नॉर्थ वेस्टर्न रेल्वेमध्ये नोकरीची संधी

  • नॉर्थ वेस्टर्न रेल्वे (NWR)मध्ये १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठी १२ विविध पदांसाठी एकूण ३०७ जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.
  • पगार, एकूण पदे, निवड प्रक्रिया आणि नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी माहिती खालीलप्रमाणे:
  • कोणती पदे रिक्त: स्टाफ नर्स, क्लार्क, स्टेनोग्राफर, असिस्टंट लोको पायलट, तिकीट तपासक, गुड्स गार्ड, ज्युनियर इंजिनिअर (सिग्नल) आणि इतर
  • वयाची मर्यादा: किमान १८ वर्षे ते कमाल ४२ वर्षे.
  • शैक्षणिक पात्रता: सरकारी मान्यता असलेल्या शैक्षणिक संस्थेतून १२ वी पास असणे गरजेचे, डिप्लोमा आणि डिग्री असलेल्यांना प्राधान्य.
  • नोकरीचे ठिकाण: देशभरात कुठेही
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: १२ ऑक्टोबर २०१७
  • नोंदणी शुल्क: कोणत्याही वर्गासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क भरायचे नाही.
  • पगार: ५२००-२०२०० रूपये प्लस ग्रेड पे १९००/२८०० आणि ९३००-३६००० रूपये प्लस ग्रेड पे ४६००/४२००
  • वेबसाईट: http://www.nwr.indianrailways.gov.in
  • अर्ज कसा कराल: इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या वेबसाईटवर क्लिक करून नोकरीसाठीचा ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. तसेच आपल्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी अटेस्ट करून यासोबत जोडायच्या आहेत. ही सगळी आवश्यक कागदपत्रे Principal North Central Railway Collage Tundla, District Firozabad, Pin – 283204 (UP) या पत्त्यावर पाठवायची आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा