आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन २०१६

इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू २०१६
  • आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाला ४ फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम येथील कमांड स्टेडियममध्ये आंध्रप्रदेशचे राज्यपाल एएसएल नरसिंहन यांच्या हस्ते सुरुवात झाली.
  • ‘युनायटेड थ्रू ओशन’ या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे सर्व देशांच्या नौदलांना एकत्र जोडणे, हा आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन सोहळा आयोजन करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.
  • २४ युद्धनौकांसह परदेशी नौदलांचे २४ प्रमुखही या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या संचलनात ५३ देशांच्या ९० युद्धनौका सहभागी झाल्या आहेत.
  • यात अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, ओमन, श्रीलंका, बांगलादेश, ब्राझील, मालदिव, मॉरिशस आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांचा समावेश आहे.
  • भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा, आयएनएस सुमेधा, आयएनएस शरयू, आयएनएस सुनयना या चार गस्तीनौकांचा ताफा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.
  • यापैकी आयएनएस सुमित्राला राष्ट्रपतींच्या युद्धनौकेचा सन्मान लाभला असून, आयएनएस सुमित्रा व आयएनएस सुमेधा या दोन्ही युद्धनौकांना राष्ट्रपतींसाठी सजविण्यात आले आहे. त्यांचे नौदल क्रमांक काढून त्याजागी अशोकस्तंभाची राजमुद्रा विराजमान करण्यात आली आहे.
  • आयएफआरच्या अखेरच्या टप्प्यात भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या हवाई विभागाच्या हवाई कवायतींचेही विशेष आकर्षण असणार आहे.
  • तसेच यावेळी भारतीय नौदलातील आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विराट या दोन्ही विमानवाहू युद्धनौकाही प्रथमच एकत्र पाहायला मिळणार आहेत.
  • अमेरिकेची यूएसएस एन्टीएटम ही १० हजार टनांची क्रूझर श्रेणीतील शक्तिशाली युद्धनौका ही या संचलनात सामील झालेली सर्वात मोठी विदेशी युद्धनौका ठरली आहे.
  • भारताने आयोजित केलेले हे दुसरे आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन आहे. याआधी २००१ला मुंबईच्या अरबी समुद्रात भारताने पहिलं आंतरराष्ट्रीय ताफा संचलन आयोजित केले होते.
कालावधी ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी
ठिकाण विशाखापट्टणम
ब्रीदवाक्य (थीम) महासागरातून एकात्मता (United through Oceans)
सहभागी देश ५३
सहभागी युद्धनौका ९०
राष्ट्रपतींची युद्धनौका आयएनएस सुमित्रा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा