चालू घडामोडी : ४ डिसेंबर

चित्रा रामकृष्णा यांचा एनएसईच्या सीईओपदाचा राजीनामा

  • चित्रा रामकृष्णा यांनी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला.
  • एनएसईचे वरिष्ठ कार्यकारी जे. रवीचंद्रन यांच्याकडे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय शेअर बाजाराचे अध्यक्षपद सध्या माजी केंद्रीय अर्थ सचिव अशोक चावला यांच्याकडे आहे.
  • संचालक मंडळाने चित्रा यांचा राजीनामा मंजूर करताना, नव्या मुख्याधिकाऱ्यांच्या निवडीसाठी निवड समितीही नियुक्त केली आहे.
  • ५२ वर्षीय चित्रा या मार्च २०१८मध्ये निवृत्त होणार होत्या. भांडवली बाजाराचे प्रमुखपद भूषविणाऱ्या जगातील निवडक महिलांपैकी त्या एक होत्या.
  • राष्ट्रीय शेअर बाजाराच्या त्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी ठरल्या. 
  • राष्ट्रीय शेअर बाजाराची १९९२मध्ये स्थापना होण्यापूर्वीपासून चित्रा रामकृष्णा या बाजाराच्या जडणघडणीत सहभागी झाल्या.
  • बाजाराचे पहिले अध्यक्ष आर. एच. पाटील यांच्यानंतर रवी नरेन हे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले.
  • त्यांच्याकडून चित्रा यांनी २०१३मध्ये बाजाराच्या प्रमुखपदाची सूत्रे घेतली. बाजाराचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदही त्यांनी राखले होते.
  • गेल्याच महिन्यात जागतिक भांडवली बाजारांची संघटना असलेल्या ‘डब्ल्यूएफई’करिताही त्या अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्या आहेत.

भारतीय महिला संघाला आशिया करंडक

  • महिला आशिया करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानवर १७ धावांनी दणदणीत विजय मिळवत सहाव्यांदा आशिया कप जिंकला.
  • भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत २० षटकांमध्ये ५ बाद १२१ धावा केल्या.
  • सलामीला आलेल्या मिताली राजने ६५ चेंडूंमध्ये ७३ धावांची नाबाद खेळी साकारली. दुसऱ्या बाजूने कोणतीही साथ मिळत नसताना २० षटके फलंदाजी करत मितालीने एक बाजू लावून धरली.
  • भारताने दिलेल्या १२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला २० षटकांमध्ये ६ बाद १०४ धावाच करता आल्या.
  • भारतीय महिलांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे पाकिस्तानला विजयासाठी १७ धावा कमी पडल्या.
  • भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देणाऱ्या मिताली राजला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

निको रोसबर्गने निवृत्त

  • नुकतेच फॉर्म्युला-वन शर्यतीचे विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या निको रोसबर्गने निवृत्तीची घोषणा केली.
  • मर्सिडिज संघाच्या या शर्यतपटूने व्हिएन्ना येथे एफआयए विश्वविजेतेपद पुरस्कार वितरण सोहळ्यात ही घोषणा केली.
  • अबुधाबी येथे पार पडलेल्या मोसमातील अखेरच्या शर्यतीत दुसरे स्थान निश्चित करताना रोसबर्गने कारकीर्दीतले पहिले विश्वविजेतेपद पटकावले होते.
  • त्याने संघ सहकारी व तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या लुईस हॅमिल्टनला पाच गुणांनी पिछाडीवर टाकत हे विजेतेपद मिळविले होते.
 निको रोसबर्ग 
  • जर्मनीच्या ३१ वर्षीय रोसबर्गला फॉर्म्युला वनचा वारसा वडिलांकडून मिळाला होता. त्याचे वडील केके रोसबर्ग हे फॉर्म्युला वनचे १९८२सालचे विश्वविजेते होते.
  • त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत निकोने शर्यतपटू होण्याचा निर्धार केला. २००६मध्ये त्याने बहारीन ग्रँड पिक्समधून फॉर्म्युला वनमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणातील स्पर्धेत रोसबर्ग सातव्या स्थानी होता.
  • रोसबर्गने २०६ ग्रँड प्रिक्समध्ये सहभाग घेतला होता. यातील २३ स्पर्धांमध्ये त्याने विजेतेपद पटकावले होते. तर ५७ वेळा तो अव्वल तीन शर्यतपटूंमध्ये होता.
  • जर्मनीच्या ध्वजाखाली निको शर्यतीत सहभागी होत असला तरी कारकीर्दीच्या सुरुवातीला त्याने फिनलँडचे प्रतिनिधित्व केले. निकोकडे या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे.
  • मोनॅको ग्रां.प्रि. स्पर्धा सलग तिसऱ्यांदा जिंकणारा आणि सलग सात शर्यतींत विजेतेपद पटकावणारा निको हा चौथा शर्यतपटू आहे.

बोल्ट आणि अयाना ट्रॅक अँड फिल्डमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू

  • जमेकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्ट आणि इथिओपियाची अल्माज अयाना यांची ट्रॅक अँड फिल्डमधील यंदाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली.
  • आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने बोल्टला या सन्मानासाठी सहाव्यांदा निवडले आहे.
  • ऑलिम्पिकमधील १०,००० मीटर महिला शर्यतीत विक्रमी वेळेसह सुवर्ण जिंकणारी इथिओपियाची अयाना हिला महिला गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला.

भारतात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रेटी सनी लिओनी

  • याहू इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटीमध्ये सनी लिओनीने सलग पाचव्या वर्षी आपले प्रथम स्थान कायम राखले आहे.
  • सनी लिओनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलीवूड स्टार सलमान खानला मागे टाकत नंबर एकचे स्थान पटकावले आहे.
  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर सलमान खानला चौथे स्थान मिळाले आहे.
  • दरवर्षी ही वेबसाईट भारतीय लोक, कार्यक्रम आणि कथानकाच्या आधारावर वर्षभरातील आकडेवारी जारी करण्यात करते.
  • बीबीसीने नुकताच जाहीर केलेल्या १०० प्रतिभावान महिलांच्या यादीतही सनी लिओनीने स्थान मिळवले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा