चालू घडामोडी : ३ एप्रिल

फ्रेंच गणितज्ञ यीव्ह्ज मेयर यांना आबेल पुरस्कार

  • फ्रान्सचे गणितज्ञ यीव्ह्ज मेयर यांना सिद्धांत व उपयोजन असा दोन्हींचा संगम असलेल्या गणिती संशोधनासाठी गणितातील नोबेल मानला जाणारा आबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • मेयर यांचे कार्य ‘वेव्हलेट सिद्धांता’बाबत असून त्याचा उपयोग कमी जागेत माहिती बसवणे, वैद्यकीय प्रतिमाचित्रण व गुरुत्वीय लहरी शोधणे यात होत आहे.
  • यीव्ह्ज मेयर यांचा जन्म १९३९मध्ये झाला. ते फ्रेंच ज्यू आहेत. १९५७मध्ये ते पॅरिसमधील इकोल नास्योनाल संस्थेच्या प्रवेश परीक्षेत पहिले आले.
  • पदवीधर झाल्यानंतर ते लष्कराच्या शाळेत शिक्षक होते. १९६६मध्ये ते सहायक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्याच वर्षी त्यांनी जीन पिअर कहान यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केली.
  • नंतर ते सूद पॅरिस विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक झाले. डॉफिन व काचॅन येथील विद्यापीठांत गणित केंद्रात काम केले. सध्या ते फ्रान्समधील एका संस्थेत मानद प्राध्यापक आहेत.
  • १९७०मध्ये ते हार्मोनिक अ‍ॅनॅलिसिसकडे वळले. अवघड तरंगलहरींचे सोप्या पद्धतीने विभाजन करण्याचे तंत्र त्यांनी शोधले. त्यातूनच त्यांनी नंतर वेव्हलेट सिद्धांतावर कार्य केले.
  • वेव्हलेट सिद्धांतामुळे गुंतागुंतीचे संदेश गणितीय कणरूपात लघुरूपामध्ये मांडले जातात. त्या गणिती कणांना वेव्हलेट असे म्हणतात.
  • यातून त्यांनी संगणक व माहिती तंत्रज्ञानात मोठी भर टाकली आहे. ध्वनी, प्रतिमा, दृश्यफीत यांचे लघुकरण करून साठवण करण्यात वेव्हलेट्सचा उपयोग होतो.
 आबेल पुरस्कार 
  • २००२पासून आबेल पुरस्कार निल्स हेनरिक आबेल यांच्या नावाने दिला जातो. आबेल यांचे १८२९मध्ये निधन झाले होते.
  • हा पुरस्कार ६ लाख पौंडाचा आहे. नॉर्वेजियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड लेटर्स या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.
  • गेल्या वर्षी ब्रिटनचे अ‍ॅण्ड्रय़ू वाइल्स यांना फेरमॅट सिद्धांतासाठी हा पुरस्कार मिळाला होता.

लिएण्डर पेसला लिऑन चॅलेंजर स्पर्धेत जेतेपद

  • भारताच्या लिएण्डर पेसने कॅनडाच्या आदिल शामसदिनच्या साथीने लिऑन चॅलेंजर टूर टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पेसचे हे हंगामातील पहिले जेतेपद ठरले.
  • पेसने शामसदिनच्या साथीने ल्युका मार्गारोली (स्वित्झर्लंड) आणि कारो झॅम्पिरी (ब्राझील) जोडीला ६-१, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
  • पेसने हे २०वे एटीपी चॅलेंजर विजेतेपद पटकावले आहे. गेल्या वर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेच्या रॅव्हेन क्लासेनला नमवून एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते.
  • पेसने २०१३मध्ये रॅडीक स्टेपानीकच्या साथीने अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या रूपाने पुरुष दुहेरीतील अखेरचे ग्रँडस्लॅम जेतेपद प्राप्त केले होते.
  • मात्र मिश्र दुहेरीत मार्टिना हिंगीसच्या साथीने २०१५मध्ये तीन ग्रँडस्लॅम आणि मागील हंगामात फ्रेंच विजेतेपद काबीज केले होते.

सरकारकडून आरटीआय कायद्यात बदल

  • मोदी सरकारकडून माहितीच्या अधिकारांतर्गत तक्रार दाखल करण्यासाठी आणि अपील करण्यासाठी नवे नियम तयार केले आहेत.
  • यावर १५ एप्रिलपर्यंत लोकांना त्यांची मते व्यक्त करता येणार आहेत आणि नियमांमध्ये सुधारणा सुचवता येणार आहेत.
 नव्या नियमांप्रमाणे 
  • अर्जदाराला ५०० शब्दांची मर्यादा पाळूनच माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल करता येईल.
  • अर्ज दाखल करताना भराव्या लागणाऱ्या शुल्कातदेखील वाढ.
  • केंद्रीय माहिती आयोगाला कोणत्याही तक्रारीला दुसरे अपील ठरवण्याचा अधिकार.
  • तक्रारदाराला केंद्रीय सूचना आयोगाकडे जाण्याआधी तक्रार आणि अपिलाची प्रत जनमाहिती अधिकाऱ्यांना द्यावी लागेल.
  • अपील करणाऱ्याला आयोगाच्या परवानगीने अपील मागे घेण्याचा अधिकार.
  • माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संपूर्ण प्रक्रिया बंद करण्यात येईल.
  • अर्ज दाखल केल्यावर अपील केलेल्या व्यक्तीकडे तक्रार दाखल करण्यासाठी १३५ दिवसांचा कालावधी.

आयआयएस बेंगळुरू देशातील सर्वोत्तम विद्यापीठ

  • मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून (एचआरडी) देशातील १०० सर्वोत्तम विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली.
  • देशातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या या क्रमवारीत बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने प्रथम स्थान पटकावले आहे.
  • या यादीत पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान मिळवणारे आयआयटी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. आयआयटी मुंबईने तिसरे स्थान पटकावले आहे.
  • याशिवाय महाराष्ट्रातील इतर ८ विद्यापीठांनी अव्वल १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यात पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ १८व्या क्रमांकावर आहे.
  • गेल्या काही काळापासून वादात असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठानेही (जेएनयू) या यादीत सहावे स्थान मिळवले आहे.
  • देशभरातील सुमारे ३००० खासगी आणि सरकारी शैक्षणिक संस्थांनी इंडिया रँकिंग २०१६मध्ये सहभाग नोंदवला होता.
  • अध्यापनाचा दर्जा , शैक्षणिक सुविधा, निकालाचे प्रमाण, शिक्षणाचा दृष्टीकोन, विद्यार्थ्यांशी संवाद व सर्वसमावेशकता आणि उत्पादक संशोधन या निकषांच्या आधारे नॅक समितीकडून या संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले होते.
 देशातील सर्वोत्तम १० विद्यापीठे 
  1. आयआयएस बंगळुरू
  2. आयआयटी मद्रास
  3. आयआयटी मुंबई
  4. आयआयटी खडगपूर
  5. आयआयटी दिल्ली
  6. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली
  7. आयआयटी कानपूर
  8. आयआयटी गुवाहाटी
  9. आयआयटी रुडकी
  10. बनारस हिंदू विद्यापीठ  

रॉजर फेडरर मियामी खुल्या टेनिस स्पर्धेचा विजेता

  • स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालला पराभूत करत स्पर्धेचे विजेतपद पटकावले.
  • फेडररने ९४ मिनिटांच्या या लढतीत नदालवर ६-३, ६-४ असा विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले.
  • बॅकहॅण्ड खेळाने सर्वाना आकर्षित करणाऱ्या फेडररने मियामीच्या अंतिम लढतीत फोरहॅण्डचा अप्रतिम खेळ करताना नदालला नामोहरम केले. नदालविरुद्ध झालेल्या मागील चारही सामन्यांत फेडररने बाजी मारली आहे.
  • दुखापतीमुळे मागील मोसमातील दुसऱ्या सत्राला मुकलेल्या फेडररने कठोर मेहनत घेत शारीरिक तंदुरुस्ती मिळवत २०१७मध्ये तीन जेतेपदे नावावर केली आहेत.
 ब्रिटनच्या जोहाना कोन्टाला महिला एकेरीचे जेतेपद 
  • ब्रिटनच्या जोहाना कोन्टाने मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावताना कॅरोलिन वोझ्नियाकीवर ६-४, ६-३ अशी मात केली.
  • इंग्लंड महिला टेनिसपटूंच्या इतिहासात ४० वर्षांत जिंकलेले हे मोठे जेतेपद आहे. याआधी १९७७साली इंग्लंडच्या व्हर्जिनिया वेड हिने विम्बल्डन चषक जिंकला होता.
 सानिया-बाबरेरा पराभूत 
  • भारताच्या सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हा यांना महिला दुहेरीच्या अंतिम लढतीत नवोदित गॅब्रियला डाब्रोवस्की आणि झू यिफान यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
  • कॅनडा-चीनच्या या खेळाडूंनी ६-४, ६-३ अशा फरकाने विजय मिळवला आणि मियामी खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला दुहेरीचे जेतेपद मिळवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा