चालू घडामोडी : १२ जानेवारी

टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन

  • सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आली.
  • टाटाच्या १५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदी बिगर-पारशी व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.
  • टाटा सन्सकडून २४ ऑक्टोबर २०१६ला सायरस मिस्त्री यांची कंपनीच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • एन. चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीमुळे रिक्त होणाऱ्या टीसीएसच्या सीईओपदी राजेश गोपीनाथन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
 नटराजन चंद्रशेखरन 
  • नटराजन चंद्रशेखरन हे टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) गेली सात वर्षे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
  • तामिळनाडूच्या मोहनूर येथे जन्मलेल्या एन. चंद्रशेखरन यांनी कम्प्युटर अॅप्लिकेशन या विषयात मार्स्टसची पदवी घेतली आहे.
  • १९८७ साली ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) रुजू झाले. त्यानंतर प्रगती करत ते २००९मध्ये ते टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले.
  • चंद्रशेखरन हे काही काळासाठी सेंट्रल बँकेच्या संचालक मंडळावरही कार्यरत होते. उद्योगविश्वात ते चंद्रा या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत.
  • चंद्रशेखरन यांच्या नेतृत्त्वाखाली टीसीएसने २०१५-१६ या आर्थिक वर्षात १६५० कोटींचा नफा कमावला होता.
  • चंद्रशेखरन यांच्याच काळात टीसीएस भारतामध्ये खासगी क्षेत्रात सर्वाधिक कर्मचारी असलेली कंपनी बनली.
  • तसेच स्पर्धेच्या काळातही चंद्रशेखरन यांच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांचे कंपनी सोडून जाण्याचे प्रमाणही कमी होते.
  • उद्योग क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले आहेत.
  • २०१५-१६ साली दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेतील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या बैठकीचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले.
  • याशिवाय, २०१२-१३मध्ये त्यांनी नासकॉम या संघटनेचे प्रमुखपद भुषविले असून सध्यादेखील ते नासकॉमच्या देखभाल कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.
  • इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सतर्फे आशियातील सर्वोत्कृष्ट सीईओंसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचेही ते पाचवेळा मानकरी ठरले आहेत.
  • २०१४मध्ये सीएनबीसी टीव्ही-१८ तर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतातील आदर्श उद्योगपती म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते.
  • याशिवाय, याचवर्षी सीएनएन आयबीएनतर्फे त्यांना इंडियन ऑफ द इयर या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
  • चंद्रा यांना हैदराबादच्या जेएनटीयू आणि हॉलंडमधील आघाडीच्या बिझनेस स्कूल्सपैकी एक असणाऱ्या न्याईनरोड या शिक्षण संस्थांकडून मानद डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आले आहे.
  • याशिवाय, चंद्रशेखरन हे हौशी छायाचित्रकार असून ते उत्तम धावपटूही आहेत. त्यांनी अॅमरस्टॅडम, बोस्टन, शिकागो, बर्लिन, मुंबई, न्यूयॉर्क, पॅराग्वे, स्टोकहोम, टोकियो अशा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

आयएनएस खांदेरीचे लोकार्पण

  • स्कॉर्पिअन श्रेणीची दुसरी पाणबुडी आयएनएस खांदेरीचे १२ जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात आले. ही पाणबुडी उष्णकटिबंधीय वातावरणासह कोणत्याही परिस्थितीत सक्षमपणे कार्य करू शकते.
  • स्कॉर्पिअन पाणबुड्या या डिझेल आणि विजेवर चालतात. प्रामुख्याने याचा उपयोग युद्धात केला जातो.
  • यावरून शत्रूवर क्षेपणास्त्र अचूकपणे डागता येते. हल्ला करण्यासाठी यामध्ये पारंपारिक टोरपॅडो शिवाय ट्यूब लाँच जहाजविरोधक क्षेपणास्त्रही आहे. जे पाण्यातून व पाण्याबाहेरूनही प्रक्षेपित करता येऊ शकते.
  • माझगाव डॉकयार्ड येथे आयोजित एका कार्यक्रमात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, नौदलप्रमुख सुनील लांबा यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
  • संवाद साधण्यासाठी या पाणबुडीत अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे.
  • फ्रान्सची मेसर्स डीसीएनएस कंपनी आणि माझगाव गोदी यांनी संयुक्तरित्या या पाणबुडीची बांधणी केली आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर प्रभुत्व ठेवण्यासाठी खांदेरी बेटावर केलेल्या लढायांची स्मृती जपण्यासाठी पाणबुडीला खांदेरी हे नाव देण्यात आले आहे.
  • भारतीय नौदलात स्कॉर्पिअन श्रेणीची पहिली पाणबुडी ही ६ डिसेंबर १९८६ साली सामील झाली होती.

एमसीएच्या अध्यक्षपदी आशिष शेलार

  • मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे.
  • लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींना सुप्रीम कोर्टाने पाठिंबा दिल्यानंतर शरद पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाचा स्वत:हून राजीनामा दिला होता.
  • त्यानंतर माजी कसोटीवीर दिलीप वेंगसरकर यांनीही एमसीएच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
  • त्यामुळे रिक्त झालेल्या या अध्यक्षपदावर शेलार यांची एमसीएच्या कार्यकारिणीने नियुक्ती केली. तर विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • एमसीएने लोढा समितीच्या शिफारशी देखील मान्य केल्या असून, त्यामुळे आगामी काळात एमसीएमधील आणखी काही अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे.
  • लोढा समितीच्या शिफारशींनुसार नऊ वर्षांहून अधिक काळ कोणत्याही व्यक्तीला संघटनेवरील पद सांभाळता येणार नाही.
  • क्रीडा संघटनेचा पदाधिकारी किंवा सभासद ६० वर्षांहून अधिक वयाचा नसावा अशी सुधारणाही लोढा समितीने सुचविली होती.
  • त्यामुळे वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या शरद पवार यांनी एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.
  • त्यांनी दोनवेळा एमसीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. याशिवाय ते २०१० ते २०१२ या कालावधीत आयसीसीचे चेअरमनही होते.

दुसऱ्या महायुद्धाची बातम्या देणाऱ्या महिला पत्रकाराचे निधन

  • दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्याची बातमी जगाला देणाऱ्या क्लेअर हॉलिंगवर्थ या महिला पत्रकाराचे १०५व्या वर्षी हॉगकाँग येथे निधन झाले.
  • ऑगस्ट १९३९मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले, तेव्हा क्लेअर या 'दि टेलिग्राफ' या ब्रिटीश वृत्तापत्रासाठी वार्ताहर म्हणून काम करत होत्या.
  • युद्धाच्या काही दिवस आधी त्यांनी जर्मन रणगाडे चाल करुन जाताना पाहिले होते. मात्र नवोदित पत्रकार असल्याने या युद्धाची जाणीव झाली नव्हती.
  • जर्मनी, व्हिएतनाम आणि चीनमधील बहुतेक युद्धांमध्ये त्यांनी आघाडीवर जाऊन वार्तांकन केले होती. अन्य देशांसहित क्लेअर यांनी भारतातही काम केले होते.
  • युद्ध सुरू होण्यापूर्वी पोलंडमधील कॅटोवाईस शहरातून ब्रिटनमध्ये जाण्यासाठी त्यांनी ३५०० ज्यू नागरिकांना मदत केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा