चालू घडामोडी : ८ जून

भारताचा ‘एमटीसीआर’मध्ये प्रवेश

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये ‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजीम’मध्ये (एमटीसीआर) भारताचा प्रवेश झाला आहे.
  • ही संघटना श्रीमंत देशांची मक्तेदारी मानली जाते; आता या संघटनेत भारताचा प्रवेश झाल्याने विकसित देशांप्रमाणे आपल्यालाही आधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळू शकेल.
  • या संघटनेतील भारताच्या प्रस्तावित प्रवेशाबाबत कोणत्याही सदस्य देशाने विरोध न केल्याने भारताचा या संघटनेतील प्रवेश सोपा झाला.
  • या संघटनेचे सदस्य होता यावे म्हणून भारताने मागील वर्षीच अर्ज केला होता; पण सदस्य राष्ट्रांनी विरोध केल्याने हा प्रवेश बारगळला होता.
  • याबरोबरच आण्विक पुरवठादार देशांच्या समूहाचे (एनएसजी) सदस्यत्व भारताला मिळावे म्हणूनही अमेरिकेने आपला पाठिंबा दिला आहे.
 मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजीम (एमटीसीआर) 
  • जगातील आघाडीचे क्षेपणास्त्रनिर्मिती करणारे ३४ देश हे ‘एमटीसीआर’चे सदस्य आहेत. या गटाची स्थापना १९८७मध्ये झाली.
  • रासायनिक, जैविक आणि आण्विक शस्त्रांचा मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे आणि अन्य मानवरहित यंत्रणांचा प्रसार रोखण्याचे उद्दिष्ट या गटाचे आहे.
  • ‘एमटीसीआर’च्या नियमांचे २००८पासून पालन करणाऱ्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश आहे. एमटीसीआरमधील प्रवेशामुळे भारताला आता अमेरिकेकडून ड्रोन विमाने खरेदी करणेही शक्य होणार आहे.

अॅमेझॉनची भारतात आणखी तीन अब्ज डॉलर गुंतवणूक

  • अमेरिकेतील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतात आणखी तीन अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • या गुंतवणूकीमुळे भारतातील स्टार्टअप उद्योगाला चालना मिळेल, तसेच कल्पक आणि डिजिटल उद्योजकतेचे प्रमुख केंद्र म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत होईल.
  • यावेळी पार पडलेल्या एका कार्यक्रमात अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांना मोदींच्या हस्ते जेफ आंतरराष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • अॅमेझॉन भारतातील हैदराबाद येथे यावर्षी ‘वेब सर्व्हिसेस क्लाऊड रिजन’ स्थापन करणार आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.

मारिया शारापोवावर दोन वर्षांची टेनिस बंदी

  • पाच ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणारी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवाला मेलडोनियम या प्रतिबंधित उत्तेजकाच्या सेवनप्रकरणी दोषी आढळल्याने दोन वर्षांच्या टेनिस बंदीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  • बंदीविरोधात शारापोव्हाने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेदरम्यान शारापोवा उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) मार्चपासूनच तिच्यावर तात्पुरती बंदी घातली होती.
  • मार्च महिन्यात पत्रकार परिषदेद्वारे या चाचणीत दोषी आढळल्याचे शारापोव्हाने जाहीर केले. वैद्यकीय उपचारांचा भाग म्हणून २००६पासून मेलडोनियमचा समावेश असलेले औषध घेत होते, अशी कबुली शारापोव्हाने दिली.
  • जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेने (वाडा) यंदा २०१६च्या सुरुवातालीला या औषधाचा समावेश बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये करण्यात आला.
  • मात्र ही यादी शारापोव्हाने वाचली नाही. त्यामुळे गेली कित्येक वर्षे सेवन करत असलेले औषध बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत असल्याचे तिला कळले नाही.
  • टेनिस संघटनेच्या आचारसंहितेनुसार उत्तेजक सेवनप्रकरणी दोषींसाठी चार वर्षांच्या बंदीची तरतूद आहे. मात्र शारापोव्हाने स्वत:हून चुकीची कबुली दिल्याने शारापोव्हाच्या शिक्षेचा कालावधी कमी झाला.
  • याबाबत सविस्तर पार्श्वभूमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

‘व्हिसलिंग वूड्‌स’मध्ये लता मंगेशकर शिष्यवृत्ती

  • व्हिसलिंग वूड्‌स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटने नुकतेच दहाव्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष दिग्दर्शक सुभाष घई यांनी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने शिष्यवृत्तीची घोषणा केली. 
  • सुभाष घई त्यांची मुलगी मेघना आणि काही विद्यार्थ्यांनी लता मंगेशकर यांची भेट घेतली. लता मंगेशकर यांना ‘व्हिसलिंग वूड्‌स माएस्ट्रो अवॉर्ड’ स्वीकारण्याची विनंती त्यांनी केली.
  • लता मंगेशकर शिष्यवृत्तीद्वारे विद्यार्थ्यांना दोन-तीन वर्षे १०० टक्के शुल्कमाफी दिली जाईल. 
  • ‘व्हिसलिंग वूड्‌स’मध्ये तीन वर्षांपासून ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या नावानेही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा