चालू घडामोडी : १३ ऑक्टोबर

बॉब डिलन यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार

  • अमेरिकी गायक आणि गीतकार बॉब डिलन यांना २०१६चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • गेली ५४ वर्षे बॉब यांनी सतत नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांमध्ये स्विडीश अकादमीने बॉब यांचे कौतुक केले.
  • ७५ वर्षीय डिलन यांचे लिखाण पारंपारिक लिखाण पद्धतीला छेद देणारे आहे. साचेबद्ध लिखाण न करता वेगळ्या पद्धतीने लिखाण करणे हे डिलन यांचे वैशिष्ट्य आहे.
  • बॉब डिलन यांनी अमेरिकी गायन संस्कृतीत नवे काव्य निर्माण केले असून, त्यांच्या या काव्यासाठीच त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे.
  • बॉब डिलन हे नोबेल पुरस्कार पटकावणारे २५९ अमेरिकन आहेत. तर साहित्यासाठी नोबेल पुरस्कार पटकावणारे बॉब डिलन हे नववे अमेरिकन साहित्यिक आहेत.
  • १९९३मध्ये कादंबरीकार टोनी मॉरिसन यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
  • मॉरिसन यांच्यानंतर २३ वर्षांनी बॉब डिलन यांच्या रूपाने एखाद्या अमेरिकन व्यक्तीला साहित्याचे नोबेल मिळाले आहे.
  • पहिल्यांदाच एका गीतकाराला त्याच्या गाण्यासाठी नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
 बॉब डिलन यांच्याबद्दल 
  • डिलन यांचा जन्म १९४१साली रॉबर्ट अलेन झिमरमनमध्ये झाला. १९६०साली त्याच्या उत्कृष्ट गायन शैलीने ते प्रसिद्धीच्या झोतात आले.  
  • त्याआधी मिनेसोटा इथल्या कॉफी हाऊसमधून १९५९साली त्यांनी संगीत कारकिर्दीला सुरुवात केली.
  • डिलन यांनी पारंपरिक संगीतासोबतच अन्य प्रकारच्या संगीतातही अनेक प्रयोग केले आणि ते श्रोतांच्या पसंतीलाही उतरले.
  • ‘ब्लोइंग इन द विंड’, ‘लाईक अ रोलिंग स्टोन’ आणि ‘द टाइम्स दे आर चेंजिंग’ ही डिलनची तीन गाणी  जागतिक पातळीवर लोकप्रिय ठरली.
  • अमेरिकी नागरी हक्कासाठीची मोहीम, व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळ यांना या गीतांनी प्रेरणा दिली.
  • त्याकाळी दुभंगलेल्या समजात तरुणांना आपल्या मनातील विचारांना शब्दरूप देत असल्याची भावना या गाण्यांनी दिली.
  • साध्या शब्दांतून समतेचे, एकात्मतेचे तत्व सांगण्याची त्याची शैली लोकांनी उचलून धरली आणि रॉकस्टार बनायच्या ऐवजी तो लोकसंगीताला मुख्य प्रवाहातील संगीत बनविणारा शिलेदार ठरला.

कौटुंबिक हिंसाचार कायद्यात अमुलाग्र बदल

  • सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमॅस्टिक व्हायलन्स अ‍ॅक्ट’ या कायद्यातील ‘प्रौढ पुरुष’ हे शब्द काढून त्यात आमुलाग्र बदल केला आहे.
  • या बदलामुळे आता छळ करणाऱ्या घरातील पुरुषांसोबत महिलांही या कायद्याच्या चौकटीत येणार आहेत.
  • घरातीलच व्यक्तींकडून होणाऱ्या छळापासून महिलांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने २००५मध्ये  हा कायदा केला होता. 
  • या कायद्याच्या कलम २ मध्ये कायद्यात वापरलेल्या विविध शब्द/ शब्दावलींच्या व्याख्या दिल्या आहेत.
  • त्यापैकी पोटकलम २(क्यू)मध्ये ‘प्रतिवादी’ची म्हणजे या कायद्यानुसार ज्यांच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येईल अशा व्यक्तींची व्याख्या आहे. 
  • त्यात तक्रारदार महिलेने ज्याच्याविरुद्ध तक्रार केली आहे, अशी घरातील कोणीही प्रौढ पुरुष व्यक्ती, असे म्हटले होते.
  • न्यायालयाने यातून ‘प्रौढ पुरुष’ हे दोन शब्द काढून टाकल्याने प्रतिवादीची व्याख्या घरातील फक्त प्रौढ पुरुषांपुरती मर्यादित राहिलेली नाही.
  • आता तक्रारदार महिलेचा छळ करणारी घरातील व्यक्ती पुरुष असो वा स्त्री, या दोघांविरुद्धही न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • न्यायालय म्हणते की, घरात छळ होणाऱ्या महिलांना हर तऱ्हेचे संरक्षण देण्याच्या उद्देशाने कायदेमंडळाने हा कायदा केला आहे.
  • कायद्यास अपेक्षित असलेला छळ लिंगसापेक्ष नाही. तसेच शारीरिक, मौखिक, भावनिक आणि आर्थिक अशा सर्व प्रकारच्या छळास हा कायदा लागू होतो.

राष्ट्रीय भूगर्भविज्ञान उपक्रमाचे ओडिशामध्ये उद्घाटन

  • ओडिशा राज्यातील बालेश्वर जिल्ह्यात तरंगा येथे केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते राष्ट्रीय भूगर्भविज्ञान उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
  • तेल आणि नैसर्गिक वायूसारखेच भूगर्भातील हायड्रोकार्बन वायूचा साठा शोधण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
  • ओडिशातील महानदीच्या खोऱ्यातून याची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी ७९.५७ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
  • या उपक्रमांतर्गत ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) तसेच ऑइल इंडिया लिमिटेड देशभरात सर्व्हे करणार आहे.
  • या सर्व्हेमुळे भूगर्भातील तेलपद्धतीचा सखोल अभ्यास होणार आहे, तसेच ओडिशातील हायड्रोकार्बनच्या साठ्याचा शोध लागल्यानंतर राज्यातील गुंतवणुकीचा ओघ वाढेल.

पुण्यामध्ये विश्व पंजाबी संमेलन

  • गुरू गोविंदसिंगजी यांच्या ३५०व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने पुण्यात १८, १९ व २० नोव्हेंबर रोजी विश्व पंजाबी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • या संमेलनात भारताच्या विविध राज्यातील तसेच कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह विविध देशातले पंजाबी लेखक, साहित्यिक, कवी, समीक्षक व पंजाबी साहित्यप्रेमी बांधव सहभागी होणार आहेत.
  • पंजाब सरकार, महाराष्ट्र सरकार व पुणे महापालिकेच्या सहकार्याने संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी पुणे येथील सरहद संस्थेने स्वीकारली आहे.
  • संमेलनासाठी पुण्याच्या गणेश कला क्रीडा केंद्राचे गुरू गोविंदसिंग नगरी असे नामकरण करण्यात येणार आहे.
  • गत वर्षी संत नामदेवांची कर्मभूमी पंजाबमधील घुमान येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात विश्व पंजाबी साहित्य संमेलन पुण्यात भरवण्याची घोषणा झाली होती.
  • पुणे येथील विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान विख्यात पंजाबी साहित्यिक पद्मश्री डॉ. सुरजीत पट्टर भूषवणार आहेत.
  • जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा हे संमेलनाच्या समारोपाचे प्रमुख अतिथी असतील.
  • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे या कार्यक्रमाचे मुख्य पुरस्कर्ते आहेत.

आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारत अव्वल

  • भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारताने अव्वल स्थान मिळविल्याबद्दल आयसीसीची कसोटी अजिंक्यपदाची गदा बहाल करण्यात आली.
  • भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांच्या हस्ते विराटला ही गदा देण्यात आली. भारताने पाकिस्तानला मागे टाकून हा क्रमांक मिळवला.
  • भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरी आणि अखेरची कसोटी संपल्यानंतर हा सोहळा पार पडला.
  • कोलकाता येथील दुसऱ्या कसोटीत विजय मिळविल्यानंतर भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वलस्थान पक्के झाले होते.
  • भारताने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना ३२१ धावांनी जिंकल्यानंतर औपचारिकरित्या भारताच्या कसोटीतील प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब झाले.
  • महेंद्रसिंग धोनीने यापूर्वी अव्वल क्रमांकासाठी ही गदा स्वीकारली होती. त्यानंतर हा मान मिळवणारा विराट हा भारताचा दुसरा कप्तान ठरला आहे.

मालदीव ‘कॉमनवेल्थ’मधून बाहेर पडणार

  • मालदीव सरकारने १३ ऑक्टोबर रोजी कॉमनवेल्थ देशांच्या गटातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.
  • कॉमनवेल्थ गटात आपल्याला अन्यायकारक व अयोग्य वागणूक मिळत असून त्यामुळे देशाच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ केली जात असल्याचे मालदीव सरकारच्या परराष्ट्र खात्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
  • कॉमनवेल्थ गटाकडून काही दिवसांपूर्वी मालदीवला लोकशाही सरकारच्या कारभारात सुधारणा न केल्यास सदस्यत्व रद्द करण्याची धमकी देण्यात आली होती.
  • आंतरराष्ट्रीय राजकारणात संघटनेशी संबंधित देशांची पत वाढविण्यासाठी आणि फायद्यासाठी आमचा वापर केला जात असल्याचे मालदीवने म्हटले आहे.
  • या पार्श्वभूमीवर मालदीवकडून कॉमनवेल्थ गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • अनेक दशकांच्या हुकुमशाहीनंतर मालदीवने २००८ मध्ये बहुपक्षीय लोकशाही राजवटीचा अवलंब केला होता.
  • मालदीवमधून सीरियातील नागरी युद्धात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
  • गेल्या वर्षी मार्च महिन्यात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्या अटकेमुळे मालदीवला न जाण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
  • त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांत कटुता निर्माण झाली आणि मालदीवने चीनच्या पाठिंब्याचे निशाण नाचवण्याचा प्रयत्न केला होता.

थायलंडचे राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचे निधन

  • थायलंडमध्ये भगवान रामासमान असलेले राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचे निधन झाले आहे.
  • थायलंडचे राजा भूमिबोल हे जगात सर्वाधिक जास्त काळ राज्य करणारे सम्राट म्हणून ओळखले जातात.
  • थायलंडचे लोक त्यांना एका वेगळ्याच उंचीवरून पाहत असत. त्यांचे व्यक्तिमत्त्व कनवाळू वडिलांसारखं होते.
  • राजकारणाच्या वरचे स्थान त्यांना प्राप्त होते. थायलंडमध्ये त्यांना एका देवासमान पुजले जात होते.
  • १९३२मध्ये थायलंडमधली राजेशाही संपवण्यात आली. १९३५मध्ये भूमिबोल यांचे काका प्रजादीपोक यांनी राजाचे पद सोडले.
  • त्यानंतर राजाचे पद भूमिबोल यांचे मोठे बंधू आनंद यांना बहाल करण्यात आले. त्यावेळी आनंद हे फक्त ९ वर्षांचे होते.
  • १९४६मध्ये राजा आनंद यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यानंतर वयाच्या १८व्या वर्षी भूमिबोल राजसिंहासनाच्या गादीवर विराजमान झाले.
  • त्यानंतर त्यांनी अविरतपणे जनतेची सेवा केली. भूमिबोल यांना फोटो काढणे, खेळण्याचा छंद होता. ते गाणेही लिहित असत.
  • फ्रान्समध्ये थायलंडचे राजदूत असलेल्या व्यक्तीच्या मुलीशी त्यांचे लग्न झाले. त्यानंतर बँकॉकमध्ये नवे सम्राट म्हणून त्यांचे राज्यरोहण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा