चालू घडामोडी : ५ जानेवारी

फेब्रुवारीमध्ये पाच राज्यांमध्ये निवडणुका

  • निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा व मणिपूर या पाच राज्यांमध्ये फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदानाच्या तारखा जाहिर केल्या.
  • पाचही राज्यात ४ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या पाचही राज्यांतील निवडणुकांची मतमोजणी ११ मार्चला होणार आहे.
  • गोवा, पंजाबमध्ये ४ फेब्रुवारी तर उत्तराखंडमध्ये १५ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे.
  • मणिपूरमध्ये दोन टप्यात मतदान होत असून उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
  • निवडणूक आयोगाचे अध्यक्ष: नसीम झैदी
 या निवडणुकांबद्दल महत्वाचे मुद्दे 
  • पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी १.८५ लाख मतदान केंद्र उभारणार आहे. महिलांसाठी विशेष मतदान केंद्र उभारणार
  • सर्व मतदारांना फोटो व्होटर स्लिप दिली जाणार. स्लिपवर मतदारांचे छायाचित्र असणार
  • व्होटिंग मशिनवर उमेदवाराचा फोटो असणार.
  • उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यांमध्ये उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा २८ लाख रुपये, तर गोवा आणि मणिपूरमध्ये २० लाख रुपये.
  • उमेदवारांना २० हजारांवरील खर्चासाठी चेकचा वापर बंधनकारक. काळा पैसा, रोख व्यवहार आणि गैरप्रकारांवर कडक लक्ष ठेवणार
  • प्रचारासाठी टीव्ही चॅनेलला दिलेल्या जाहिराती उमेदवाराच्या निवडणूक खर्चात ग्राह्य धरल्या जातील
  • निवडणूक प्रचारासाठी प्लास्टिक सामुग्रीच्या वापराला बंदी.
 काही निर्णयांची अंमलबजावणी प्रथमच 
  • मतदारांच्या मार्गदर्शनासाठी रंगीत पुस्तिका (व्होटर गाइड) दिली जाईल.
  • मतदान केंद्र उभारताना दिव्यांगांचाही विचार केला जावा, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.
  • गोव्यात मतदानानंतर प्रत्येकाला स्लीप मिळणार
  • दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना मुख्य प्रतिज्ञापत्रासोबतच अतिरिक्त प्रतिज्ञत्रापत्र जोडावे लागणार.
  • उमेदवार १० वर्षांपासून सरकारी निवासस्थानात राहत असल्यास वीज, पाणी, टेलिफोन सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून ‘नो डिमांड सर्टिफिकेट’ या अतिरिक्त प्रतिज्ञापत्राला जोडणे बंधनकारक.
राज्य विधानसभा जागा
उत्तर प्रदेश ४०३
पंजाब ११७
उत्तराखंड ७०
मणिपूर ६०
गोवा ४०

डिजिटल व्यवहारांसाठी निशुल्क हेल्पलाइन

  • केंद्र सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे सर्व डिजिटल व्यवहारांसाठी १४४४ ही निशुल्क हेल्पलाइन सुरू केली आहे.
  • या हेल्पलाइनवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) वॉलेटसह अन्य डिजिटल व्यवहारांच्या प्रश्नांवर उत्तरे मिळणार आहेत.
  • ही हेल्पलाइन देशाच्या उत्तर, तसेच पूर्व भागातही इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे. लवकरच सर्व भारतीय भाषांमध्ये ती सुरू करण्यात येणार आहे.
  • दूरसंचार मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅसकॉम यांनी एकत्रितपणे ही हेल्पलाइन सुरू केली आहे.
  • सर्व दूरसंचार कंपन्या या हेल्पलाइनमध्ये सहभागी असल्याने सर्वच कंपन्यांच्या ग्राहकांना ही हेल्पलाइन उपलब्ध असेल.

महेंद्रसिंह धोनीचा कर्णधारपदाचा राजीनामा

  • भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा सर्वांत यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीने राजीनामा दिला आहे. 
  • कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला, तरीही संघनिवडीसाठी धोनी उपलब्ध असणार आहे.
  • कसोटी क्रिकेटमधून धोनीने डिसेंबर २०१४मध्ये निवृत्ती घेतली होती. त्यानंतर कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपविण्यात आले होते.
  • मात्र, एकदिवसीय आणि ट्वेंटी-२०मध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदी धोनीच कायम होता.
  • धोनीने २००४मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
  • राहुल द्रविडकडून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर धोनीने १९९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११० तर ७२ ट्वेंटी-२०पैकी ४१ सामन्यांत विजय मिळविले.
  • धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने २००७मध्ये पहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक तर २०११मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळविले आहे.
  • त्यानंतर इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही भारतीय संघ अजिंक्य ठरला. याच काळात कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीतही भारताने प्रथम स्थान पटकावले.
  • महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी ठरलेला कर्णधार आहे.
  • त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगने (२३०) व न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंग (२१८) यांच्यानंतर धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लघू व मध्यम उद्योजकांसाठी गुगलची डिजिटल अनलॉक्ड सेवा

  • गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत लघू व मध्यम उद्योजकांच्या समुदायाकरिता प्रोत्साहनपूरक योजनांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
  • गुगलद्वारे ‘डिजिटल अनलॉक्ड’ या प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा यावेळी करण्यात आली आहे.
  • याअंतर्गत ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाणार असून पुढील तीन वर्षांमध्ये विविध ४० शहरांमध्ये ५,००० कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.
  • फिक्कीच्या सहकार्याने सुरू केलेल्या सेवेत ९० दिवसांचे ट्रेनिंग व्हिडीओ व ८ तासांचा ट्रेनिंग कार्यक्रम आहे.
  • तर ‘माय बिजनेस वेबसाइट्स’द्वारे छोटय़ा उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाकरिता मोफत संकेतस्थळ सुरू करता येईल. याद्वारे छोटे उद्योग विस्तारासाठी इंटरनेटचा उपयोग करू शकतील.
  • यासाठी प्रीमिअर नावाचे अ‍ॅपही उपलब्ध होणार आहे. हिंदी, इंग्रजी, तामिळी, तेलगू आणि मराठी या भाषांत ते विकसित केले जात आहे.

द्रमुकच्या कार्याध्यक्षपदी स्टॅलिन

  • तमिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ‘द्रमुक’च्या कार्याध्यक्षपदी पक्षाचे खजिनदार एम. के. स्टॅलिन यांची निवड करण्यात आली आहे.
  • पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी सध्या आजारी असल्याने पक्षाची धुरा त्यांचे पुत्र स्टॅलिन यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • स्टॅलिन यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद देताना त्यांना सर्वाधिकारही प्रदान करण्यात आले आहेत.
  • स्टॅलिन यांचे मोठे बंधू एम. के. अळगिरी यांना २०१४मध्ये पक्षविरोधी कारवायांच्या कारणास्तव पक्षातून काढून टाकण्यात आलेले आहे.

भारतीय वंशाचे राज शहा व्हाईट हाऊसमधील महत्त्वाच्या पदावर

  • अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक राज शहा यांची व्हाईट हाऊसमधील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.
  • ट्रम्प यांचे उपसहायक आणि संपर्क उपसंचालक व संशोधक संचालक म्हणून शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राज शहा हे सध्या रिपब्लिकन राष्ट्रीय समितीच्या 'अपोझिशन रिसर्च'चे प्रमुख आहेत.
  • ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी व डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात संशोधन करणाऱ्या पथकाचे नेतृत्व शहा यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा