चालू घडामोडी : ३ फेब्रुवारी

अॅपलचा लवकरच बंगळुरू येथे उत्पादन प्रकल्प

  • जगप्रसिद्ध कंपनी ‘अॅपल’ने भारतात आयफोनचा उत्पादन प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आयटी हब नावाने ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकमधील बंगळुरू येथे 'अॅपल'चे युनिट सुरू होणार आहे.
  • या युनिटमुळे आयफोनची जुळवणी (असेंबली) करणारा भारत जगातील (चीन आणि ब्राझीलनंतर) तिसरा देश ठरणार आहे.
  • अॅपलसाठी मूळ साहित्य बनवणारी तैवानची कंपनी विस्ट्रन ही बेंगळुरूच्या पिन्या औद्योगिक क्षेत्रात आयफोनचे उत्पादन करेल.
  • अॅपलच्या या निर्णयाचे कर्नाटक सरकारने स्वागत केले असून अॅपलमुळे राज्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा विकास होणार आहे.

उस्ताद इम्रत खाँ यांचा पद्मश्री स्वीकारण्यास नकार

  • ख्यातनाम सितार आणि सूरबहारवादक उस्ताद इम्रत खाँ यांनी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार नाकारला आहे.
  • उस्ताद इम्रत खाँ यांनी शिकागो येथील भारतीय दूतावासाला आपण हा पुरस्कार स्विकारणार नसल्याचे कळवले होते.
  • सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार द्यायला खूप उशीर केला आहे. तसेच सध्या जगभरात असलेली त्यांची ख्याती आणि सांगीतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला तो साजेसा नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
  • अमेरिकेतील सेंटु लुईस येथे राहणाऱ्या उस्तादजींनी जागतिक पातळीवर भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यात मोठे योगदान दिले आहे.
  • प्रामुख्याने सतार आणि वारसाहक्काने आलेल्या सूरबहार या वाद्यांच्या प्रसारात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
  • उस्ताद विलायत खाँ, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, उस्ताद अमिदजान थिरकवाँ खाँ आदी प्रख्यात कलावंतांच्या बरोबरीने त्यांनी आपली कला सादर केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा