चालू घडामोडी : २ नोव्हेंबर

गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

  • गोव्यात २० नोव्हेंबरपासून ४७वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) होणार आहे.
  • यावर्षी त्यात ८८ देशांतील १९४ उत्तमोत्तम चित्रपट दाखविले जाणार आहेत. कोरियाच्या चित्रपटांवर यावेळी विशेष प्रकाशझोत राहणार आहे.
  •  मात्र सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवात पाकिस्तानातील किंवा पाक कलाकारांची भूमिका असलेला एकही चित्रपट दाखविला जाणार नाही. 
  • गोवा चित्रपट महोत्सव पोलंडचे विख्यात चित्रपट निर्माते आंद्रेज वाजदा यांना समर्पित असून, त्यांच्याच चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ होईल.
  • त्याचप्रमाणे ज्येष्ठ पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
  • या महोत्सवात उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, अभिनेत्री यांना पुरस्कार दिले जातील.
  • तसेच यावर्षीपासून उगवत्या दिग्दर्शकासाठी विशेष पदार्पण पुरस्कारही दिला जाईल. दहा लाख रुपये रोख व मयूर स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप असेल.
 विशेष गांधी सन्मान 
  • यावर्षीपासून युनेस्को व पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी, ध्वनिचित्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एका चित्रपटाला महात्मा गांधींच्या नावे विशेष पदक प्रदान केले जाणार आहे.
  • शांतता, अहिंसा व सहिष्णुतेचा संदेश देणाऱ्या चित्रपटाला हा सन्मान दिला जाईल.

मिरोस्लाव्ह क्लोस फुटबॉलमधून निवृत्त

  • फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याचा विश्वविक्रम करणारा जर्मनीचा फुटबॉलपटू मिरोस्लाव्ह क्लोसने फुटबॉलमधून निवृत्ती स्विकारली आहे.
  • दोन वर्षांपूर्वी क्लोसने जर्मनीला विश्वविजेतेपद जिंकून दिल्यानंतर महिन्याभराच्या आत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला होता.
  • त्यानंतर आता क्लोसने आंतरराष्ट्रीय फुटबॉलसह क्लब फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली आहे.
  • पोलंडमध्ये जन्मलेल्या क्लोसने २००१मध्ये जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले.
  • ब्राझीलमध्ये रंगलेल्या विश्वचषकाच्या सोहळ्यात जर्मनीने अर्जेटिनाला १-० असे हरवून १९९० नंतर प्रथमच विश्वचषकावर मोहोर उमटवली होती.
  • या विश्वचषकात क्लोसने दोन गोल करून ब्राझीलच्या रोनाल्डोचा सर्वाधिक गोलांचा विश्वविक्रम मोडीत काढून नवा अध्याय रचला.
  • त्याने एकूण चार फिफा विश्वचषकात सर्वाधिक १६ गोल्स केले आहेत. याशिवाय जर्मनीकडून १३७ सामन्यांत सर्वाधिक ७१ गोल झळकावण्याच्या विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
  • सलग चार विश्वचषकांत गोल करणारा तो पेले, उवे सीलेर यांच्यानंतरचा तिसरा फुटबॉलपटू ठरला आहे.
  • जर्मनीतर्फे सर्वाधिक १३७ सामने खेळणारा तो लोथार मॅथ्यूज यांच्यानंतरचा दुसरा फुटबॉलपटू आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा नेपाळ दौरा

  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्याला ३ ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे.
  • मागील १८ वर्षांतील भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिलाच नेपाळ दौरा आहे. यावेळी ते नेपाळमधील राजकीय नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. 
  • तीन दिवसांच्या दौऱ्यात मुखर्जी हे ऐतिहासिक पशुपतीनाथ आणि राम जानकी मंदिराला भेट देणार आहेत.
  • काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी या मुखर्जी यांचे स्वागत करतील. मुखर्जी यांच्या सन्मानार्थ भंडारी यांनी भोजन समारंभाचे आयोजित केले आहे.

नामदेव शिरगावकर यांची एएमपीसीच्या सरचिटणीसपदी निवड

  • भारतीय मॉडर्न पेन्टॅथलॉन फेडरेशनचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांची आशियाई मॉडर्न पेन्टॅथलॉन महासंघाच्या (एएमपीसी) सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
  • किरगिझीस्तान येथे नुकतीच एएमपीसीची निवडणूक झाली. यात ३४ वर्षीय शिरगावकर यांनी कोरियाचे सांकेओंग येओ यांच्यावर विजय मिळविला.
  • शिरगावकर यांच्या निवडीने या पदावरील कोरियाची २५ वर्षांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.
  • मॉडर्न पेन्टॅथलॉन या ऑलिम्पिक क्रीडाप्रकारात तलवारबाजी, पोहणे, घोडेस्वारी, धावणे व लेझर गन शूटिंग अशा ५ खेळांचा समावेश आहे.
  • शिरगावकर यांची सरचिटणीसपदी निवड झाल्यामुळे एएमपीसीचे मुख्यालय भारतात स्थलांतरित होणार आहे.
  • शिरगावकर हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा