चालू घडामोडी : १६ जून

नवीन बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक

  • केंद्र सरकारने नवीन बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असून, या बदलांची अंमलबजावणी १ जूनपासून सुरु झाली आहे.
  • बँक खाते उघडताना ज्यांच्याकडे बँक खाते नसेल त्यांना किमान आधार नोंदणी क्रमांक सादर करावा लागेल. त्यानंतर सहा महिन्यांच्या आधार कार्ड बँकेकडे जमा करावे लागेल.
  • या नवीन निर्णयानुसार, ५० हजार रुपये अथवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँक व्यवहारांसाठीही पॅन किंवा फॉर्म ६० सोबत आधार कार्ड सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • तसेच विद्यमान बँक खातेधारकांना ३१ डिसेंबर २०१७पर्यंत आधार कार्ड क्रमांक बँकेत द्यावा लागणार आहे, अन्यथा त्यांची खाती अवैध ठरवण्यात येतील.
  • याआधी केंद्र सरकारने येत्या १ जुलैपासून प्राप्तिकर विवरणपत्र भरताना पॅन कार्डासोबत आधार कार्ड जोडण्याचे आदेश दिले होते.
  • याशिवाय, नव्या पॅन कार्डासाठी अर्ज करतानादेखील आधार कार्ड सादर करणे बंधनकारक केले आहे.

भारताचे माजी सरन्यायाधीश पी एन भगवती यांचे निधन

  • देशातील न्यायिक कृतिवादाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी सरन्यायाधीश पी एन भगवती (वय ९५ वर्षे) यांचे १५ जून रोजी निधन झाले.
  • देशातील ख्यातनाम वकीलांमध्ये भगवती यांचा समावेश होता. प्रफुल्लचंद्र नटवरलाल भगवती असे त्यांचे पूर्ण नाव होते.
  • भगवती देशाचे १७वे सरन्यायाधीश होते. त्यांनी जुलै १९८५ ते डिसेंबर १९८६ यादरम्यान देशाचे हे सर्वोच्च न्यायिक पद भूषविले होते.
  • ते गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. जुलै १९७३ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती.
  • सरन्यायाधीश असताना त्यांनी जनहित याचिका आणि भारतीय न्यायिक प्रणालीप्रती संपूर्ण उत्तरदायित्व या दोन संकल्पना अस्तित्वात आणल्या.
  • भारतीय न्यायव्यवस्थेत जनहित याचिकेचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते. २००७मध्ये केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
  • त्यांनी ‘मूलभूत अधिकाराच्या मुद्यावर कोणतीही व्यक्ती त्या मुद्याशी स्वत:चा प्रत्यक्ष संबंध नसतानाही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकते,’ असा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता.

१९९३च्या साखळी बॉंबस्फोटप्रकरणी ६ जण दोषी

  • मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटप्रकरणी टाडा न्यायालयाने गॅंगस्टर अबू सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले.
  • न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करिमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले. तर सबळ पुराव्याअभावी अब्दुल कय्यूमची सुटका केली.
  • गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवायांसह शस्त्रास्त्र कायद्याखाली अबू सालेमला न्यायालयाने दोषी ठरवले.
  • सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी त्याच्यासह मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट आणि करिमुल्ला खान याला न्यायालयाने दोषी मानले.
  • बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्यासोबतच देशाची आणि विशेषतः मुंबईची अर्थव्यवस्था खिळखिळी व्हावी, या उद्देशाने हे स्फोट घडवून आणल्याचा सीबीआयचा दावाही न्यायालयाने मान्य केला.
  • या बॉंबस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७१३ जण जखमी झाले होते.

बुडीत कर्जांप्रकरणी सेंट्रल बॅंकेवर कारवाई

  • रिझर्व्ह बॅंकेने सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बॅंकेवर बुडीत कर्जांप्रकरणी कारवाई (प्रॉम्ट करेक्टीव्ह अॅक्शन) केली आहे.
  • यानुसार बँकेला नव्याने कर्ज वितरण करण्यावर तसेच लाभांश वितरण करताना निर्बंध येणार आहेत.
  • याआधी आरबीआयने देना बँक, आयडीबीआय बॅंक, इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि युको बॅंकेवर कर्ज थकबाकीवर कारवाई केली होती.
  • सेंट्रल बँकेच्या निव्वळ थकीत कर्जांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मालमत्तांवरील परतावा उणे झाल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे.
  • बॅंकांची ढोबळ बुडीत कर्जे १० टक्क्यांवर गेल्यास रिझर्व्ह बॅंकेकडून अशी कारवाई केली जाते.
  • मार्चअखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षात सेंट्रल बँकेला २,४३९ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. बुडीत कर्जांचे प्रमाण १०.२० टक्क्यांवर पोहचले आहे.

‘बॅटमॅन’ अॅडम वेस्ट यांचे निधन

  • ६०च्या दशकातील अमेरिकेतील ‘बॅटमॅन’ या टीव्ही सिरीजमध्ये बॅटमॅनची व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते अॅडम वेस्ट यांचे ९ जून रोजी निधन झाले.
  • १९६०च्या दशकामध्ये आलेल्या बॅटमॅन या सिरीजने अमेरिकेसह युरोपमधील बालचमूंसह अनेकांना आपली भुरळ पाडली होती. 
  • विल्यम वेस्ट अ‍ॅण्डरसन या नावाने १९२८साली वॉशिंग्टनमधील शहरगावात जन्मलेल्या वेस्ट यांनी साहित्यात पदवी मिळविली.
  • पण तत्कालीन पत्रकारिता आणि युद्धोत्तर नवसाहित्याच्या प्रांतात शिरण्याऐवजी वेस्ट यांनी हॉलीवूड गाठून आपल्या नावात बदल केला.
  • १९६६ ते ६८ या काळामध्ये अ‍ॅडम वेस्ट हे लौकिकार्थाने पडद्यावर बॅटमन म्हणून समोर आले आणि नुकत्याच झालेल्या त्यांच्या मृत्यूपर्यंत बॅटमन म्हणूनच जगले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा