चालू घडामोडी : २५ जुलै

ज्येष्ठ शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ प्रा. यशपाल यांचे निधन

  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. यशपाल यांचे २४ जुलै रोजी वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले.
  • विज्ञानातील कठीण गोष्टी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. वैज्ञानिक तथ्ये आणि त्यांची प्रक्रिया सोप्या शब्दांत त्यांनी मांडल्या.
  • यशपाल हे दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘टर्निंग पाँईंट’ या विज्ञान मालिकेत ‘विज्ञान गुरू’च्या भूमिकेत होते. या माध्यमातून ते विज्ञान आणि निसर्गातील अनेक रहस्यांची उकल ते रंजक पद्धतीने करत.
  • पाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर १९२६ रोजी प्रा.यशपाल यांचा जन्म झाला. शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.
  • त्यांनी भौतिकशास्त्रात १९४९मध्ये पदवी तर १९५८मध्ये मॅसेच्यूसेट्स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून भौतिकशास्त्रातच पीएचडीही मिळवली होती.
  • केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विज्ञानविषयक अनेक समित्यांचे त्यांनी सदस्य व सल्लागार म्हणून काम पाहिले. तसेच त्यांनी अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांमध्येही कार्य केले. 
  • यशपाल यांनी प्रा.पीटर्स बर्नार्ड यांच्याबरोबर विश्वकिरणांवर (कॉस्मिक किरण) महत्त्वाचे काम केले.
  • १९७३मध्ये यशपाल अहमदाबादला इस्रोच्या स्पेस अॅप्लीकेशन सेन्टरमध्ये दाखल झाले. तेथे यशपाल यांच्या गटाला सॅटलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपिरीमेंट उर्फ साईट कार्यक्रमाची जबाबदारी दिली होती.
  • त्यांनी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान व बिहार येथील चार राज्यातील ग्रामीण मुलांचे शिक्षण सेटलाईटद्वारा करण्याचा उपक्रम राबविला होता.
  • १९८१ साली ते दोन वर्षांकरिता युनेस्कोमध्ये यूएन कॉन्फरन्स ऑन आऊटर स्पेसचे प्रमुख बनले.
  • १९८३-८४ दरम्यान ते योजना आयोगाचे मुख्य सल्लागार होते. पुढे ते भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्याचे सचिव झाले.
  • १९८६ ते १९९१ पर्यंत त्यांनी यूसीजीचे अध्यक्षपद भूषवले. या काळात त्यांनी भारतभर चार अंतर विद्यापीठीय केंद्रे स्थापन केली. २००७-१२ दरम्यान ते जेएनयूच्या कुलपतीपदी होते.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या तत्कालीन भारत जन विज्ञान जाथा या भारतव्यापी कार्यक्रमाचे अध्यक्षपदही त्यांना देण्यात आले होते.
  • विज्ञानातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांना १९७६मध्ये पद्मभूषण तर २०१३मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

महिला व बालविकास मंत्रालयाचे ‘शी-बॉक्स’ पोर्टल

  • नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होत असल्यास त्याच्या तक्रारी करण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने ‘शी-बॉक्स’ हे पोर्टल सुरू केले.
  • या पोर्टलवर केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या महिलांना लैंगिक छळ होत असल्यास तक्रारी करता येतील.
  • लवकरच यात खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांत असलेल्या महिलांनाही समाविष्ट केले जाईल असे महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी जाहीर केले.
  • याशिवाय नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होण्याचे प्रमाण किती आहे याची देशव्यापी पाहणी करण्यात येणार आहे.
  • लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी ऑनलाइन मंच उपलब्ध करून देण्याची घोषणा गेल्या ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती.
  • सद्यस्थितीला नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या गुन्ह्यांची नोंद घेण्याची कुठलीही केंद्रीभूत व्यवस्था नाही.
  • राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१४पासून कामाच्या ठिकाणी विनयभंग व इतर गुन्ह्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
  • २०१५च्या आकडेवारीनुसार ११९ गुन्हे यात दाखल झाले त्यात ७१ लोकांवर आरोपपत्रे ठेवण्यात आली तर एकूण ५ जणांना शिक्षा झाली.

प्रोजेक्ट ७५ इंडिया

  • नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी जगातील सर्वात अत्याधुनिक पाणबुडी निर्मितीच्या प्रकल्पावर पुन्हा काम सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • या संबंधित करार पूर्णत्वास गेल्यास, तो संरक्षण भारताचा आतापर्यंतचा भारताचा सर्वात मोठा करार असेल.
  • रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्वीडन आणि स्पेन या सहा देशांच्या मदतीने भारत सहा अत्याधुनिक पाणबुड्यांची निर्मिती करणार आहे.
  • या प्रकल्पाला केंद्र सरकारने प्रोजेक्ट ७५ इंडिया (पी-७५ आय) असे नाव दिले आहे. या प्रकल्पासाठी ७० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 
  • पाकिस्तान आणि चीनच्या कुरापती लक्षात घेऊन या प्रकल्पाला गती देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.
  • या कराराला नोव्हेंबर २००७ मध्येच संमती देण्यात आली आहे. मात्र अद्याप या करारांतर्गत कोणत्याही पाणबुडीची निर्मिती करण्यात आलेली नाही.
  • सहा अत्याधुनिक पाणबुड्यांच्या उभारणीचा प्रकल्प संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे.

रामनाथ कोविंद देशाचे १४वे राष्ट्रपती

  • संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे एस केहर यांच्याकडून शपथ ग्रहण केल्यानंतर रामनाथ कोविंद देशाचे १४वे राष्ट्रपती बनले आहेत.
  • बिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये १६ वर्षे वकिली केली आहे. याशिवाय कोविंद यांची राज्यसभा सदस्य म्हणूनही दोनदा निवड झाली आहे.
 राष्ट्रपती भवन 
  • राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती भवनातील मुक्काम सुरु झाला.
  • राष्ट्रपती भवनात सुमारे तीनशेहून अधिक खोल्या असून साडेसातशेहून अधिक कर्मचारी आहेत.
  • राष्ट्रपती भवनाची निर्मिती ब्रिटिश वास्तूरचनाकार सर एडविन लुटियन्स आणि हरबर्ट बेकर यांनी केली होती.
  • राष्ट्रपती भवन ३३० एकरवर उभारण्यात आलेले आहे. १९१३मध्ये या वास्तूच्या उभारणीला सुरुवात झाली.
  • या वास्तूच्या निर्मितीसाठी १६ वर्षांचा कालावधी लागला. २३ हजारांपेक्षा अधिक मजुरांनी अथक मेहनत करुन या वास्तूची निर्मिती केली.

आयसीसी विश्वचषक संघाच्या कर्णधारपदी मिताली राज

  • आयसीसीने जाहीर केलेल्या महिला विश्वचषक (२०१७) संघाच्या कर्णधारपदी भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची निवड करण्यात आली आहे. 
  • विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या संघातील निवडक खेळाडूंची आयसीसीच्या १२ सदस्यीय संघात निवड होत असते.
  • मिताली राजने या संपूर्ण स्पर्धेत ४०९ धावा केल्या. यात न्यूझीलंडविरुद्ध महत्वाच्या सामन्यात केलेली शतकी खेळीचा समावेश आहे.
  • मिताली राज व्यतिरीक्त भारतीय संघातील हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा या खेळाडूंचाही आयसीसीच्या या संघात समावेश करण्यात आला आहे.
  • याव्यतिरीक्त मालिकावीराचा किताब पटकावणारी इंग्लंडची टॅमसिन बेमाँटसह पाच इंग्लिश महिला क्रिकेटपटूंचा या संघात समावेश आहे. 
  • याव्यतिरीक्त दक्षिण आफ्रिकेच्या तीन आणि ऑस्ट्रेलियाच्या एका महिला क्रिकेटपटूला या संघात जागा मिळाली आहे.

तमिळनाडूच्या शाळांमध्ये वंदे मातरम्‌ अनिवार्य

  • तमिळनाडूतील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरम्‌ हे राष्ट्रगीत आठवड्यातून एकदा तरी म्हणणे बंधनकारक असल्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने जाहीर केला आहे.
  • याशिवाय सरकारी कार्यालये व संस्था, खासगी कंपन्या व कारखाने, उद्योग आदींमध्येही महिन्यातून एकदा वंदे मातरम्‌ वाजविणे व गाणे बंधनकारक केले आहे.
  • वीरमणी यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेवर हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला.
  • राष्ट्रगीताचा तमिळ व इंग्रजी अनुवाद करण्याची सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला न्यायालयाने दिली आहे.
  • वंदे मातरम्‌ गाण्यास कुणाचा काही आक्षेप असेल तर त्यासाठी सक्ती केली जाणार नाही, पण त्यासाठी वैध कारण असायला हवे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
  • यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी जन-गण-मन हे राष्ट्रगीत देशभरातील सर्व सिनेमाघरांमध्ये वाजवणे तसेच पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवणे अनिवार्य केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला होता.   

 ‘थ्री थाऊजंड स्टीचेस’ पुस्तकाच्या लेखिका: इन्फोसिस फाऊंडेशच्या अध्यक्षा सुधा मूर्ती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा