चालू घडामोडी : ७ फेब्रुवारी

झुलन गोस्वामी २०० बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज

  • भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी महिला वन-डे क्रिकेटमध्ये २०० बळी मिळवणारी पहिली महिला गोलंदाज ठरली आहे.
  • दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्टला झेलबाद करत झुलनने वन-डे क्रिकेटमधला आपला २०० वा बळी टिपला.
  • २०११ साली न्यूझीलंडविरुद्ध खेळताना झुलनने ३२ धावांत ६ बळी घेतले होते. ही तिच्या कारकिर्दीतली आतापर्यंची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे.
  • सध्या सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत झुलन गोस्वामी २०० बळींसह आघाडीवर आहे.
  • यानंतर ऑस्ट्रेलियाची कॅथरिन फिट्झपॅट्रीक दुसऱ्या (१८० बळी) आणि ऑस्ट्रेलियाचीच लिसा स्थळेकर (१४६ बळी) तिसऱ्या स्थानावर आहे.
  • त्याखालोखाल चौथा स्थानी वेस्ट इंडिजची अनिसा मोहम्मद (१४५ बळी) आणि पाचव्या स्थानी भारताची नितू डेव्हीड (१४१ बळी) आहेत.

सुमिता मित्रा यांचा ‘यूएस नॅशनल इनव्हेन्टर्स हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश


  • भारतीय वंशाच्या कल्पक वैज्ञानिक सुमिता मित्रा यांचा अमेरिकेत ‘यूएस नॅशनल इनव्हेन्टर्स हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
  • एकंदर ९८ पेटंट सुमिता मित्रा यांच्या नावावर आहेत. अमेरिकन केमिकल सोसायटीत त्या विज्ञान प्रशिक्षक होत्या.
  • गेली तीन दशके रसायनशास्त्रातील ज्ञानाचा वापर त्यांनी मानवी कल्याणासाठी केला आहे. दातांचे आरोग्य व सौंदर्य टिकवण्यासाठी त्यांनी नॅनोकणांवर आधारित दंतभरण (नॅनो डेंटल फिलर्स) पदार्थ तयार केले.
  • त्यांनी जे दंतभरण तयार केले आहे त्याचे नाव फिलटेक असून, त्याचे रीतसर व्यापारचिन्हही घेण्यात आले आहे. थ्री एम ओरल केअरमध्ये काम करताना त्यांनी हे दंतभरण तयार करण्यात यश मिळवले.
  • त्यांनी अनेक दंत उत्पादने तयार केली असून, त्यांनी तयार केलेली दंतभरणे भक्कम असल्याने दंतरोगतज्ज्ञांकडे वारंवार जाण्याची वेळ येत नाही.
  • त्यांच्या या संशोधनाने थ्री एम कंपनीला दोन अब्ज डॉलर्सचा फायदा झाला हेही एक व्यावसायिक यश आहे.
  • मित्रा या मूळ पश्चिम बंगालच्या असून, कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी रसायनशास्त्रात बीएस्सी पदवी घेतली. कार्बनी रसायनशास्त्रात त्यांनी कोलकाता विद्यापीठातून एमएस्सी पदवी घेतली.
  • उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. तेथे त्यांनी मिशिगन विद्यापीठातून कार्बनी व बहुवारिक रसायनशास्त्रात पीएचडी केली.
  • थ्री एम कंपनीतील ३० वर्षांच्या सेवेनंतर २०१०मध्ये त्या निवृत्त झाल्या, आता त्या मित्रा केमिकल कन्सलटन्सी ही कंपनी त्यांच्या पतीसह चालवतात.
  • सुमिता यांनी एकूण १२० शोधनिबंध लिहिले आहेत. २००९मध्ये त्यांना हिरोज ऑफ केमिस्ट्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा