चालू घडामोडी : १० एप्रिल

आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचा उत्तर कोरियाचा दावा

  • अमेरिकेवरही अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतल्याचे उत्तर कोरियाने १० एप्रिल रोजी जाहीर केले.
  • उत्तर कोरियाने गेल्या काही महिन्यांपासून वारंवार क्षेपणास्त्र चाचण्या घेत अमेरिका आणि दक्षिण कोरियावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
  • कोरियाने आपली मारक क्षमता वाढविली असली, तरी अमेरिकेवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यासाठी या देशाला आणखीही बरीच तयारी करावी लागणार आहे.
  • या देशाकडे अचूक मारा करू शकतील, असे आंतरखंडीय क्षेपणास्त्र नाही. तिथेच अमेरिकेकडे मात्र उत्तर कोरियाच्या कोणत्याही भागात अचूक मारा करून, प्रचंड मनुष्यहानी करू शकतील, अशी असंख्य क्षेपणास्त्रे आहेत.
  • उत्तर कोरियाने अंतरमहाद्वीपीय बैलिस्टिक रॉकेट इंजिनच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली असली तरी दक्षिण कोरियाच्या सूत्रांच्या मतानुसार उत्तर कोरियाकडे असे कोणतेही विश्वसनीय इंजिन नाही.
 संयुक्त राष्ट्राची बंदी 
  • संयुक्त राष्ट्राने यापूर्वीच उत्तर कोरियावर अनेक बंधने लादली आहेत. पण उत्तर कोरिया कोणत्याच बंधनाला जुमानत नाही. 
  • संयुक्त राष्ट्राने नुकतेच उत्तर कोरियावर कोणतीही आंतरखंडीय कृती करण्यावर बंदी घातली होती. पण उत्तर कोरियाने या बंधनांना झुगारून मध्यम पल्ल्याच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले होते.
  • २०१४ नंतर उत्तर कोरियाचे हे पहिलेच मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण होते.

प्रियदर्शनी चॅटर्जी ‘मिस इंडिया वर्ल्ड २०१६’

  • फॅशन जगताचे लक्ष लागलेल्या सौंदर्य स्पर्धेत दिल्लीच्या प्रियदर्शनी चॅटर्जी हिने बाजी मारत ‘मिस इंडिया वर्ल्ड २०१६’चा किताब पटकाविला. 
  • बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुख खानने प्रियदर्शनीच्या नावाची घोषणा केली. आता प्रियदर्शनी आता ‘मिस वर्ल्ड २०१६’ सौंदर्यस्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 
  • बंगळूरची सुश्रुती कृष्णा हिला प्रियदर्शनीच्या पाठोपाठ प्रथम उपविजेतीचा मान मिळाला, तर लखनौची पंखुरी गिडवानी ही द्वितीय उपविजेती ठरली.
  • यामुळे सुश्रुता कृष्णा ही ‘मिस इंटरनॅशनल २०१६’ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. तसेच, पंखुरा गिडवानी ही ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१६’ स्पर्धेत सहभागी होईल. 

‘ब्रिक्स’ची मुंबईत तीनदिवसीय परिषद

  • ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांची संघटना असलेल्या ‘ब्रिक्स’ची तीन दिवसांची परिषद १४ ते १६ एप्रिल दरम्यान मुंबईत पार पडली.
  • ब्रिक्स देशांचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर भारतात होत असलेली ही पहिलीच परिषद असेल. शहर विकास ही या परिषदेची मूळ संकल्पना आहे.
  • नागरी वाहतूक, पायाभूत सुविधांसाठीचे वित्तीय व्यवस्थापन, शाश्वत शहरे, परिणामकारक जनसुविधा पुरविणे, परवडणारी घरे, जमिनींचा परिणामकारक वापर या विषयांवर परिषदेत व्यापक चर्चा झाली.
  • १४ तारखेला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. मेक इन इंडियाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणूनही या परिषदेला महत्त्व आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा