चालू घडामोडी : ३ व ४ जून

आयर्लंडच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे लिओ वराडकर

  • आयर्लंडमधील सत्ताधारी फाईन गेल पार्टीने आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मूळचे मालवणचे असलेले लिओ वराडकर यांची केली आहे.
  • आयर्लंडमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लिओ हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. लिओ यांनी ७३ पैकी ५१ मते मिळवत सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला.
  • लियो वराडकर हे डॉक्टर असून, समलैंगिकतेचा पुरस्कार करणारे ते सरकारमधील पहिले मंत्री आहेत.
  • लियो वराडकर यांचे वडील अशोक वराडकर हे मूळचे मुंबईचे आहेत, तर आई मिरियम या आयर्लंडच्या आहेत. वराडकर यांचे कुटुंब मूळ मालवण तालुक्यातील वराड गावचे आहे.
  • वयाच्या २२व्या वर्षी लिओ यांनी राजकारणात पदार्पण केले होते. २७ व्या वर्षी ते संसदेत निवडून आले. २०१५मध्ये वराडकर हे समलैंगिक व्यक्ती म्हणून पुढे आले होते.
  • त्यानंतर २०११ ते २०१३ या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवले. २०१४ ते २०१६ या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते.
  • समलिंगी राष्ट्राध्यक्ष निवडून देणारा आयर्लंड हा चौथा देश ठरला आहे. या आधी बेल्जियम, आइसलँड आणि लक्जमबर्गच्या राष्ट्राध्यक्षपदी समलिंगी व्यक्तीची निवड झाली आहे.

जीएसटीच्या प्रलंबित नियमांना मान्यता

  • वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदा १ जुलैपासून लागू करण्यास सर्व राज्यांनी संमती दिल्यानंतर, अवस्थांतरातील तरतुदी आणि कर विवरण यांच्यासह प्रलंबित नियमांना जीएसटी परिषदेने मान्यता दिली आहे.
  • अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेची १५वी बैठक ३ जून रोजी झाली.
  • त्यानुसार, सोन्यावर ३ टक्के, ५०० रुपयांखालील पादत्राणांवर ५ टक्के आणि बिस्किटांवर १८ टक्के कर लागू होणार आहे.
  • याशिवाय तयार कपडय़ांवर १२ टक्के, सौरऊर्जा पॅनेलवर ५ टक्के तर कच्च्या हिऱ्यावर ०.२५ टक्के जीएसटी आकारला जाईल.
  • कपडे आणि पादत्राणांवरील करात मोठी सूट देण्यात आली असून, सामान्य जनांकडून वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवर कमी कर आकारण्यात येणार आहे.
  • जीएसटी लागू झाल्यानंतर विडी मात्र महागण्याचे संकेत आहेत. तेंदूपत्ता आणि विडीवर अनुक्रमे १८ आणि २८ टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.
  • परिषदेची ११ जूनला पुन्हा बैठक होणार आहे. त्यात जीएसटी लागू करण्यासाठी सर्व सज्जतेचा आढावा घेण्यात येईल.
  • जीएसटी परिषदेने गेल्या महिन्यात १२०० वस्तू आणि ५०० सेवा ५, १२, १८ आणि २८ टक्क्यांच्या कररचनेत बसवल्या आहेत.
  • जीएसटी ही स्वातंत्र्यानंतरची देशातील सर्वात मोठी करसुधारणा आहे. वस्तू आणि सेवांवरील विविध राज्यांचे आणि केंद्रीय कर एकत्र करुन एकसमान करआकारणी हे जीएसटीचे मुख्य उद्दिष्टय आहे.
  • जीएसटीमुळे देशाच्या जीडीपीमध्ये २ टक्के वाढ होईल असा अंदाज आहे. येत्या १ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
  • आरोग्य, शिक्षण आणि विनाएसी रेल्वेप्रवास जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आला आहे. अन्नधान्य, डाळी, दूध हे पदार्थ सुद्धा जीएसटीमधून वगळण्यात आले आहेत.

बी साई प्रणितला थायलंड ओपनचे विजेतेपद

  • भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणित याने थायलंड येथे झालेल्या पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
  • अंतिम फेरीत त्याने इंडोनेशियाचा खेळाडू जोनाथन क्रिस्टी याला १७-२१, २१-१८, २१-१९ अशा फरकाने पराभूत केले.
  • याच्या आधीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रणित याने थायलंडचा खेळाडू कांटाफोन वांगचारोएन याला हरविले.
  • साई प्रणित याने २०१६च्या कॅनडा ओपन ग्रॅंड प्रीक्समध्येही विजय मिळवला होता. यंदाच्या वर्षातील साईचे हे तिसरे विजेतेपद ठरले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताच्या सलामवीरांचा विक्रम

  • चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७मध्ये भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यात भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
  • शिखर धवन आणि रोहित शर्माने शानदार शतकी भागिदारी रचत संघाला दमदार सुरुवात करुन दिली.
  • चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत तीन शतकी भागिदाऱ्यांची नोंद करणारी पहिली जोडी होण्याचा मान शिखर आणि रोहितने पटकावला आहे.
  • रोहित-धवनने १४७ चेंडूंमध्ये १३६ धावांची भागिदारी रचत संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. 
  • आजच्या सामन्यापूर्वी रोहित आणि धवनने २०१३मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन वेळा शतकी भागिदारी केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा