चालू घडामोडी - १६ जून २०१५


जून १४ : जागतिक रक्तदान दिन
    Donate Blood
  • १४ जून २०१५ रोजी जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात आला. २०१५च्या जागतिक रक्तदान दिनाचा ‘थॅंक यू फॉर सेव्हिंग माय लाइफ’ हा विषय होता.
  • या अंतर्गत लोकांनी रक्तदात्यांचे त्यांचे प्राण वाचविल्याबद्दल आभार मानले तसेच लोकांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन देण्यात आले.
  • घोषवाक्य : ‘रक्तदान करा. रक्तदान महत्वपूर्ण आहे.’
  • या मोहिमेद्वारे नियमितपणे रक्तदान करणाऱ्या तसेच कधीही रक्तदान केले नाही अशा सर्वांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले.
पार्श्वभूमी
  • सुरक्षित आणि स्वच्छ रक्तदानाची आवश्यकता, रक्तदानाचे महत्व व रक्तदानामुळे मिळणारे जीवनदान याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी २००४पासून जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो.
  • सार्वजनिक आरोग्याकरिता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सुरु केलेल्या करण्यात आठ मोहिमांपैकी  जागतिक रक्तदान दिन हि एक मोहीम आहे. 
  • इतर मोहिमा : १) जागतिक क्षयरोग दिन (२४ मार्च), २) जागतिक आरोग्य दिन (७ एप्रिल), ३) जागतिक लसीकरण सप्ताह (एप्रिल शेवटच्या आठवड्यात), ४) जागतिक मलेरिया दिन (२५ एप्रिल), ५) जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन (३१ मे), ६) जागतिक हेपेटाइटिस दिवस (२८ जुलै) आणि ७) जागतिक एड्स दिन (१ डिसेंबर)

छगन भुजबळ यांच्या घरी आणि कार्यालयावर छापे
    Chhagan Bhujbal
  • नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनासह सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक आणि मुंबईतील विविध घरांवर व कार्यालयांवर छापे टाकले. 
  • गेल्याच आठवड्यात याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छगन भुजबळ यांच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले होते.
  • महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीमार्फत चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र सदन प्रकरणात घोटाळा झाल्याचे नमूद करून छगन भुजबळांसह पंकज व समीर भुजबळ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  • याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) अरुण देवधर, दीपक देशपांडे, मुख्य अभियंता माणिक शहा, मुख्य वास्तुशास्रज्ञ बिपिन संख्ये, कार्यकारी अभियंता अनिलकुमार गायकवाड या अधिकाऱ्यांसह चमणकर इंटरप्राईझेसचे कृष्णा चमणकर, प्रसन्न चमणकर, प्रवीणा चमणकर, प्रणिता चमणकर तसेच भुजबळपुत्रांच्या कंपनीशी संबंधित कर्मचारी तन्वीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिश्रीमंत कुटुंबांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर
  • अतिश्रीमंत कुटुंबांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या जागतिक श्रीमंत २०१५च्या अहवालातून समोर आली आहे.
  • १० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या कुटुंबांच्या संख्येनुसार श्रीमंत देशांची वर्गवारी करण्यात आली आहे. सर्वाधिक अतिश्रीमंत कुटुंबे अमेरिकेत राहत असून त्यांची संख्या ५,२०१ एवढी आहे. त्यानंतर १,०३७ संख्येसह चीनचा क्रमांक लागतो. तर १,०१९ संख्येसह युकेचा आणि ९२८ कुटुंबसंख्येसह भारताचा क्रमांक लागतो. भारतानंतर ६७९ कुटुंब संख्येसह जर्मनी पाचव्या क्रमांकावर आहे. 
  • भारतात २०१३ सालामध्ये ही संख्या केवळ २८४ एवढी होती. त्यात २०१४ मध्ये तिप्पट वाढ झाली आहे. आशिया-पॅसिफिकमध्ये आर्थिकवृद्धीत वाढ होत असल्यामुळे चीन आणि भारतात श्रीमंत कुटुंबांची संख्या फार झपाट्याने वाढली असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

चेन्नईमध्ये प्रवासी संसाधन केंद्र सुरु
  • प्रवासी भारतीय मंत्रालय तसेच तामिळनाडू सरकारने ११ जून २०१५ रोजी चेन्नईमध्ये प्रवासी संसाधन केंद्र (एमआरसी) सुरु केले. प्रवासी भारतीय मंत्रालयाद्वारे सुरु केले गेलेले हे भारतातील चौथे प्रवासी संसाधन केंद्र आहे.
  • पहिल्या प्रवासी संसाधन केंद्राची (एमआरसी) स्थापना २००८मध्ये कोची (केरळ) येथे करण्यात आली. त्यानंतर हैदराबाद, गुडगाव आणि चेन्नई येथे ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
  • एमआरसी परदेशातील रोजगाराशी संबंधित सर्व सूचना, सल्ले तसेच माहिती प्रदान करते. तसेच याद्वारे परदेशात कार्यरत असणाऱ्या भारतीयांच्या समस्यांच्या कायदेशीर आणि धोरणात्मक पैलूंची माहिती दिली जाते.
‘एमआरसी’ची कार्ये
  • एमआरसी सुरक्षित आणि कायदेशीररित्या मान्यताप्राप्त स्थलांतराशी संबंधित सर्व माहिती देणे.
  • एजंट आणि अन्य सेवा प्रदाते यांच्याविषयी देणे.
  • प्रवासी भारतीय मंत्रालयाशी संबंधित तक्रारी दाखल करणे व मंत्रालयाच्या अधिकारक्षेत्रात त्यांचे निवारण करणे.
  • समुपदेशन करणे. (दूरध्वनी आणि ईमेलद्वारे)

हरिद्वार एक्स्प्रेसचे नाव ‘योग एक्स्प्रेस
  • भारतीय रेल्वेने १५ जून २०१५ पासून रेल्वे क्रमांक १९०३१/१९०३२ अहमदाबाद-हरिद्वार एक्स्प्रेसचे नाव बदलून ‘योग एक्स्प्रेस’ केले. गाडीच्या वेळेत कोणतेही बदल केलेले नाही.
  • २१ जून २०१५ रोजी केंद्र सरकार पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणार आहे या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे.

डॉ. बिमल रॉय यांची भारतीय सांख्यिकी संस्थेच्या संचालक पदावरून हकालपट्टी
  • केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने डॉ. बिमल रॉय यांना १० जून २०१५ रोजी भारतीय सांख्यिकी संस्थेच्या संचालक पदावरून दूर केले. त्यांचा कार्यकाळ जुलै २०१५ मध्ये पूर्ण होणार होता. 
  • प्रा. एस. बंधोपाध्याय १ ऑगस्ट २०१५पासून त्याचा पदभार स्वीकारतील.
  • डॉ बिमल रॉय यांच्यावर मंत्रालयाने शिस्तभंगाचा आरोप केला आहे. या पदावर रॉय यांची नियुक्ती ऑगस्ट २०१०मध्ये करण्यात आली होती.
  • डॉ बिमल के रॉय हे प्रसिद्ध क्रिप्टोलॉजिस्ट असून त्यांना एप्रिल २०१५मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

कपिल मिश्रा दिल्ली जल बोर्डचे अध्यक्ष
  • दिल्लीच्या नव्याने नेमलेल्या कायदामंत्री कपिल मिश्रा यांची १५ जून २०१५ रोजी दिल्ली जल बोर्डचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले. ते मनीष सिसोदिया (उपउपमुख्यमंत्री-दिल्ली) यांची जागा घेतील.
  • १५ जून २०१५ रोजी कपिल मिश्रा यांनी दिल्ली सरकारच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांख्याकडे कायदा विभागाची जबाबदारीदेखील सोपविण्यात आली. 
  • जितेंद्र सिंग तोमर यांनी बनावट पदवी सादर केल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिलाहोता त्यामुळे त्यांच्या जागी कपिल मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मंगळसदृश स्थितीतून संशोधक आठ महिन्यांनी बाहेर
  • मंगळसदृश स्थिती असलेल्या हवाईतील मृत ज्वालामुखीतून मंगळावर जाण्याचा सराव करणारे सहा वैज्ञानिक बाहेर आले. त्यांना तेथे वेगळे ठेवून मंगळावरील वास्तव्याची तालीम घेण्यात आली. 
  • मौना लोआ या आठ हजार फूट उंचीवरील ज्वालामुखीच्या उतारावरील खोल ठिकाणातून ते आठ महिन्यांनी बाहेर आले. 
  • नासाच्या समानव मंगळ मोहिमेचे सदस्य असलेल्या वैज्ञानिकांवर कॅमेरे, ट्रॅकर्स व इलेक्ट्रॉनिक यंत्रांनी लक्ष ठेवले जात होते, त्यांच्यावर त्या ठिकाणी काय परिणाम जाणवतात हे बघितले जात होते.

‘मॅगी’समोरील अडचणींत वाढ
  • अन्नविषयक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारतातून होणाऱ्या मॅगी नूडल्सची आयात तात्पुरती थांबवली आहे. 
  • खबरदारीचा उपाय म्हणून ऑस्ट्रेलियाच्या शेतकी विभागाने मॅगीविरुद्ध ११ जूनपासून ‘थांबवा’ आदेश (होल्डिंग ऑर्डर) काढला आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील अन्न दर्जा संहितेमध्ये (फूड स्टँडर्ड्स कोड) परवानगी असलेल्या प्रमाणापेक्षा त्यात शिसाचे प्रमाण अधिक असल्याच्या बातम्यांमुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे. 
  • ‘होल्डिंग ऑर्डर’नुसार शेतकी खाते मॅगीच्या संपूर्ण साठय़ाची चाचणी व परीक्षण करेल. प्राधिकृत अधिकाऱ्याने परीक्षण किंवा विश्लेषण करेपर्यंत मॅगीची आयातीत पाकिटे एका ठिकाणी साठवली जातील आणि परीक्षणानंतरच त्याच्या दर्जाबाबत मंजुरी दिली जाईल.
  • ‘इन्स्टंट स्नॅक’ म्हणून लोकप्रिय असलेली मॅगी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्याही रडारवर आली आहे. त्याच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच चाचणीसाठी मॅगीचे नमुने घेतले आहेत.
  • भारतातील ‘मॅगी’चा साठा नष्ट करण्यासाठी नेस्ले इंडियाला ३२० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

शारदा ग्रुपने दिलेली रक्कम मिथुनने केली परत
    Mithun-Chakraborty
  • अभिनेता आणि तृणमूल कॉंग्रेसचा खासदार मिथुन चक्रवर्ती याने शारदा ग्रुपचा ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून स्वीकारलेली १ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम अंमलबजावणी संचालनालयाला परत केली आहे. 
  • मिथुनने आपल्या वकिलामार्फत १ कोटी १९ लाख ८८ हजार ५६० रुपयांचा धनाकर्ष अंमलबजावणी संचालनालयाकडे पाठविला आहे. 
  • कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या शारदा ग्रुपमध्ये सहभागी असल्याने मागील महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने मिथुनची चौकशी केली होती. 
  • शारदा ग्रुपसोबतचे त्याचे संबंध केवळ व्यावसायिक संबंध असून त्याद्वारे कोणालाही फसविण्याचा हेतू नसल्याचे संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जून २०१४मध्ये शारदा ग्रुपने मिथुनच्या खात्यात २ कोटींपेक्षा कमी रक्कम हस्तांतरित केल्याने मिथुनची चौकशी करण्यात आली होती. 

बांगलादेशमधील माजी मंत्र्याला मृत्युदंडाची शिक्षा
  • चार दशकांपेक्षा अधिक काळापूर्वी स्वातंत्र्यासाठीच्या युद्धादरम्यान अत्याचार केल्याप्रकरणी माजी मंत्री तथा इस्लामिक पक्षाचा नेता अशन मोहम्मद मोजाहिदला सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. 
  • अशन मोहम्मद मोजाहिद हा जमात-ए-इस्लामी पक्षाचा सरचिटणीस आहे. वंशहत्या, विचारवंतांचा खून आदी गुन्ह्यांमध्ये तो २०१३ मध्ये दोषी ठरला होता. 
  • पाकिस्तानपासून बांगलादेश विभक्त होण्याच्या काळात १९७१ साली हिंसा केल्याच्या आरोपामध्येही तो दोषी ठरला होता. २००१-०६ दरम्यान माजी पंतप्रधान खालीदा झिया यांच्या काळात तो मंत्री होता. 

दलाई लामांचा वाढदिवस २१ जूनला
  • तिबेटी सरकारने आपले सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांचा ८०वा वाढदिवस २१ जूनला साजरा करण्याचे ठरविले आहे. 
  • तिबेटी कालगणनेप्रमाणे दलाई लामांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असून, त्या दिवशी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात येणार असल्याचे सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवदेनात म्हटले आहे. 
  • या कार्यक्रमाला जगभरातून पाहुणे येणार असून, दोन दिवसांच्या या कार्यक्रमांत सांस्कृतिक नृत्य, प्रदर्शन आणि पुस्तक प्रदर्शन होणार आहे.

हिशेब न दिल्यामुळे ‘एनपीपी’ची मान्यता रद्द
  • निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नसल्याने निवडणूक आयोगाने पी. ए. संगमा यांच्या ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ची (एनपीपी) मान्यता रद्द केली. 
  • निवडणुकांवर लक्ष ठेवून असलेल्या आयोगाने पहिल्यांदाच एका पक्षाची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली आहे. 
  • आयोगाने दिलेल्या नियमावलींचे काटेकोर पालन केले नसल्याने पक्षाचे अधिकार आणि त्यांचे चिन्ह यांची मान्यता रद्द केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. 
  • सत्तेत असलेल्या ‘एनडीए’ सरकारच्या युतीत असणारा हा पक्ष मेघालयातील प्रमुख पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षाने आयोगाला समाधानकारक अशी माहिती पुरविल्यास, ही कारवाई मागे घेण्यात येऊ शकते, असे आयोगाने म्हटले आहे. 
  • सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना निवडणूक खर्चाचा तपशील ७५ दिवसांत सादर करण्याचे आदेश नुकतेच दिले होते.

राफेल नदाल तिसऱ्यांदा स्टटगार्ट ओपन स्पर्धेत विजेता
    Spain's Rafael Nadal
  • स्पॅनिश टेनिस खेळाडू राफेल नदाल तिसऱ्यांदा स्टटगार्ट ओपन स्पर्धेत विजेता ठरला. 
  • आठव्या मानांकित व्हिक्टर ट्रॉयेकीला नदालने सरळ सेटमध्ये (७-६, ६-३) असे पराभूत करून विजय प्राप्त केला.
  • २०१०च्या विम्बल्डननंतर नदालने प्रथमच ग्रास कोर्टवर विजय मिळविला आहे. यापूर्वी नदालने २००५ आणि २००७मध्ये स्टटगार्ट ओपन स्पर्धेत विजय मिळविला होता तेव्हा हि स्पर्धा क्ले कोर्टवर खेळण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा