चालू घडामोडी : ८ मे

वासुदेव कामत सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप पुरस्कार

  • जागतिक ख्यातीचे भारतीय चित्रकार वासुदेव कामत यांना पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेने ‘सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप’ हा पुरस्कार दिला आहे.
  • जे चित्रकार पोर्ट्रेट पेंटर म्हणून अविरतपणे निर्मिती करीत आहेत, या विषयाचे प्रशिक्षण देत आहेत, अशांना पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेतर्फे ‘सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप’ हा पुरस्कार देण्यात येतो.
 पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका 
  • चित्र व शिल्पकला क्षेत्रात पोर्ट्रेटला प्रोत्साहन देणारी ही आंतरराष्ट्रीय संस्था असून, जगभरातील अनेक नामवंत पेंटर्स या संस्थेचे सभासद आहेत.
  • दर चार वर्षांनी होणाऱ्या या संस्थेच्या परिषदेत व आंतरराष्ट्रीय पोर्ट्रेट स्पर्धेत जगातील ७०० ते ८०० कलाकार सहभागी होत असतात. त्यातील अंतिम विजेत्यांची चित्रे प्रदर्शनात प्रदर्शित केली जातात.
  • कामत यांच्या माय वाइफ या पोर्ट्रेटला २००६ साली ड्रेपर ग्रँड प्राइझ या पुरस्काराने गौरवले होते. यंदा एप्रिलमध्ये झालेल्या परिषदेत त्यांना सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप या पुरस्काराने गौरविले.

माद्रिद ओपन टेनिस स्पर्धा

  • जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल पुरूष खेळाडू असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत अँडी मरेला नमवून स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले.
  • जोकोविचने मरेचा ६-२, ३-६, ६-३ असा थेट पराभव करत अंतिम फेरी जिंकली. 
  • माद्रिद ओपन स्पर्धेच्या या विजेतेपदामुळे जोकोविचने स्पेनच्या राफेल नदालला मागे टाकत ‘२९ एटीपी मास्टर्स’ टायटल्स पटकावली आहेत.
  • या पराभवामुळे अँडी मरेने त्याचे जागतिक क्रमवारातील द्वितीय मानांकन गमावले असून रॉजर फेडरर आता दुसऱ्या स्थानावर आला आहे.
  • जागतिक टेनिसमधील सातव्या क्रमांकाची रोमानियाच्या सिमोना हालेपने माद्रिद मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरी गटाचे विजेतेपद उंचावले.
  • अंतिम सामन्यात वर्चस्व राखताना हालेपने स्लोवाकियाच्या डोमिनिका सिबुकोवाचा ६-२, ६-४ असा पराभव केला.
  • मागील १४ महिन्यांत हालेपचे हे पहिलेच डब्ल्यूटीए विजेतेपद ठरले. तसेच हालेपने कारकिर्दीतील एकूण १२वे जेतेपदही पटकावले.

पाकचे मानवाधिकार कार्यकर्ते खुर्रम झाकी यांची हत्या

  • पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्ते खुर्रम झाकी व त्यांचे मित्र राव खालीद यांची धार्मिक दहशतवादाविरोधात ठोस भूमिका घेतल्याने कराची येथे अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.
  • झाकी हे न्यू कराची भागातील सेक्टर ११ येथे रात्रीचे जेवण उरकून हॉटेलमधून बाहेर पडले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली आहे.
  • हल्लेखोरांनी झाकी व खालीद यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यात बाजूला असलेला एक जण जखमी झाला तर झाकी व खालीद हे गंभीर जखमी झाले, रूग्णालयात नेले असता त्या दोघांना मृत घोषित करण्यात आले.
  • झाकी हे माजी पत्रकार होते. तसेच ‘लेट अस बिल्ड पाकिस्तान’ (एलयूबीपी) नावाची वेबसाइट आणि फेसबुक पेजचे संपादक म्हणून ते काम करीत होते.
  • उदार धार्मिक मतांचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला होता. लाल मसजीद प्रकरणात शिया मुस्लिमांविरोधात हिंसा भडकावणाऱ्या मौलाना अब्दुल अझीझ याच्या विरोधात त्यांनी मोहीम चालवली होती.

सौदी अरेबियाचे तेलमंत्री पदमुक्त

  • मागील २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून सौदी अरेबियाच्या तेलमंत्री पदावर कार्यरत असलेले अल-नईमी यांना पदमुक्त करण्यात आले आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर ठरवणाऱ्या 'ओपेक' संस्थेत सौदीचे प्रतिनिधी या नात्याने त्यांनी तेलमंत्री असतानाच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सौदीचे तेलमंत्री म्हणून त्यांना प्रचंड मान होता. 
  • इराणने तेलाचे उत्पादन आणि निर्यात यात वाढ केल्यामुळे तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घसरले. तेलाच्या दरातील ही घसरण सावरण्यासाठी 'ओपेक'ने बरेच अयशस्वी प्रयत्न केले.
  • सौदीचे तेलमंत्री अल-नईमी यांनी आपल्या ओळखींचा तसेच राजकीय ताकदीचा वापर करुनही ही परिस्थिती सावरली नाही. तेलाच्या दरातील घसरणीमुळे सौदीचा तेलातून येणारा महसूल कमी झाला.
  • या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून अल-नईमी यांची तेलमंत्रीपदावरुन हकालपट्टी झाली आहे. औद्योगिक क्षेत्र आणि खनिज संपत्ती मंत्री खालिद अल-फतेह यांच्याकडे सौदीच्या तेल खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा