चालू घडामोडी : ५ डिसेंबर

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड

  • राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, औपचारिक घोषणा ११ डिसेंबर रोजी होणार आहे.
  • गुजरातमधील निवडणुका संपल्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून, त्या अधिवेशनात राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होईल.
  • काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सर्व राज्यांतून मिळून सुमारे ८९ अर्ज आले होते. ते सर्व राहुल गांधी यांच्या नावाचे होते. त्यांच्याशिवाय कोणीही या पदासाठी अर्ज केला नव्हता.
  • काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी सर्वाधिक काळ सलग पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत. सोनिया गांधी यांच्यानंतर अध्यक्ष होणारे राहुल हे या घरातील सहावे अध्यक्ष असतील.
  • यापूर्वी या घरातील मोतिलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते.

चीनने पाकिस्तानचा आर्थिक पुरवठा थांबवला

  • भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पाकिस्तानमधील चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) अंतर्गत येणाऱ्या तीन मोठ्या प्रकल्पांचा आर्थिक पुरवठा चीनने थांबवला आहे.
  • चीनने निधी रोखल्यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय महामार्ग अधिकार यंत्रणेंतर्गत येणा‍ऱ्या १०० अब्ज रुपयांच्या प्रकल्पांना फटका बसणार आहे.
  • चीनने अर्थ पुरवठा थांबवल्याने डेरा इस्लाइल खान-झोब रोड, खुजदार-बसिमा रोड, रायकोटपासून थाकोटला जाणारा काराकोरम महामार्ग हे तीन मोठे प्रकल्प रखडणार आहेत.
  • चीनने नवी मार्गदर्शक तत्त्वे व नियमावली जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांसाठी पुन्हा निधी दिला जाणार आहे.
  • सीपीईसी हा चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना ‘वन बेल्ट वन रोड’चा (ओबीओआर) महत्त्वपूर्ण भाग आहे.
  • पाकव्याप्त काश्मीरमधून जाणारा हा प्रकल्प बलुचिस्तान आणि चीनच्या शिनजियांग प्रांताला जोडणार आहे. या माध्यमातून पश्चिम चीनला अरबी सुमद्राला जोडण्याचा चीनचा प्रयत्न आहे.
  • सीपीईसीसाठी ६० अब्ज डॉलर खर्च केले जाणार असून, यामुळे पाकिस्तानमध्ये सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे विविध प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत.
  • परंतु आता चीनने आर्थिक रसद रोखल्याने पाकिस्तानच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा वेग मंदावणार आहे.
  • हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्यामुळे चीनच्या या योजनेला भारताने आधीपासूनच विरोध केला आहे.

दिवाळखोर कंपन्या खरेदी करण्यावर निर्बंध

  • बँकेच्या बुडीत कर्जामुळे दिवाळखोरीत निघालेल्या कुटुंबातील मालकांच्या कंपन्या खरेदी करण्यावर निर्बंध आणणारा वटहुकुम केंद्र सरकारने जारी केला आहे.
  • या वटहुकुमानुसार, भाऊ, जवळचे नातेवाईक, सहकारी यांच्या दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्या मोठ्या कंपन्यांना खरेदी करता येणार नाहीत.
  • या निर्णयाचा फटका साजन जिंदाल, मुकेश अंबानी, एल.के. मित्तल यासारख्या मातब्बर उद्योगपतींनाही बसला आहे.
  • तसेच कंपनी कायदा २०१३ अंतर्गत अपात्र ठरलेल्या संचालकांनादेखील अशी दिवाळखोरीत निघालेली कंपनी खरेदी करता येणार नाही.
  • अशा या निर्णयांमुळे मोदी सरकारने देशातील किमान तीन लाख कंपन्या व त्यांचे पाच ते सहा लाख संचालक अपात्र ठरवले आहेत.
  • हे कोणीच आता बुडीत कर्जामुळे दिवाळखोरीत निघालेल्या ५०० कंपन्या या वटहुकुमामुळे खरेदी करू शकणार नाहीत.
  • याशिवाय दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेचा गुन्हा केलेली व्यक्ती (शिक्षा झाली नसली तरी) दोषी असल्यास तिलाही या कंपन्या खरेदी करता येणार नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा