चालू घडामोडी : ७ मे

अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताला कांस्यपदक

  • भारतीय पुरुष हॉकी संघाने २६व्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत न्यूझीलंडला ४-० असे पराभूत करत कांस्यपदकाचा मान मिळवला.
  • रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले, तर एस व्ही सुनील आणि तलविंदर सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून चांगली साथ दिली.
  • भारतीय खेळाडूंनी आक्रमक सुरुवात करताना पेनल्टी कॉर्नरच्या संधी निर्माण करून न्यूझीलंडला पिछाडीवर टाकले.
  • भारत साखळीतील अखेरच्या लढतीत मलेशियाविरुद्ध पराभूत झाल्यामुळे जेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाला होता.
  • या स्पर्धेत न्यूझीलंडला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर मलेशियाने जपानवर ३-१ असा विजय मिळवून पाचवे स्थान पटकावले.
  • गेल्या वर्षी भारताने या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते, तर ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ९ वेळा सुल्तान अझलन शाह चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. 
  • यानंतर ब्रिटन आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या अंतिम लढतीत ब्रिटनने ऑस्ट्रेलियावर ४-३ अशी मात करून विजेतेपद पटकावले.
  • सुमारे २३ वर्षानंतर अंतिम फेरीत खेळणाऱ्या ब्रिटन संघाचे हे केवळ दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी त्यांनी १९९४मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.

शिवा थापा आणि सुमित सांगवान यांना रौप्यपदके

  • चौथ्या मानांकित शिवा थापा (६० किलो) आणि सुमित सांगवान (९१ किलो) या भारतीय बॉक्सिंगपटूंनी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत आपापल्या गटात रौप्यपदकाची कमाई केली.
  • शिवाला अंतिम फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • या स्पर्धेत सलग ३ पदके पटकावणारा शिवा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत शिवा याने २०१३मध्ये सुवर्ण, तर २०१५मध्ये त्याने कांस्यपदक जिंकले होते.
  • आसामचा शिवा हा यापूर्वी बॅन्टमवेट गटात सहभागी होत असे. गतवर्षी डिसेंबरपासून तो लाइटवेट विभागात भाग घेत आहे. या नवीन वजनी गटात त्याने राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले होते.
  • पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सुमितला ९१ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या अव्वल मानांकित व्हॅसिली लेव्हिटकडून पराभव पत्करावा लागला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा