चालू घडामोडी - १६ डिसेंबर २०१५


नवीन डिझेल वाहनांच्या नोंदणीस दिल्लीत बंदी

  • डिझेलवर चालणाऱ्या दोन हजार सी.सी. क्षमतेच्या मोटर व ‘एसयूव्ही’ वाहनांच्या नोंदणीस नवी दिल्ली व परिसरात बंदी घालण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ही बंदी ३१ मार्च २०१६ पर्यंत लागू असेल.
  • दिल्लीतील प्रदूषण धोक्याच्या पातळीपर्यंत पोचले आहे. त्यावर उपाय म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.
  • याशिवाय दिल्लीतून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांना राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला. दिल्लीतील रस्त्यांचा वापर करणाऱ्या हलक्या व जड वाहनांवर १०० टक्के पर्यावरण कर लादण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
  • २००५ पूर्वीच्या जुन्या वाहनांना दिल्लीत प्रवेश बंदी असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पुणे आणि राजकोट करीता खेळाडूंचा लिलाव

  • सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगमुळे दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई आणि राजस्थान या संघांची जागा घेणाऱ्या पुणे आणि राजकोट संघांनी चेन्नई आणि राजस्थान संघांतील प्रत्येकी पाच खेळाडूंची खरेदी केली.
  • चेन्नई आणि राजस्थान संघातील एकूण ५० खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यातील १० खेळाडूंची खरेदी झाली असून, उर्वरित ४० खेळाडूंची निवड ६ फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावातून होणार आहे. त्या अगोदर तीन टप्प्यात ट्रेडिंग (अदलाबदली) होणार आहे.
अशी आहे निवड आणि रक्कम
पुणेराजकोट
खेळाडूकिमत (कोटी रु.)खेळाडूकिमत (कोटी रु.)
महेंद्रसिंह धोनी१२.५सुरेश रैना१२.५
अजिंक्य रहाणे९.५रवींद्र जडेजा९.५
आर. अश्विन७.५ब्रॅंडम्‌ मॅकल्‌म७.५
स्टीव स्मिथ५.५जेम्स फॉकनर५.५
फाफ ड्युप्लेसीड्वेन ब्रावो

एअर इंडियाची अहमदाबाद ते लंडन या थेट विमानसेवा

    Air India
  • एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन या थेट विमानसेवेला सुरवात झाली.
  • काही तांत्रिक अडचणी आणि धुक्याचा प्रश्न असल्याने सध्या हे विमान मुंबईत अल्पकाळासाठी थांबून पुढे लंडनकडे रवाना होईल. मात्र जानेवारीच्या १५ तारखेपासून अहमदाबाद-लंडन विमानसेवा विनाथांबा होणार असल्याचे एअर इंडियाने जाहीर केले आहे.
  • विनाथांबा सेवा सुरू झाल्यावर प्रवासाचा कालावधी सात ते आठ तासांनी कमी होईल. या विमानमार्गावर एअर इंडियाने बोईंग ७८७ ड्रीमलायनर हे विमान रुजू केले आहे. 
  • मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत सरदार सरोवर धरणाजवळ सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या बांधकामास सुरवात झाली असून हा जगातील सर्वांत उंच पुतळा ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा