चालू घडामोडी : १ सप्टेंबर

भारतात जैन समाज सर्वाधिक साक्षर

  • भारतात मुस्लिम समाजात निरक्षरांची संख्या सर्वात जास्त असून, सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण जैन धर्मात असल्याची माहिती समोर आली आहे.
  • केंद्र सरकारने २०११च्या जनगणनेच्या आधारे धर्म आणि लिंगाधारित ही शैक्षणिक आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे.
  • मुस्लिमांच्या १७.२२ कोटी लोकसंख्येपैकी ७.३५ कोटी लोक निरक्षर आहेत. यातील २.८२ कोटी सहा वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. 
  • ९६.६ कोटी हिंदूंपैकी ३५.१६ कोटी (३६.४० टक्के) हिंदू निरक्षर आहेत. ख्रिश्चनांच्या २.७८ कोटी संख्येपैकी ७१.३७ लाख निरक्षर आहेत.
  • साक्षरतेच्या बाबतीत सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण जैन धर्मात ८६.४० टक्के ऐवढे आहे. त्यानंतर ख्रिश्चन समाजाचा क्रमांक लागतो. या समाजात साक्षरतेचे प्रमाण ७४.३० टक्के ऐवढे आहे.
  • बौद्ध धर्मात साक्षरतेचे प्रमाण ७१.८ टक्के, शीखांमध्ये ६७. ५ टक्के, हिंदूंमध्ये ६३. ६ टक्के आणि मुसलमानांमध्ये ५७. ३ टक्के ऐवढे आहे.
  • देशातल्या सर्व धर्मांना एकत्र करुन बघितले तर एकूण लोकसंख्येच्या ५.६३ टक्के लोकांनाच पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेता आले.
  • संपूर्ण देशाचा विचार केल्यास एकूण लोकसंख्येच्या ३६.९० टक्के लोकसंख्या निरक्षर आहे.

डिल्मा रूसेफ यांच्याविरोधात महाभियोग संमत

  • ब्राझीलच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा डिल्मा रूसेफ यांच्याविरोधात महाभियोग संमत झाला असून त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
  • रूसेफ यांच्यावर राष्ट्रीय अंदाजपत्रकात अवैधरित्या बदल केल्याचा आरोप होता. ८१ पैकी ६१ सिनेट सदस्यांनी त्यांच्याविरोधात मतदान केले.
  • रूसेफ यांचे विरोधक मायकल टेमर यांची ब्राझीलच्या नव्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
  • टेमर हे माजी राष्ट्राध्यक्ष असून रूसेफ यांची सत्ता उलथवण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
  • ७५ वर्षीय टेमर हे चीनमधील जी २० देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होऊन आपल्या कार्याला प्रांरभ करतील.
  • रूसेफ यांनी २०१४ मध्ये अंदाजपत्रकात बदल करून राजकीय कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. सध्या ब्राझील आर्थिक संकटात आहे.
  • रूसेफ यांच्याविरोधात महाभियोग संमत झाला असला तरी त्यांच्यावर आठ वर्ष कोणतेही पद घेण्यावर बंदी लादण्याचा ठराव मात्र संमत झालेला नाही.

चीनकडून पाकिस्तानला आठ अत्याधुनिक पाणबुड्या

  • चीनकडून पाकिस्तानला आठ अत्याधुनिक युद्धसज्ज पाणबुड्या मिळणार आहेत.
  • २०२८पर्यंत पाकिस्तानला या पाणबुडय़ा मिळणार आहेत. ५ अब्ज डॉलर इतकी मोठी रक्कम पाकिस्तान या पाणबुड्यांसाठी मोजणार आहे.
  • या नव्या अत्याधुनिक पाणबुड्यांमुळे पाण्याखालून अणुहल्ला करण्याची क्षमता पाकिस्तानला प्राप्त होणार आहे.
  • सध्या पाकिस्तानी नौदलाकडे ऑगस्टस प्रकारातील पाच आणि ‘एमजी ११०’ प्रकारच्या तीन पाणबुड्या आहेत.
 भारताशी शस्त्रस्पर्धा 
  • भारताच्या शस्त्रसंपन्नतेशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तान आणि चीन मिळून ‘जेएफ-१७ थंडर’ या लढाऊ  विमानाची निर्मिती करत आहेत.
  • पाकिस्तानी सैन्यदलात प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या रणगाडय़ांची निर्मितीही पाकिस्तान आणि चीनने एकत्रितपणे केली आहे.
  • पाकिस्तानी नौदलाने २००६ मध्ये ‘एफ-२२’ प्रकारच्या चार युद्धनौकांची आणि ‘हार्बीन झेड-९ इसी’ प्रकारच्या १२ हेलिकॉप्टरची खरेदी केली आहे.
  • त्यातील काहींची निर्मिती चीनमध्ये, तर काहींची निर्मिती पाकिस्तानातच चीनच्या मदतीने झाली आहे.

टेन स्पोर्ट्सचे सोनी नेटवर्क्सकडून अधिग्रहण

  • माध्यम क्षेत्रातील झी समूहातील टेन स्पोर्ट्ससह काही वाहिन्यांची सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने २,५७९ कोटी रुपयांना खरेदी केली आहे.
  • झी एंटरटेनमेंट अखत्यारीतील टेन स्पोर्ट्स नेटवर्क्सद्वारे टेन स्पोर्ट्ससह टेन क्रिकेट, टेन गोल्फ एचडी, टेन१-२-३ आदी वाहिन्याही आता सोनीच्या व्यवसायांतर्गत समाविष्ट झाल्या आहेत.
  • टेन स्पोर्ट्स नेटवर्क्‍समधील टेन गोल्फ एचडी, टेन क्रिकेट, टेन स्पोर्ट्स आदी चॅनेलचे मालदीव, सिंगापूर, हाँगकाँग, मध्य पूर्व देशांमध्ये प्रसारण होते.
  • झी समूहाने टेन स्पोर्ट्स दुबईस्थित अब्दुल रेहमान बख्तीर यांच्या मालकीच्या ताज ग्रुपमार्फत २००६मध्ये खरेदी केले होते.

५७ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

  • नोटीस बजावूनही विवरणपत्राच्या व लेखापरीक्षणाच्या प्रती सादर न केल्यामुळे आणखी ५७ मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
  • त्यामुळे नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांची एकूण संख्या आता २४८ झाली आहे.
  • राज्य निवडणूक आयोगाकडे ३६५ राजकीय पक्षांची नोंदणी झाली होती. त्यात १७ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश आहे.
  • प्राप्तिकर विवरणपत्र व लेखापरीक्षणाची प्रत दर वर्षी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
  • परंतु ही कागदपत्रे सादर न केल्यामुळे एकूण ३२६ मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
  • त्यापैकी ७८ पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता केली; परंतु २४८ पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.
  • नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांना मुक्त चिन्ह वाटपात प्राधान्य मिळणार नाही.
  • राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेल्या ३६५ पैकी आता नोंदणी कायम असलेले केवळ ११७ पक्ष आहेत. त्यात १७ मान्यताप्राप्त; तर १०० मान्यता नसलेल्या पक्षांचा समावेश आहे.
  • राज्य निवडणूक आयुक्त : जे. एस. सहारिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा