चालू घडामोडी : ९ नोव्हेंबर

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष

  • बहुचर्चित अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव करुन ऐतिहासिक व धक्कादायक विजयाची नोंद केली.
  • ट्रम्प यांच्या रूपाने अमेरिकेला ४५वे अध्यक्ष मिळाले असून ७० वर्षीय ट्रम्प २० जानेवारी २०१७ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
  • ट्रम्प हे अमेरिकेच्या आतापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांपैकी ते सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष असतील.
  • अमेरिकेच्या ६० वर्षाच्या इतिहासातील प्रशासनाचा कुठलाही अनुभव नसलेले ते पहिले अनुनभवी राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत.
  • व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणाऱ्या ट्रम्प यांना गर्व्हनर, सिनेटर अशा कुठल्याही पदाचा अनुभव नाही.
  • अमेरिकेतील ‘इलेक्टोरल कॉलेज’व्यवस्थेनुसार २७ राज्यांमधील २७६ मते जिंकून ट्रम्प यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
  • ट्रम्प यांच्या तुलनेमध्ये हिलरी यांना केवळ २१८ मतेच मिळविण्यात यश आल्याने डेमोक्रॅट समर्थकांचा मोठाच अपेक्षाभंग झाला.
  • लोकप्रिय मतांमध्येही डोनाल्ड ट्रम्प यांनी ४८ टक्के मत मिळवली तर हिलरींना ४७ टक्के मते मिळाली.
  • अमेरिकेतील मुस्लिम समुदाय, मेक्सिकन वंशाचे नागरिक व स्त्रिया यांच्याविषयीच्या वादग्रस्त विधानांमुळे ट्रम्प जास्त चर्चेत राहिले.
  • अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर ट्रम्प यांचे विविध देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधाबाबत निर्णय महत्वपूर्ण ठरतील.
 निवडून आलेले भारतीय वंशाचे सदस्य 
  • अमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या तीन सदस्यांनी बाजी मारली आहे.
  • कॅलिफोर्निया राज्याच्या ऍटर्नी जनरल कमला हॅरिस यांची सिनेट या अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये निवड झाली आहे. 
  • सिनेटमध्ये निवड झालेल्या हॅरिस या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत.
  • कॅलिफोर्नियामधून सिनेटसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या अमेरिकन कृष्णवर्णीय उमेदवारही ठरल्या आहेत.
  • ५१ वर्षांच्या हॅरिस यांनी  निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या लोरेटा सँचेझ यांना ३४.८ टक्क्यांच्या मताधिक्याने मात दिली.
  • हॅरिस यांचा जन्म ओकलॅंड (कॅलिफोर्निया) येथे झाला असून त्यांची माता भारतीय तर पिता जमैकन-अमेरिकन वंशाचे आहेत.
  • वॉशिंग्टनमधून प्रमिला जयपाल हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये निवडून आल्या आहेत.
  • त्या प्रतिनिधी सभेमध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या आहेत.
  • त्याबरोबरच राजा कृष्णमूर्थी हेसुद्धा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडून आले आहेत. 

कनुभाई गांधी यांचे निधन

  • महात्मा गांधींचे नातू कनुभाई रामदास गांधी यांचे ७ नोव्हेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.
  • प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरत येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
  • तीन वर्षांपूर्वीच ते अमेरिकेतून भारतात परतले होते. तीन महिन्यांपासून ते आपल्या पत्नीबरोबर सुरत येथील राधाकृष्ण मंदिरात राहत होते. 
  • मार्च-एप्रिल १९३०च्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहादरम्यान गुजरातच्या दांडी गावाच्या किनाऱ्यावर महात्मा गांधींनी हाती घेतलेल्या काठीचे एक टोक धरून पुढे चालणारा मुलगा म्हणून कनु प्रसिद्ध होते.
  • पुण्याच्या इंजिनीअरिंग कॉलेजातून १९६१ साली त्यांनी यंत्र-अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले
  • अमेरिकेत ‘मेसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून कनु यांनी १९६९मध्ये उच्चशिक्षण पूर्ण केले.
  • नंतर ‘ते नासा (अमेरिकी अंतराळ संस्था) मध्ये संरक्षणशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते.
  • ते आणि त्यांची पत्नी शिवलक्ष्मी दिल्लीच्या वृद्धाश्रमात राहत असल्याचे समोर आल्यानंतर कनू गांधी चर्चेत आले होते.

अँडी मरेला पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद

  • जागतिक पुरुष एकेरी क्रमवारीत अग्रस्थानी कब्जा केल्यानंतर ब्रिटनच्या अँडी मरेने पॅरिस मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे.
  • तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मरेने अमेरिकेच्या जॉन इस्नरला ६-३, ६-७, ६-४ असे पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले.
  • यंदाच्या मोसमात मरेचे हे आठवे विजेतेपद असून, आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने एकूण १४वे मास्टर्स जेतेपद पटकाविले आहे.
  • रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये त्याने पुरुष एकेरीचे सुवर्ण पटकावून सलग दोनवेळा ऑलिम्पिक सुवर्ण पटकावणारा पहिला टेनिसपटू म्हणून इतिहास रचला आहे.

प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार बापू घावरे यांचे निधन

  • प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार तुकाराम ऊर्फ बापू लक्ष्मण घावरे यांचे ७ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते ७० वर्षाचे होते.
  • राजस्थानमधील उदयपूर येथे ते सहलीसाठी गेले होते. तेथे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.
  • ‘मोहिनी’ या दिवाळी अंकात त्यांचे सन १९८९मध्ये पहिले व्यंग्यचित्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर ‘प्रभात’मध्ये सुमारे १४ वर्षे त्यांची चित्रे नियमित प्रसिद्ध झाली.
  • विविध दैनिकांत आणि दिवाळी अंकांसाठी त्यांनी तेरा हजारांहून अधिक चित्रे काढली.
  • त्यांच्या व्यंग्यचित्रांची ‘लाफिगं क्लब’ आणि ‘हास्यवाटिका’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  • त्यांचे ‘बहुरूपी’ आणि ‘शिमग्याची सोंगं’ हे दोन विनोदी कथासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत.
  • ते मूळचे मुळशी तालुक्यातील बेलावडे गावचे होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळात त्यांनी शिक्षक ते उपप्राचार्य या पदांवर अनेक वर्षे सेवा केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा