चालू घडामोडी : ५ ऑगस्ट

व्यंकय्या नायडू देशाचे १३वे उपराष्ट्रपती

  • भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांची देशाचे १३वे उपराष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • व्यंकय्या नायडू यांनी  उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला.
  • विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपल्यानंतर ११ ऑगस्टला व्यंकय्या नायडू हे देशाचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतील.
  • उपराष्ट्रपतिपदासाठी लोकसभा व राज्यसभेचे खासदार मतदान करीत असतात. या निवडणुकीत ७९० मतदार होते.
  • विजयासाठी ३९६ मतांची आवश्यकता असताना नायडू यांना ५१६ मते (६८ टक्के) मिळाली असून गांधी यांना २४४ मते (३२ टक्के) मिळाली.
  • राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या बिजू जनता दल व संयुक्त जनता दलाने उपराष्ट्रपतिपदासाठी गांधी यांना पाठिंबा दिला होता.
  • महात्मा गांधीजींचे नातू असलेले डॉ. गोपाळकृष्ण गांधी हे पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत.
 व्यंकय्या नायडू यांच्याबद्दल 
  • व्यंकय्या नायडू यांचा प्रवास विद्यार्थी नेता, आमदार, खासदार, भाजपाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री ते आता उपराष्ट्रपती असा झालेला आहे. 
  • ६८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी तेलुगू, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये भारतभर भाषणे देऊन उत्तम वक्ता म्हणूनही नाव कमावेलेले आहे.
  • व्यंकय्या नायडू यांचा जन्म १ जुलै १९४० रोजी आंध्रप्रदेशमधील नेल्लोर येथे झाला. त्यांचे वडील रंगैया नायडू हे शेतकरी होते.
  • नायडू यांनी नेल्लोरमधील महाविद्यालयातून पदवी व यानंतर विशाखापट्टणम मधील आंध्र विद्यापीठातून त्यांनी एलएलबी पूर्ण केले.
  • महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच नायडू राजकारणाकडे वळले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते अध्यक्ष होते.
  • यानंतर ते भाजपमध्ये सक्रीय झाले. १९७२च्या ‘जय आंध्र’ आंदोलनातून त्यांना नेता म्हणून ओळख मिळाली.
  • १९७५मध्ये आणीबाणीच्या काळात मिसा कायद्यांतर्गत ते तुरुंगातही गेले होते. भाजपसाठी भिंतीवर घोषणा लिहीण्याचे कामही त्यांनी केले.
  • आंध्र प्रदेशमध्ये १९७८ ते ८३ आणि १९८३ ते ८५ या कालावधीत नायडू आमदार म्हणून विधीमंडळात निवडून आले.
  • त्यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवक्ता, राष्ट्रीय सरचिटणीस या पदांवरतीही काम केले. २००२-०४ या कालावधीमध्ये ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमले गेले.
  • जनकृष्णमुर्ती, बंगारु लक्ष्मण यांच्या नंतर भाजपाच्या अध्यक्षस्थानी बसणारे आणि दक्षिणेतून येणारे ते तिसरे व्यक्ती बनले.
  • व्यंकय्या नायडू हे ४ वेळा राज्यसभेचे खासदार राहिले. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचा त्यांचा १९ वर्षांचा अनुभव आहे.
  • १९९८मध्ये पहिल्यांदा त्यांची कर्नाटकातून राज्यसभेवर निवड झाली. नंतर २००४ व २०१०मध्येही त्यांना कर्नाटकातूनच राज्यसभेवर पाठवण्यात आले. २०१६मध्ये राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले.
  • संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेले नायडू हे अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते.
  • २००० ते २००२ या कालावधीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये नायडू यांनी ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली.
  • रालोआ सरकारची महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कल्पना त्यांनीच मांडली होती.
  • तर मोदींच्या मंत्रिमंडळात २०१४ ते २०१७ या कालावधीत ते संसदीय कामकाज मंत्री व नागरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री बनले. २०१६साली माहिती आणि प्रसारण खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविण्यात आली.
  • आंध्रप्रदेशमधून निवडून गेलेले नायडू हे तिसरे उपराष्ट्रपती आहेत. यापूर्वी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्ही व्ही गिरी हे दोघेही उपराष्ट्रपती झाले होते. यानंतर दोघेही राष्ट्रपती विराजमान झाले होते.

निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी डॉ. राजीव कुमार

  • मोदी सरकारने नियोजन आयोग बरखास्त करून स्थापलेल्या निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली.
  • तर दिल्लीतील एम्समधील बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद पॉल यांची निती आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष डॉ. अरविंद पानगढिया ३१ ऑगस्ट रोजी पदभार सोडतील. त्यानंतर डॉ. राजीव कुमार निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी रुजू होतील.
  • नोटाबंदी, कृषी, आरोग्य आदी क्षेत्रांतील सुधारणांवरुन मोदी सरकारमधील धुरिणांशी मतभेद झाल्यानंतर पानगढिया यांनी १ ऑगस्ट रोजी पदाचा राजीनामा दिला होता.
 राजीव कुमार यांच्याबद्दल 
  • सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे फेलो असलेल्या राजीव कुमार यांनी भारतीय अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेबद्दल अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे.
  • राजीव कुमार यांनी लखनऊमधून पीएचडी केली असून, ऑक्सफोर्डमधून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये डीफीलची पदवी घेतली आहे.
  • २००६ ते २००८ या कालावधीत ते केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्यदेखील होते. याशिवाय ‘फिक्की’चे ते माजी महासचिवदेखील आहेत.
  • एशियन डेव्हलपमेंट बँक, अर्थ आणि उद्योग मंत्रालयातील कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५मध्ये नियोजन आयोग मोडीत काढून निती आयोगाची स्थापना केली. देशाची आर्थिक धोरणे ठरविण्यामध्ये निती आयोगाची महत्वाची भूमिका आहे.

बंगळुरुमध्ये देशातील पहिली हेलिटॅक्सी

  • बंगळुरुमध्ये विमानप्रवाशांसाठी प्रथमच हेलिकॉप्टर टॅक्सी सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील प्रवाशांना १५ मिनिटांमध्ये विमानतळावर ये-जा करणे शक्य होणार आहे.
  • बंगळुरुची लोकसंख्या सुमारे १ कोटी इतकी असून या शहरामध्ये ६९ लाख वाहने आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक ३ व्यक्तींच्या मागे २ दुचाकी आहेत. त्यामुळे या शहरामध्ये सतत वाहतूक कोंडी असते.
  • मेट्रोचे जाळे अद्याप पुरेसे पसरलेले नसल्यामुळे आजही बंगळुरुच्या नागरिकांना रस्तेवाहतुकीवरच भर द्यावा लागतो.
  • इलेक्ट्रॉनिक सिटीमधील रहिवाशांना या सुविधेचा लाभ होणार आहे. इलेक्ट्रॉनिक सिटी आणि विमानतळ यांच्यामधील अंतर ५५ किमी असून, प्रवाशांना ते अंतर पार करण्यासाठी २ तास प्रवास करावा लागतो.
  • बंगळुरुमधील एचएएल विमानतळ, व्हाईटफिल्ड एअरपोर्ट येथे हे हेलिकॉप्टर उतरू शकेल. त्याचप्रमाणे ज्या इमारतींवर हेलिपॅड आहे अशा ९० इमारतींवर हे हेलिकॉप्टर उतरू शकेल.
  • सध्या ही सेवा थुम्बे एव्हिएशन कंपनीतर्फे सुरु होत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकावेळेस ६ प्रवासी प्रवास करु शकतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा