चालू घडामोडी : ४ एप्रिल

प्राप्तीकर मोजण्यासाठी ऑनलाइन गणकयंत्र

  • २०१६-१७ या वर्षांसाठी आपला प्राप्तीकर किती आहे हे मोजण्यासाठी प्राप्तिकर खात्याने ऑनलाइन गणकयंत्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • टॅक्स कॅलक्युलेटर हा ऑनलाइन प्रोग्रॅम असून तो प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • त्याच्या मदतीने विवरणपत्र भरताना नेमका प्राप्तिकर किती हे समजणार आहे. करदायित्व समजण्यासाठी ही सोय केली आहे. मूलभूत माहिती व आकडे भरल्यानंतर तुम्हाला कराची रक्कम कळू शकेल.
  • व्यक्तिगत पगारदार, एकत्र कुटुंब व इतर उत्पन्न स्रोत असलेल्या करदात्यांसाठी आयटीआर १ अर्ज भरायचा आहे तर विभक्त हिंदू कुटुंब व व्यक्तींसाठी आयटीआर ४ हा अर्ज भरायचा आहे.
  • या वर्षी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अधिसूचना जारी केली असून त्यानुसार ३० मार्चला नवीन अर्ज अधिसूचित केले आहेत व ते ३१ जुलैपर्यंत सादर करता येणार आहेत.
 ई फायलिंग व्हॉल्ट 
  • करदात्यांना आपले ई-फायलिंग अकाउंट सुरक्षित राखता यावे यासाठी प्राप्तीकर खात्याने ई फायलिंग व्हॉल्ट ही नवी सुविधा जारी केली आहे.
  • ई-फायलिंग अकाउंटवर लॉग ऑन केल्यानंतर करदात्याने ई फायलिंग व्हॉल्ट-हायर सिक्युरिटी सिलेक्ट केल्यास त्यापुढची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सुविधेचा लाभ घेता येईल.
  • ही सुविधा घेतल्यानंतर करदात्याने यापूर्वी जरी युजर आयडी आणि पासवर्ड कोणाला दिला असला तरीही इतर कोणालाही लॉगींग करण्यापासून करदाता रोखू शकतो. केवळ युजर आयडी आणि पासवर्ड पेक्षा ही सुविधा सर्वोच्च सुरक्षा पुरवते.

जगातील पहिले व्हाईट टायगर सफारी पार्क

  • मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ४ एप्रिल रोजी ‘व्हाईट टायगर सफारी’ पार्कचे उदघाटन केले. सत्ना जिल्ह्यातील मुकूंदपूरमध्ये हे व्हाईट टायगर सफारी पार्क उभारण्यात आले आहे.
  • फक्त सफेद वाघांसाठी सुरु करण्यात आलेले जगातील हे असे पहिले पार्क आहे.
  •  येथील विंध्य भागामध्ये १०० वर्षापूर्वी पहिला वाघ आढळला होता. या पार्कच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपये खर्च आला असून, २५ हेक्टर परिसरामध्ये हे पार्क पसरले आहे.
  • या व्हाईट टायगर सफारी पार्कमध्ये तीन सफेद वाघ आहेत. यात एक नर आणि दोन मादी आहेत. हे पार्क आता अधिकृतरित्या पर्यटकांसाठी खुले झाले आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये या पार्कमध्ये नऊ सफेद वाघ असतील.

अमेरिकेत अणुसुरक्षा शिखर परिषद

  • अमेरिकेत झालेल्या अणुसुरक्षा शिखर बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अणुसुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचे सांगताना काही उपाययोजना जाहीर केल्या. पन्नास देशांचे प्रतिनिधी या शिखर बैठकीस उपस्थित होते.
  • अण्वस्त्रांची तस्करी रोखणे, आण्विक दहशतवाद टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे यासारख्या उपाययोजनांचा त्यात समावेश आहे.
  • अल कायदा व आयसिसच्या दहशतवाद्यांना अण्वस्त्रे मिळाली तर ती ते वापरतील अशी भीती अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी या बैठकीत व्यक्त केली. 

मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

  • सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजे किंग सलमान बिन अब्दुल अझीझ यांच्याशी दोन्ही देशांमधील व्यूहात्मक भागीदारी अधिक विकसित करण्याच्या उद्देशार्थ चर्चा केली.
  • दोन नेत्यांमधील झालेल्या दीर्घ चर्चेमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि दहशतवाद या तीन मुख्य विषयांचा समावेश होता.
  • सौदी अरेबिया हा भारताचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार देश आहे. या चर्चेआधी मोदी यांचे रॉयल कोर्ट येथे भव्य राजनैतिक स्वागत करण्यात आले होते.
  • गेल्या सात महिन्यांच्या काळामध्ये आखाती भागातील मोदी यांचा हा दुसरा दौरा आहे. याआधी, त्यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात संयुक्त अरब अमिरातीस भेट दिली होती.
  • किंग सलमान यांच्याआधी मोदी यांनी सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अदेल अलिजुबेर यांच्याशीही विविध विषयांवर चर्चा केली होती.
  • याचबरोबर, सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय तेल कंपनीचे (अराम्को) मुख्याधिकारी व आरोग्य मंत्री खालिद ए अल फताह यांनीही पंतप्रधानांची भेट घतली होती.
  • जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यानंतर सौदी अरेबियास भेट देणारे मोदी हे चौथे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

वेस्टइंडीज दुसऱ्यांदा टी-२० विश्वकप जिंकला

  • वेस्टइंडीजने कोलकतामध्ये ईडन गार्डन्सवर झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला नमवून दुसऱ्यांदा टी-२० विश्वकरंडक विजेतेपद मिळविले.
  • याशिवाय विंडीजच्या महिला संघानेदेखील ऑस्ट्रेलियाचा पराभव करून महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
  • यापूर्वीच्या पहिल्या विजेतेपदाचा हीरो ठरलेला मार्लन सॅम्युएल्सच यावेळी देखील त्यांच्या विजयाचा हीरो ठरला. 
  • अखेरच्या षटकांत १९ धावांची आवश्यकता असताना ब्रेथवेटने बेन स्टोक्सच्या पहिल्या चार चेंडूंवर चार षटकार ठोकून विंडीजचा विजय साकार केला.
  • याबरोबर वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा टी-२० विश्वकप जिंकला. सॅम्युल्सला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तर विराट कोहलीला स्पर्धेतील मालिकावीराचा बहुमान मिळाला.
  • यापूर्वी वेस्ट इंडिजने १९ वर्षाखालील विश्वकप जिंकला. त्यानंतर महिला टी-२० विश्वकपही वेस्ट इंडिजने जिंकला. यानुसार वेस्ट इंडिजने यंदाच्या मोसमातल्या तिन्ही मोठ्या स्पर्धा जिंकल्या.
 महिला टी-२० विश्वकरंडकदेखील विंडीजकडे 
  • हेली मॅथ्यूज आणि स्टेफनी टेलर या वेस्टइंडीजच्या सलामीवीरांनी झळकाविलेल्या अर्धशतकांमुळे वेस्टइंडीजच्या महिलांनी ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच टी-२० विश्वकरंडकावर आपले नाव कोरले.
  • महिलांच्या टी-२० विश्वकरंडक क्रिके़ट स्पर्धेत वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ईडन गार्डन्स मैदानावर अंतिम सामना खेळविला गेला.
  • बलाढ्य ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात वेस्टइंडीजसमोर विजयासाठी १४९ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान विंडीजच्या महिलांनी सहजरित्या पूर्ण करत आठ गडी राखून विजय मिळविला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा