चालू घडामोडी : १३ व १४ जानेवारी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौऱ्यावर

  • इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले. दिल्ली विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांची गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले.
  • भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
  • भारतातील आपल्या सहा दिवसांच्या दौऱ्यादरम्यान नेतन्याहू दिल्ली, आग्रा, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांना भेटी देणार आहेत.
  • मोदींनी त्यांना खास भेट म्हणून दिल्लीतील तीन मूर्ती चौकाचे नामकरण केले आहे. आता हा चौक 'तीन मूर्ती हायफा मार्ग' म्हणून ओळखला जाणार आहे. 
  • पहिल्या जागतिक युद्धात (१९१४-१९१८) दरम्यान भारतीय जवानांनी आपले शौर्य दाखवित इस्रायलचे हायफा शहर स्वतंत्र केले होते.
  • जोधपूर, हैदराबाद, म्हैसूर येथील जवान युद्धासाठी इस्रायलला गेले होते. या युद्धात ४४ भारतीय जवानांना आपला प्राण गमवावा लागला होता. 
  • युद्धानंतर या जवानांच्या नावाने दिल्लीत ‘तीन मूर्ती चौक’ असे नामकरण करण्यात आले होते. परंतु आता त्याचे नाव बदलून मोदींनी ‘तीन मूर्ती हाइफा मार्ग’ असे केले आहे.
  • बेंजामीन नेतान्याहू, त्यांची पत्नी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन मूर्ती हायफा चौक येथे जाऊन या शहिदांना आदरांजली वाहिली.
  • या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृषी, पाणी संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच अंतराळ सुरक्षेसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात इस्रायलच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
  • यापूर्वी २००३मध्ये एनडीए सरकारच्या काळात इस्रायचे तत्कालिन पंतप्रधान एरियल शेरॉन भारत भेटीवर आले होते.

साहित्यिक महाश्वेतादेवी यांना गुगलकडून डुडलद्वारे अभिवादन

  • साहित्यक्षेत्रात आपल्या लेखनशैलीचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या लेखिका महाश्वेतादेवी यांच्या जयंतीनिमित्त गुगल सर्च इंजिनने त्यांना डुडलद्वारे अभिवादन केले आहे.
  • १४ जानेवारी १९२६ रोजी महाश्वेतादेवींचा जन्म आता बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये झाला.
  • त्यांच्या आईचे नाव धरित्री देवी आणि वडिलांचे नाव मनिष घटक असे होते. हे दोघेही साहित्यिक होते. त्यांच्याकडूनच महाश्वेतादेवींना लेखनाचे धडे मिळले.
  • भारताची फाळणी झाली तेव्हा त्यांचे कुटुंब पश्चिम बंगालमध्ये आले. महाश्वेता देवी यांनी विश्वभारती विद्यापीठ आणि शांतीनिकेतन मधून इंग्रजी विषय घेऊन बी.ए. केले. तर कोलकाता विद्यापीठातून एम.ए. केले.
  • शिक्षिका आणि पत्रकार म्हणून महाश्वेतादेवींनी दीर्घकाळ काम केले. १९४२मध्ये झालेल्या भारत छोडो आंदोलनाचा महाश्वेता देवींच्या आयुष्यावर प्रभाव पडला. 
  • लहानपणापासूनच त्यांना लेखनाची आवड होती. त्यांनी त्यांच्या लेखनाची सुरुवात काही लघूकथांद्वारे केली.
  • त्यानंतर १९४३मध्ये दुष्काळ पडला. त्यादरम्यान समाजसेवेचे व्रत महाश्वेतादेवींनी हाती घेतले ते अखेर पर्यंत सोडले नाही.
  • महाश्वेता देवी यांचे पहिले पुस्तक १९५६मध्ये प्रकाशित झाले. ‘झांसी की रानी’ असे या पुस्तकाचे नाव होते.
  • रुदाली, हजार चौरासी की माँ, माटी माई या त्यांच्या पुस्तकांवर सिनेमांचीही निर्मिती करण्यात आली.
  • ‘अरण्येर अधिकार’ या पुस्तकातून महाश्वेतादेवी यांनी समाजातील शोषण आणि त्यावर होणारा विद्रोह यावर लिखाण केले.
  • बिरसा मुंडा येथे ब्रिटिश काळात झालेल्या संघर्षाचे वर्णन या पुस्तकात होते. या पुस्तकासाठी त्यांना १९७९मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • आपल्या लेखनाने समाजातील अन्यायावर भाष्य करणाऱ्या आणि शोषितांचे दुःख मांडणाऱ्या महाश्वेतादेवी यांनी १००पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले.
  • वयाच्या ९०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदी साहित्य, बंगाली साहित्यविश्वात त्यांची कारकीर्द अजरामर ठरली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा