चालू घडामोडी : ११ सप्टेंबर

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा २०१७


दृष्टीक्षेपात अमेरिकन ओपन २०१७
प्रकार विजेते उपविजेते
पुरुष एकेरी राफेल नदाल केविन अँडरसन
महिला एकेरी स्लोआनी स्टीफन्स मॅडिसन किज
पुरुष दुहेरी जीन जुलिअन रॉजर-होरीया तकाऊ फेलिसियानो लोपेझ-मार्क लोपेझ
महिला दुहेरी मार्टिना हिंगिस - चॅन युंग जॅन ल्युसी हॅराडेका - कॅटेरिना सिनिआकोव्हा
मिश्र दुहेरी मार्टिना हिंगिस-जॅमी मरे हो चॅन-मायकल व्हीनस
 पुरुष एकेरी 
  • स्पेनच्या राफेल नदालने अमेरिकन खुल्या स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.
  • नदालने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा ६-३, ६-३, ६-४ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
  • नदालचे हे १६वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तसेच या विजयासह त्याने तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
  • जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या नदालने याआधी २०१० आणि २०१३ मध्ये अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
  • त्याने यावर्षी जूनमध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले असून, त्याचे या वर्षातील हे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. 
  • ९६५नंतर (क्लिफ डाईडेलनंतर) अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारा अँडरसन दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच खेळाडू आहे.
  • १९८१मध्ये जोहान किरेक यांनी दक्षिण आफ्रिकेला शेवटचे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवून दिले होते.
 महिला एकेरी 
  • अमेरिकेच्या स्लोआनी स्टीफन्सचा अमेरिकेच्याच मॅडिसन किजला पराभूत अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
  • अंतिम लढतीत स्टीफन्सने ६१ मिनिटांत किजवर ६-३, ६-० असा एकतर्फी विजय मिळवला.
  • सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स यांच्यात २००२मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेची अंतिम लढत झाली होती. त्यानंतर १५ वर्षांनी पहिल्यांदाच अमेरिकन खेळाडू जेतेपदासाठी समोरासमोर आले.
  • ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकणारी स्टीफन्स ही पाचवी बिगरमानांकित महिला खेळाडू आहे. तिचे कारकिर्दीतील हे पहिलेच ग्रॅण्डस्लॅम जेतेपद आहे.
  • तसेच बिगरमानांकित खेळाडूने २००९नंतर पहिल्यांदाच अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. २००९मध्ये किम क्लिज्स्टर्सने ही कामगिरी केली होती.
  • अमेरिकन खुल्या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीत एकही सेट न गमावता १९७६ नंतर जिंकलेली ही पहिलीच लढत आहे.
 महिला दुहेरी 
  • स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसने तैवानच्या चॅन युंग जॅनसह खेळताना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले.
  • हिंगिस व युंग-जॅन यांनी अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी हॅराडेका आणि कॅटेरिना सिनिआकोव्हा यांच्यावर ६-३, ६-२ असा विजय मिळवला.
  • मार्टिना हिंगिसचे कारकीर्दीतील हे २५वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद आहे. तिने महिला दुहेरीतील १३, एकेरीत ५ आणि मिश्र दुहेरीत ७ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांवर नाव कोरले आहे.
  • या हंगामातील तिचे हे तिसरे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद आहे. तिने विम्बल्डन आणि अमेरिकन खुल्या स्पध्रेतील मिश्र दुहेरीचे जेतेपद नावावर केले आहे. तसेच यंदा सहा डब्लूटीए दुहेरी जेतेपदही तिच्या नावावर आहेत.

टॉम यांची आयसिसच्या तावडीतून सुटका

  • येमेनमध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरु टॉम उझहन्निल यांची येमेनमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने दीड वर्षाने सुटका करण्यात यश आले आहे.
  • फादर टॉम यांच्या सुटकेमध्ये सुल्तान ऑफ ओमानने महत्वाची भूमिका बजावली आहे. 
  • टॉम उझहन्निल हे केरळचे रहिवासी आहेत. ख्रिश्चन मिशनरीतर्फे चालवण्यात येणाऱ्या वृद्धाश्रमात धर्मगुरु टॉम उझहन्निल कार्यरत होते.
  • मार्च २०१६मध्ये येमेनमधील अदेन शहराच्या दक्षिण भागात आयसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यानंतर दहशतवाद्यांनी टॉम उझहन्निल यांचे अपहरण केले होते.
  • त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरु होते. यात येमेनसह सौदी अरेबिया आणि ओमान या देशांची मदत घेतली जात होती.

उत्तर कोरियावर कठोर निर्बंध

  • ३ सप्टेंबर रोजी उत्तर कोरियाने सहावी आणि सगळ्यात मोठी अणूचाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले आहेत.
  • ११ सप्टेंबर रोजी उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रांच्या १५ सदस्यांच्या सुरक्षा परिषदेने कठोर निर्बंध लादणारा ठराव एकमताने संमत केला. या निर्बंधांचा मसुदा अमेरिकेने तयार केला होता.
  • उत्तर कोरियाला त्याच्या अणु कार्यक्रमापासून रोखण्यासाठी त्याच्या तेलाच्या आयातीला आणि कापडाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्बंधांचा समावेश आहे.
  • उत्तर कोरियाकडून होत असलेल्या संपूर्ण तेल आयातीवर बंदीसह अमेरिकेने मूळात कठोर निर्बंधांचा प्रस्ताव मांडला होता.
  • परंतु निर्बंधांत कपात केल्यानंतरच उत्तर कोरियाचे मित्र देश रशिया आणि चीनच्या संमतीनंतर ठराव संमत झाला.
  • या निर्बंधांमुळे उत्तर कोरियाच्या वार्षिक महसूलात ५०० दशलक्ष किंवा त्यापेक्षाही जास्त अमेरिकन डॉलरची कपात होणार आहे.

प्रियांका पन्वर डोपिंगमध्ये दोषी

  • एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी धावपटू प्रियांका पन्वरवर डोपिंगमध्ये दोषी आढळल्याप्रकरणी राष्ट्रीय उत्तेजक द्रव सेवन विरोधी संस्थेने (नाडा) आठ वर्षांची बंदी घातली आहे.
  • डोपिंगमध्ये ती दुसऱ्यांदा दोषी आढळली आहे. यामुळे २९ वर्षाच्या प्रियांकाची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे.
  • गेल्या वर्षी आंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धेदरम्यान खेळाडूंची डोपिंग टेस्ट घेण्यात आली होती. त्यात तिने बंदी घातलेल्या ‘मेफेन्टेरमाइन’चे सेवन केल्याचे समोर आले आहे.
  • २०११मध्ये प्रियांकासह पाच अॅथलिटना डोपिंगमध्ये दोषी आढळल्याप्रकरणी दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.
  • दुसऱ्यांदा दोषी आढळल्यामुळे नियमानुसार प्रियांकावर ८ वर्षांची बंदी घालण्यात आली.
  • प्रियांकाने २०१४च्या एशियन गेम्समध्ये ४ बाय ४०० मीटर रिलेत सुवर्णपदक जिंकले आहे. यात तिच्यासह टिंटू लुका, मनदीप कौर, एम. आर. पूवम्माचाही समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा