चालू घडामोडी : ५ सप्टेंबर

चीनमध्ये ब्रिक्सची नववी शिखर परिषद

  • ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान होत असलेल्या ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल झाले.
  • सुमारे ७३ दिवस चीनबरोबर भारताचा डोकलाम येथे वाद सुरू होता. तो मिटल्यानंतर मोदी यांचा हा शिखर परिषदेसाठीचा प्रथमच चीन दौरा आहे.
  • ब्रिक्स शिखर बैठक ३ दिवस चालणार असून त्याचा प्रारंभ ब्रिक्स व्यापार मंडळाच्या कार्यक्रमाने फुजियान प्रांतातील शियामेन शहरात झाला.
  • यामध्ये इजिप्त, केनिया, ताजिकिस्तान, मेक्सिको, थायलंड या देशांना अतिथी देश जाहीर केले असून त्यांच्या प्रतिनिधींना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
  • या परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करताना, लष्कर ए तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचा कठोर शब्दांमध्ये निषेध केला.
  • यानंतर ब्रिक्स देशांच्या घोषणापत्राच्या ४८व्या परिच्छेदात दहशतवादाबद्दल चिंतादेखील व्यक्त करण्यात आली.
  • नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी गोवामध्ये पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत बोलताना पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचे वक्तव्य केले होते.
  • पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी भारताकडून वारंवार करण्यात आली आहे. मात्र भारताच्या प्रयत्नांना चीनकडून अनेकदा खीळ घालण्यात आली.
 मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे 
  • विकासासाठी ब्रिक्स देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि इनोव्हेशनची आवश्यकता आहे. शांती आणि विकासासाठी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे.
  • आम्ही गरिबी हटवण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहोत. ज्यामुळे आरोग्य, स्वच्छता, तांत्रिक कौशल्य, अन्न सुरक्षा, लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकेल.
  • ब्रिक्सच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या एनडीबीने देशांच्या दिर्घकालीन विकासासाठी कर्ज देण्यास सुरुवात केली पाहिजे.
  • आम्ही काळ्या पैशाविरोधात लढा पुकारला आहे. स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. ब्रिक्स देशांवर बदलाची जबाबदारी आहे. 
  • भारत एक तरुण देश आहे, आणि हीच आमची ताकद आहे. भारतातील ८० कोटी तरुण आमची ताकद आहेत.
  • स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने पुढील दशक अत्यंत महत्वाचे असणार आहे.
 ब्रिक्स (BRICS) 
  • ‘ब्रिक्स’ हे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे.
  • हा विकसनशील देशांचा गट सध्याच्या विकसित अर्थव्यवस्थांची जागा घेऊ शकतो, अशी संकल्पना गोल्डमन सॅक या सल्लागार कंपनीने सवर्प्रथम मांडली.
  • यातूनच जून २००६मध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन या चार देशांच्या ‘ब्रिक’ (BRIC) या संघटनेची स्थापना झाली.
  • सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि ‘ब्रिक’ या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. २०११मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स झाले.
  • ब्रिक्स समूह जगाच्या २५ टक्के जमीन, ४० टक्के लोकसंख्या व २५ टक्के जीडीपीचे प्रतिनिधित्व करतो.
  • १६ जून २००९ रोजी ब्रिकच्या चार देशांच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातल्या एडातरीनबर्ग येथे संपन्न झाली.
  • क्रमाने दुसरी ब्राझिलिया, तिसरी सान्या (चीन), चौथी नवी दिल्ली, पाचवी दरबान (दक्षिण आफ्रिका), सातवी उफा (रशिया) आणि आठवी परिषद २०१६मध्ये पणजी येथे संपन्न झाली.
  • ब्रिक्स देशांची नववी शिखर परिषद ३ ते ५ सप्टेंबर २०१७ दरम्यान चीनमधील शियामेन शहरात नुकतीच पार पडली.
 ब्रिक्सची उद्दिष्टे 
  • आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राजकीय, आर्थिक आणि वित्तीय सुधारणा घडवून आणणे व संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोठ्या सत्तांकडे झुकलेला तोल सुधारणे.
  • जागतिक चलनपद्धतीला नव्याने ढाळून तिचे डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे.
  • दुसरे महायुद्ध संपल्यानंतरच्या गेल्या ७० वर्षांच्या काळात जागतिक अर्थकारणावर असलेला पाश्चिमात्य देशांचा वरचष्मा कमी करणे.
  • जागतिक स्तरावरील राजकारणातल्या विविध मुद्यांवर किमान सहमती घडवून परिणामकारक हस्तक्षेप करण्याची क्षमता मिळविणे.

प्रसिध्द भूलतज्ज्ञ डॉ. एडमंड एगर यांचे निधन

  • आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे वैज्ञानिक व भूलतज्ज्ञ डॉ. एडमंड टेड एगर यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने २६ ऑगस्ट रोजी निधन झाले.
  • वैद्यकीय कारणांसाठी रुग्णांना भूल देण्याच्या अ‍ॅलोपॅथीतील वैद्यकीय तंत्रात मोठी सुधारणा घडवून आणण्याचे कार्य डॉ. एडमंड एगर यांनी केले.
  • दरवर्षी विशिष्ट ३० कोटी लोकांवर औषधे श्वासावाटे देऊन भूल देण्याची प्रक्रिया केली जाते. ही नवी प्रक्रिया विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
  • शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाच्या हालचाली थांबवण्याकरिता भूल वापरली जाते. त्यातही कमीत कमी औषध वापरून हा परिणाम साधण्याचे ‘मिनिमम अलव्हेलॉर कॉन्स्ट्रेशन’ तंत्र त्यांनी विकसित केले.
  • आजपर्यंत डॉ. एडमंड एगर ठरवून दिलेली औषधांची मात्राच भूल देताना प्रमाण मानली जात आहे.
  • भुलीचे काम संपल्यानंतर या औषधांचा परिणाम पटकन संपवणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांनी भुलीची औषधे कशी द्यायची याचे काही नियमही सांगितले होते.
  • आजही त्यांच्या प्रयत्नातून तयार झालेली आयसोफ्लुरेन, सेव्होफ्लुरेन, डेसफ्लुरेन ही औषधे भूल देण्यासाठी वापरली जातात.
  • एडमंड यांचा जन्म १९३०मध्ये शिकागोत झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी ते हाईड पार्क स्कूलमधून पदवीधर झाले. 
  • इलिनॉय विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र व गणितात तर, १९५५मध्ये नॉर्थवेस्टर्न मेडिकल स्कूलमधून वैद्यकशास्त्रातील पदवी घेतली.
  • त्यांनी २४ अध्यासनांचे प्रमुखपद भूषवले होते. ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’ या लंडनच्या संस्थेचे ते फेलो होते.
  • एकूण ५०० पेक्षा जास्त शोधनिबंध त्यांनी लिहिले. ७ पुस्तकांचे ते लेखक किंवा सहलेखक होते. त्यात ‘ॲनेस्थेटिक अपटेक अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन’ या पुस्तकाचा समावेश आहे.
  • भूलशास्त्रात वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी त्यांनी ‘वेस्टर्न अ‍ॅनेस्थेशिया रेसिडेंट्स कॉन्फरन्स’ ही संस्था स्थापन केली.
  • त्यांना निसर्गात भटकंतीची आवड होती, ते चांगले गिर्यारोहकही होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा