चालू घडामोडी : १८ जून

किदम्बी श्रीकांतला इंडोनेशिया सुपर सीरिजचे जेतेपद

  • भारतीय बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमिअरच्या पुरुष एकेरीत जेतेपद पटकावले. असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • श्रीकांतने अंतिम सामन्यात जपानच्या काजुमासा सकाईवर २१-११, २१-१९ अशा दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवला.
  • श्रीकांतने जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू कोरियाच्या सोन वॉन हो याला पराभूत करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
  • त्याच वेळी या स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवणाऱ्या भारताच्या एच एच प्रणॉयला काजुमासा सकाईने पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळविले होते.
  • जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतसाठी ही चौथी सुपर सिरीज फायनल होती. यापूर्वी दोन वेळा त्याने सुपर सिरीजचे विजेपद मिळविले आहे.
  • याआधी श्रीकांत २०१४मध्ये ‘चायना ओपन’चा तर २०१५मध्ये ‘इंडिया ओपन’चा विजेता ठरला होता. तर एप्रिल २०१७मध्ये झालेल्या ‘सिंगापूर ओपन’मध्ये तो अंतिम सामन्यात भारताच्याच साईप्रणीतकडून पराभूत झाला होता.

सुनील छेत्री सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानी

  • भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने समकालीन खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
  • छेत्रीने कारकीर्दीतील ९४व्या सामन्यात ५४वा गोल करत इंग्लंडचा आघाडीपटू वेन रुनीला (११९ सामन्यात ५३ गोल) मागे टाकले.
  • २०१९मध्ये होणाऱ्या आशियाई चषक स्पर्धेसाठीच्या पात्रता सामन्यात किर्गिस्तानविरुद्धच्या लढतीत छेत्रीने ही कामगिरी केली.
  • सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये छेत्रीच्या पुढे पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (१३९ सामन्यांत ७३ गोल), अर्जेटिनाचा लिओनल मेस्सी (११८ सामन्यांत ५८ गोल) व अमेरिकेचा क्लिंट डेम्पसी (१३४ सामन्यांत ५६ गोल) हे तिघे जण आहेत.
  • विशेष म्हणजे छेत्रीची गोल करण्याची सरासरी रोनाल्डो, मेस्सी, डेम्पसी व रुनी या चौघांपेक्षाही सरस आहे.
  • त्याची सध्याची प्रत्येक सामन्यातील गोल करण्याची सरासरी ०.५७ इतकी आहे. रोनाल्डो, मेस्सी, डेम्पसी व रुनी यांची सरासरी अनुक्रमे ०.५२, ०.४९, ०.४२ व ०.४५ इतकी आहे.
  • ब्राझिलचा नेयमार ज्युनियर (०.६८), मालदिवचा अली अशफाक (०.६८) आणि बोस्नियाचा इडिन झेको (०.६३) या तिघांची सरासरी छेत्रीपेक्षा जास्त आहे.
  • सर्वोच्च गोल करणाऱ्या अव्वल ३० जणांच्या यादीत (सध्या खेळत असलेले व निवृत्त झालेले) छेत्रीचासुद्धा समावेश आहे.

चॅम्पियन्स करंडक अंतिम सामन्यात भारत पराभूत

  • २०१७च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा १८० धावांनी पराभव करत चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले.
  • अंतिम सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या ३३९ धावसंख्येचा पाठलाग करण्यात भारताची फलंदाजांना अपयश आले.
  • भारतातर्फे हार्दीक पांड्याने ४६ चेंडूमध्ये ७६ धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने रविंद्र जाडेजासोबत ८० धावांची भागीदारी केली.
  • सलामीवीर फखार झमानचे शतक, हसन अली आणि मोहम्मद हाफीजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ३३९ धावांचे आव्हान उभे केले.
  • पाकिस्तानकडून हसन अली आणि मोहम्मद आमीरने प्रत्येकी ३-३ बळी घेतले. त्यांना शादाब खानने २ बळी घेत चांगली साथही दिली. 

माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत अग्रेसर

  • जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (डब्ल्यूआयपीओ) दहाव्या आवृत्तीनुसार माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत सर्वात मोठा देश म्हणून पुढे आला आहे.
  • भारत हा आशियातील उदयोन्मुख नावीन्यपूर्ण केंद्र असल्याचे मत यात व्यक्त करण्यात आले आहे. तथापि, राजकीय स्थिरता आणि सुरक्षितता यात भारत १०६व्या क्रमांकावर आहे.
  • जगातील उदयोन्मुख १३० देशात भारताचे स्थान ६०वे आहे. मध्य व दक्षिण आशियात भारत प्रथम क्रमांकावर आहे. गतवर्षीच्या ६६व्या स्थानावरून भारत यंदा ६०व्या स्थानावर आला आहे.
  • भारत, केनिया, व्हिएतनामसह अन्य काही देशांनी आपल्या समकक्ष देशांपेक्षा या क्षेत्रात आघाडी घेतली आहे.
  • संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीच्या मते नव्या उत्पादनांच्या संदर्भात जागतिक परिवर्तनात समृद्ध देशांचे वर्चस्व कायम आहे. सलग सातव्या वर्षी स्वित्झर्लंड प्रथम स्थानावर आहे.
  • माहिती व संपर्क सेवा निर्यातीत भारत अग्रेसर आहे. तर विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या पदवीधरांच्या बाबतीत भारत १०व्या स्थानावर आहे.
  • भारत ई-भागीदारीबाबत २७व्या, जागतिक संशोधन आणि कंपन्यांच्या विकासाबाबत १४व्या, सरकारी ऑनलाइन सेवांच्या बाबतीत ३३व्या क्रमांकावर आहे.
  • पायाभूत विकासाच्या बाबतीत भारत ३२व्या आणि सर्जनशील वस्तूंच्या निर्यातीत १८व्या स्थानावर आहे.
  • बौद्धिक संपदेच्या बाबतीत भारताचे स्थान २९वे, तर नावीन्यपूर्ण गुणवत्तेत सलग दुसऱ्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अमेरिका-क्युबा करार रद्द

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १७ जून रोजी क्युबा करार रद्द केला. त्यामुळे आता अमेरिकेतील कंपन्या आणि लोक क्युबाबरोबर व्यापार करू शकणार नाहीत.
  • माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेला हा करार भयानक आणि संभ्रमात टाकणारा असल्याचे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.
  • ट्रम्प यांनी प्रसिध्द केलेल्या नव्या नियमांनुसार अमेरिकेचे नागरिक आता शिक्षणिक सहलींव्यातिरिक्त क्युबाला जाऊ शकणार नाहीत. तसेच अमेरिकेच्या कंपन्यांना क्युबाबरोबर व्यापारही करता येणार नाही. 
  • मात्र ट्रम्प यांनी क्युबातील अमेरिकन दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतलाला नाही. दूतावासाच्या माध्यमातून दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील.
  • डिसेंबर २०१४मध्ये काही काळासाठी अमेरिका आणि क्युबामधील संबंध सुधारलेले होते. बराक ओबामा यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
  • २०१६मध्ये त्यांनी क्युबाचा दौराही केला होता. ते १९५६नंतर क्युबाचा दौरा कराणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा