चालू घडामोडी : ६ डिसेंबर

‘टाइम पर्सन ऑफ द इयर’च्या शर्यतीत मोदी आघाडीवर

  • ‘टाइम मॅगझीन’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘टाइम पर्सन ऑफ द इयर २०१६’ या पुरस्कारासाठी ऑनलाइन वाचकांनी मोदी यांच्या बाजूने कौल दिला आहे.
  • या नियतकालिकाचे संपादक ७ डिसेंबर रोजी ‘टाईम मॅगझीन पर्सन ऑफ द इअर’ची घोषणा करतील.
  • या पुरस्कारासाठी ऑनलाइन वाचकांकडून मागवण्यात आलेल्या मतदानानुसार मोदी यांना १८ टक्के मते मिळाली आहेत.
  • अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा, नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन तसेच विकिलिक्सचे ज्युलियन असांजे यांना मोदींनी मागे टाकले आहे.
  • देशातील काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी चलन बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे सध्या मोदींच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली आहे.
  • टाईम मासिकाकडून दरवर्षी जगातील परिस्थितीवर चांगल्या किंवा वाईट प्रकारे प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते..
  • या पुरस्काराचे स्पर्धक म्हणून मोदी यांची सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वी २०१४मध्येही त्यांना ऑनलाइन वाचकांनी सर्वाधिक पसंती दिली होती.
  • २०१५मध्ये पर्सन ऑफ द इयर चा खिताब जर्मन चान्सलर अँजेला मर्कल यांनी हा खिताब पटकावला होता.

ओ. पनीरसेल्वम तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

  • जयललिता यांच्या निधनानंतर ओ. पनीरसेल्वम यांचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला आहे.
  • पनीरसेल्वम यापूर्वी दोनवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले आहेत. २००१मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले.
  • त्यानंतर सप्टेंबर २०१४ ते मे २०१५ या काळात सर्वोच्च न्यायालयाने जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्यावर कार्यभार पुन्हा पनीरसेल्वम यांच्याकडे आला.
  • या काळात त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला. खुर्चीवर जयललिता यांचा फोटो ठेवून त्याशेजारी नव्या खुर्चीवर बसून कारभार केला.

विराट कोहलीचे ट्विट ‘गोल्डन ट्विट ऑफ द इअर’

  • भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनुष्का शर्माची पाठराखण करणारे केलेले ट्विट ‘गोल्डन ट्विट ऑफ द इअर’ ठरले आहे.
  • ट्विटर प्रत्येक वर्षी भारतातील एक ट्विट निवडते ज्याला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला आहे.
  • टी-२० वर्ल्ड कपमधील भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील पराभवानंतर सोशल मीडियावर अनुष्काची खिल्ली उडवली जात होती.
  • यावरुन विराट कोहलीने संताप व्यक्त करत अनुष्काची बाजू घेत टीकाकारांना उत्तर दिले होते. त्याचे हे ट्विट ४० हजाराहून जास्त वेळा रिट्विट करण्यात आले.

इटलीचे पंतप्रधान मतेओ रेंझी यांचा राजीनामा

  • इटलीचे पंतप्रधान मतेओ रेंझी यांच्या राज्यघटनेमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या योजनेस तेथील जनतेने सार्वमताच्या माध्यमामधून धुडकावून लावल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
  • माझा सरकार चालविण्याचा अनुभव येथे संपला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
  • या प्रस्तावासाठी देशभरात सुमारे ७० टक्के मतदान झाले. या सार्वमतामध्ये ६० टक्के जनतेने रेंझी यांच्या योजनेस स्पष्ट नकार दर्शविला.
  • इटलीमधील केंद्रीय सरकार अधिक सशक्त करण्याचा रेंझी यांचा प्रयत्न होता. रेंझी यांना त्यांच्या पक्षामधीलही काही नेत्यांनी विरोध केला होता.
  • यामुळे पंतप्रधानंच्या हाती अधिकाधिक सत्ता एकवटली जाईल, अशी टीका त्यांच्या विरोधकांनी केली होती.
  • रेंझी यांची घटलेली लोकप्रियता, देशातील रखडलेली अर्थव्यवस्था आणि आफ्रिकेमधून इटलीमध्ये येणारे हजारो स्थलांतरित हे मुद्दे सार्वमतामध्ये कळीचे ठरले.

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटासाठी आधारसक्ती

  • ज्येष्ठ नागरिकांना येत्या १ एप्रिल २०१७पासून सवलतीतील रेल्वे तिकीट काढताना, आधार क्रमांक द्यावा लागणार आहे.
  • रेल्वे मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आधार कार्ड’वर आधारित तिकीट यंत्रणा राबवण्याचा विचार केला असून, ती दोन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे.
  • यानुसार १ जानेवारी ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट काढताना ऐच्छिक स्वरूपात आपला आधार क्रमांक देता येईल. मात्र, १ एप्रिल २०१७ पासून तो बंधनकारक असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा