चालू घडामोडी : ५ जून

इस्रोकडून जीएसएलव्ही मार्क ३चे यशस्वी प्रक्षेपण

  • भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या ‘जीएसएलव्ही मार्क ३’ (GSLV MK III) या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचे ५ जून रोजी श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • या प्रक्षेपकाद्वारे ३,१३६ किलो वजनाच्या जीसॅट-१९ या उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहामुळे  भारतातील इंटनेटचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.
  • ‘जीएसएलव्ही मार्क ३’मुळे आता भारताला २.३ टनापेक्षा जास्त वजनाचे उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी परदेशात जाण्याची गरज राहणार नाही.
  • तसेच या उपग्रह प्रक्षेपकाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भविष्यात भारतातूनच अंतराळवीर अवकाशात पाठवणे शक्य होणार आहे.
 ‘जीएसएलव्ही मार्क ३’बद्दल 
  • जीएसएलव्ही एमके-३: जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकल मार्क-३.
  • श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून प्रक्षेपण.
  • वजन: ६४० टन (भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे व वजनदार उपग्रह प्रक्षेपक)
  • संपूर्ण भारतीय बनावटीचे उपग्रह प्रक्षेपक.
  • प्रकल्प पूर्ण करण्यास लागलेला कालावधी: १५ वर्षे.
  • सुमारे ४ टनापर्यंत वजन वाहून नेण्याची या प्रक्षेपकाची क्षमता आहे. (यापूर्वीची भारताची क्षमता: २.३ टन)
  • त्यामुळे वजनदार उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी भारताला दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
  • स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार झालेल्या नव्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर. लिक्विड ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर.
  • यामुळे भविष्यात भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवता येतील.
  • इस्रोचे प्रमुख: किरण कुमार

संतोष वैद्य यांची जागतिक बँकेवर नियुक्ती

  • पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती केलेले आयएएस अधिकारी संतोष वैद्य यांची जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांचे वरिष्ठ आर्थिक कामकाज सल्लागार म्हणून निवड झाली आहे.
  • संतोष वैद्य हे १९९८मधील अगमुट (अरुणाचल, गोवा, मिझोराम, केंद्रशासित प्रदेश) या केडरमधील आयएएस अधिकारी आहेत.
  • त्यांचा प्रशासनातील अनुभव खूप मोठा असून ईशान्येकडील राज्यांत त्यांचे काम विशेष ठसा उमटवणारे आहे.
  • आयआयटी खरगपूर या संस्थेतून त्यांनी इन्स्ट्रमेन्टेन्शन या विषयात त्यांनी बीटेक केले. तर अर्थशास्त्र या विषयात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.
  • त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात २०००-२००१मध्ये ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशातून झाली.
  • त्यांनी गोव्यात मुख्यमंत्री सचिवालयात तसेच दिल्ली जल मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले आहे.
  • २०१२-१३मध्ये ते दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे विशेष सचिव म्हणूनही कार्य केले आहे.
  • वैद्य यांची सप्टेंबर २०१३मध्ये पंतप्रधान कार्यालयात संचालक म्हणून नेमणूक झाली, त्यानंतर मार्च २०१६ पर्यंत ते त्या पदावर कार्यरत होते.
  • अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयात काम करताना त्यांनी ऑफ ग्रीड सोलर रूफटॉप प्रकल्पांसाठी काम केले.
  • २००७मध्ये त्यांना राष्ट्रीय पदकाने सन्मानित करण्यात आले होते. २००८च्या निवडणुकांत त्यांना मुख्य सचिवांनी उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरीसाठी गौरवले.
  • तर २००९च्या संसदीय निवडणुकांवेळी चांगली प्रशासकीय कामगिरी केल्याने निवडणूक आयोगाने त्यांना चांगल्या कामाचे प्रमाणपत्र दिले होते.
  • मुळचे पुण्याचे असेलेल्या संतोष वैद्य यांना नव्या नियुक्तीने तीन वर्षे अमेरिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे.

सौदीसह चार देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडले

  • दहशतवादाला खतपाणी घालून आखाती देशांमध्ये अस्थिरता निर्माण करत असल्याचा आरोप करत बहारिन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इजिप्त या देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडत असल्याचे जाहीर केले आहे.
  • यानुसार कतारशी जमीन, हवाई आणि समुद्रीमार्गे होणारा संपर्क तोडण्यात आला आहे. तसेच कतारच्या मुत्सद्यांना हे चारही देश आपल्याकडून काढून टाकणार आहेत.
  • सौदी अरेबियाच्या कतारमधील नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी १४ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. 
  • दहशतवाद आणि अतिरेक्यांना रोखण्यासाठी ही कृती आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण सौदी अरेबियाकडून देण्यात आले.
  • इजिप्तने कतार हा दहशतवादी संघटनांना पाठबळ देत असल्याचा आरोप केला. यूएईनेही कतारमुळे आखाती परिसरात अस्थिरता निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
  • तर बहारिनने कतार व इराण आमच्या देशात घातपाती कारवाया करणाऱ्या गटांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे.
  • मुस्लिम ब्रदरहूड, अल कायदा, इस्लामिक स्टेटला (आयएस) पाठिंबा देणे आणि इराणशी संबंध असणे असे आरोप कतारवर ठेवण्यात आले आहेत.
  • कतार हा देश नैसर्गिक वायूने समृद्ध असून २०२२मध्ये जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद त्याच्याकडे आहे. शिवाय अमेरिकेचा कतारमध्ये १०,००० सैनिकांचा महत्त्वाचा लष्करी तळही आहे.

रिअल माद्रिदला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद

  • क्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात त्यांनी युवेंटसचा ४-१ ने पराभव केला.
  • या विजयाबरोबरच १९९०नंतर प्रथमच एखाद्या संघाने युरोपियन फुटबॉल क्लब लीगच्या चषकावर सलग दुसऱ्या वर्षी नाव कोरले आहे.
  • याआधी एरिगो साची यांच्या मार्गदर्शनाखाली ए सी मिलानने १९८९ आणि १९९० अशी दोन वर्षे या विजेतेपदावर वर्चस्व टिकवले होते.
  • रिअल माद्रिदने गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा हा चषक जिंकला आहे. चॅम्पियन्स लीगचे हे त्यांचे १२वे विजेतेपद आहे.
  • चॅम्पियन्स लीग विजेत्या संघाचा खेळाडू हा मान चौथ्यांदा पटकावणारा रोनाल्डो अंतिम फेरीतील दोन गोलसह या स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.
  • तसेच रिअल माद्रिदचे मुख्य प्रशिक्षक झिनेदिन झिदान दोन वेळा चषक जिंकून देणारे पहिले विदेशी प्रशिक्षक ठरले.
  • चॅम्पियन्स लीग स्पर्धेत रिअल माद्रिदच्या नावावर एकूण ५०३ गोल जमा असून, पाचशे गोलचा टप्पा गाठणारा हा या स्पर्धेतील एकमेव क्लब आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा