चालू घडामोडी : २ ऑगस्ट

नरसिंग यादव निर्दोष

  • उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आलेला कुस्तीपटू नरसिंग यादव याला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अर्थात 'नाडा'ने नरसिंगला क्लीन चीट देत त्यांच्यावरील बंदी मागे घेतली.
  • त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा नरसिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. 
  • यापूर्वी नाडाने घेतलेल्या डोपिंग चाचणीत नरसिंगच्या रक्तात प्रतिबंधित स्टेरॉईडचा अंश आढळून आला होता.
  • आपल्या खाण्यात कुणीतरी भेसळ केल्याचा आरोप त्याने केला होता. त्याच्या या आरोपांची शहानिशा करण्यासाठी 'नाडा'ने समिती नेमली होती. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर 'नाडा'ने नरसिंगला आरोपमुक्त केले. 
  • नरसिंग हा प्रतिस्पर्ध्यांच्या कारस्थानाचा बळी ठरला होता. त्यानं स्वत:हून काहीही चुकीचं केलेलं नाही, असे 'नाडा'ने स्पष्ट केले.

चीनकडून अणवस्त्रप्रसार बंदीच्या नियमांचे उल्लंघन

  • अणवस्त्र प्रसारबंदीच्या प्रगतीचा आढावा घेताना आयएईएने (आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्था) तयार केलेल्या अहवालात, चीनने पाकिस्तानला अणूभट्टया देऊन अणवस्त्रप्रसार बंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.
  • चीनने २०१३ मध्ये पाकिस्तानला चष्मा ३ रिअॅक्टर देण्याचा करार केला. चीनने असे करुन अणवस्त्र तंत्रज्ञान पुरवठयासंबंधी अणवस्त्र प्रसारबंदी परिषदेत (एनपीटी) २०१०मध्ये एकमताने ठरलेल्या नियमाचे उल्लंघन केले आहे.
  • एनपीटी परिषदेत आयएईएच्या दिशा-निर्देशांचे पालन करणाऱ्या देशालाच अणवस्त्र तंत्रज्ञान देण्याचे एकमताने ठरवण्यात आले होते. परंतु पाकिस्तान आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्थेच्या (IAEA) दिशा-निर्देशांनुसार काम करत नाही.
  • एनपीटी करारवर स्वाक्षरी केलेले १८७ देश नागरी उद्देशासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएईए) मार्गदर्शनाखाली अणुऊर्जेची निर्मिती आणि वापर करू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा