चालू घडामोडी : १४ एप्रिल

‘नाम’ या ई-ट्रेडिंग मंचाचे उद्घाटन

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीच्या मुहुर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नाम’ या ई-ट्रेडिंग मंचाचे उद्घाटन झाले.
  • राष्ट्रीय कृषी बाजारपेठ (नाम) योजनेंतर्गत देशातील ८ राज्यांमधील २१ घाऊक कृषी बाजारपेठांचा/मंडई एकत्रित ऑनलाईन मंच स्थापन करण्यात आला आहे.
  • सरकारच्या राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत मार्च २०१८पर्यंत देशातील ५८५ नियंत्रित बाजारपेठांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. 
  • मंचासाठी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर गुजरात, तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाना, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या आठ राज्यांची निवड करण्यात आली आहे.
  • एकत्रित ऑनलाईन मंचामुळे शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि ग्राहकांनादेखील स्थिर दराने उत्पादने उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच यामुळे विक्री प्रक्रिया व किंमत प्रक्रिया पारदर्शक होईल.
  • ऑनलाईन बाजारपेठ स्थापन झाल्यानंतरदेखील कृषी उत्पादनांची बाजारपेठेत किंवा मंडईत विक्री सुरु राहील, परंतु ऑनलाईन बाजारपेठेमुळे व्यवहार खर्च कमी होईल.
  • शिवाय, सर्व बाजारपेठांसाठी एकच परवाना मिळेल, गुणवत्ता चाचणी सुरु राहील आणि देशभरात एकच कर आकारला जाईल.
  • सर्व बाजार समित्यांना जोडण्याच्या ‘नाम’ प्रकल्पाची घोषणा गेल्या वर्षी जुलैमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली.
  • शेतकऱ्यांना या ई-ट्रेडिंग व्यासपीठावरून तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाल्याचे पदार्थ २१ उत्पादनांची विक्री करता येणार आहे.

‘ग्रामोदय से भारत उदय’ मोहिमेचा शुभारंभ

  • भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महू येथील एका जाहीर सभेत ‘ग्रामोदय से भारत उदय’ मोहिमेचा शुभारंभ केला.
  • १४ ते २४ एप्रिल २०१६ दरम्यान होणाऱ्या ‘ग्रामोदय से भारत उदय’ मोहिमेत गावात करायच्या विकास कामांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
  • या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी आणि खेडेगावांना समर्पित असल्याचे ते म्हणाले. विकास उपक्रमांचा केंद्रबिंदू ग्रामीण विकास असला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

भारत आणि बांगलादेश दरम्यान सामंजस्य करार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, भारत आणि बांगलादेश दरम्यान, सप्टेंबर २०११मध्ये मत्स्य व्यवसाय आणि संबंधित क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याबाबत, सामंजस्य करारावर झालेल्या स्वाक्षऱ्याबाबत माहिती देण्यात आली.
  • या सामंजस्य करारामुळे भारत आणि बांगलादेशमधील मैत्रीपूर्ण संबंध मजबूत झाले असून मत्स्यव्यवसाय तसेच संबंधित क्षेत्रात सहमतीने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीद्वारे सहकार्य विकासाला चालना मिळाली आहे.
  • हा  सामंजस्य करार पाच वर्ष अंमलात राहणार आहे. हा करार रद्द करण्याच्या हेतूबाबत दोन्ही बाजू किमान ६ महिने आधी पूर्व लेखी सूचना देत नाहीत तोवर दोन्ही बाजूंच्या संमतीने हा सामंजस्य करार आणखी कालावधीसाठी वाढवता येऊ शकेल.
 भारत आणि युएई दरम्यान मानवी तस्करीबाबत करार 
  • तसेच या बैठकीत भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान मानवी तस्करीला प्रतिबंध करणे आणि त्याच्याशी लढा देण्याबाबत सहकार्य करण्यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी मंजूरी देण्यात आली.
  • या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांतील मैत्रीचे बंध अधिक दृढ होतील आणि मानवी तस्करी विशेषत: स्त्रिया आणि मुलांच्या तस्करीशी संबंधित प्रतिबंध, सुटका, पुन्हा ताब्यात घेणे आणि परत पाठवणी या मुद्दयांबाबत द्विपक्षीय सहकार्यात वाढ होईल.

आयजीएनसीएचे संचालक मंडळ बरखास्त

  • राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे (आयजीएनसीए) संचालक मंडळ केंद्र सरकारने तडकाफडकी बरखास्त करून वीस सदस्यांच्या नव्या संचालक मंडळाची नियुक्ती केल्याची घोषणा केली.
  • ज्येष्ठ पत्रकार राम बहादूर राय यांची संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राय यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेचे संचालक मंडळ प्रथमच संपूर्णपणे बदलण्यात आले आहे. 
  • तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी नोव्हेंबर १९८५ मध्ये भारतीय कलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था स्थापन केली व तिला इंदिरा गांधी यांचे नाव दिले.
  • चिन्मय घरेखान यांच्या अध्यक्षतेखालील बरखास्त संचालक मंडळात कपिला वात्स्यायन, नमिता गोखले, फिरोज गुजराल, कुलभूषण खरबंदा, शोभना नारायण, सलमान हैदर, सुभाष पाणी, नयनज्योत लाहिरी आदी संचालक होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा