राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१७

  • ७ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली.
  • यावर्षी ‘कासव’ या मराठी सिनेमाला सुवर्णकमळाचा मान मिळाला. तर ‘दशक्रीया’ चित्रपटला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
  • सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी कासव या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अजून हा सिनेमा प्रदर्शित झालेला नाही.
  • ‘दशक्रिया’ हा चित्रपट जेष्ठ साहित्यिक बाबा भांड लिखित दशक्रिया कादंबरीवर आधारित असून या सिनेमाने तीन राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले आहे.
  • पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) ‘दशक्रिया’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता.
  • याशिवाय ‘व्हेंटिलेटर’चे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
  • व्हेंटिलेटरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संकलन, व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग असे एकूण चार पुरस्कार मिळाले.
  • व्हेंटिलेटर हा बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने निर्मिती केलेला पहिला मराठी सिनेमा आहे. या चित्रपटात प्रियांकाने छोटीशी भूमिकाही केली आहे.
  • याशिवाय अभिनेता अक्षय कुमारला रुस्तममधल्या भूमिकेसाठी पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
  • पिंक हा सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर, सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेल्या नीरजा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला.
  • अन्य पुरस्कारांच्या तुलनेत राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे एक वेगळे महत्व आहे. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हा एक सन्मान असतो.
  • मागच्या काहीवर्षात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी सातत्याने बाजी मारली आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१७
सर्वोत्कृष्ट चित्रपट कासव (सुवर्णकमळ)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट दशक्रिया
सर्वोत्कृष्ट अभिनेता अक्षय कुमार (रुस्तम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सुरवी (मिनामिन्नुन्गू)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता मनोज जोशी (दशक्रिया)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री झायरा वासिम (दंगल)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट नीरजा
सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट पिंक
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस शिवाय
सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हेंटिलेटर
साऊंड मिक्सिंग व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट संकलन व्हेंटिलेटर
सर्वोत्कृष्ट वेशभूषा सायकल
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट धनक, नागेश कुकनूर
सर्वोत्कृष्ट गायक सुंदरा अय्यर (तामिळ)
फिल्म फ्रेंडली राज्य उत्तरप्रदेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा