१] विद्युतधारेचे कमी तापमानाला वहन करतात.
२] विद्युतधारेच्या वहनाला जास्त रोध करतात.
३] विद्युतधारेच्या प्रवाहाला रोध प्राप्त करून देत नाहीत.
४] विद्युतधारेचे जास्त तापमानाला वहन करतात.


३] विद्युतधारेच्या प्रवाहाला रोध प्राप्त करून देत नाहीत.

[प्र.५] पाणी ० ते १० अंश सेल्सिअस या कक्षेत तापवले तर पाण्याच्या आकारमानात (Volume) काय बदल होईल?
१] हळूहळू वाढेल.
२] हळूहळू कमी होईल.
३] प्रथम वाढेल मग कमी होईल.
४] प्रथम कमी होईल मग वाढेल.


४] प्रथम कमी होईल मग वाढेल.

[प्र.६] अणुभट्टीमध्ये खालीलपैकी कशाचा मॉडरेटर म्हणून वापर करतात?
१] युरेनियम
२] ग्राफाईट
३] कॅडमियम
४] लिक्विड सोडियम


३] कॅडमियम

[प्र.७] खालीलपैकी कोणत्या ठिकाण फास्ट ब्रीडर रेअॅक्टर वापरले जाते?
१] ट्रॉम्बे
२] नरोरा
३] कल्पकम
४] नांगल


३] कल्पकम

[प्र.८] पृथ्वीवरील सजीवांच्या निर्मितीस कोणते घटक महत्वाचे ठरले?
अ] ऑक्सिजन
ब] नायट्रोजन
क] कार्बन
ड] हायड्रोजन

१] फक्त अ आणि ब
२] फक्त अ, ब आणि क
३] फक्त अ, क आणि ड
४] वरील सर्व


४] वरील सर्व

[प्र.९] C-C या बंधाची सर्वात कमी लांबी कोणत्या संयुगामध्ये असते?
१] इथेन
२] इथिलीन
३] बेन्झीन
४] अॅसीटलीन


४] अॅसीटलीन

[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या घटकात पारा आढळतो?
अ] विद्युत कळ (Electrical Switch)
ब] थर्मामीटर
क] लाईट बल्ब
ड] डेंटल अमाल्गम

१] फक्त अ आणि ब
२] फक्त अ, ब आणि क
३] फक्त अ, क आणि ड
४] वरील सर्व


४] वरील सर्व

२ टिप्पण्या: