चालू घडामोडी : ७ एप्रिल

वेणुगोपाल धूत आणि कोचर दाम्प्त्यांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

  • सीबीआयने व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्यासमवेत आयसीआयसीआय बँकेच्या मुख्याधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
  • एखाद्या संशयित व्यक्तीला देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी तपास यंत्रणांकडून विमानतळ इमिग्रेशन विभागाला लुकआऊट नोटीस पाठवली जाते.
  • चंदा कोचर यांचे पती दीपक आणि व्हिडीओकॉनचे प्रमुख धूत यांनी वर्ष २००८ मध्ये ५०-५० टक्के भागिदारीत न्यूपॉवर रिन्यूएबल्स प्रा.लि.ची (एनआरपीएल) स्थापना केली होती.
  • परंतु, धूत यांनी एक महिन्यानंतर कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आणि यातील आपले भाग दीपक यांच्या नावावर हस्तांतरित केले.
  • त्यानंतर २०१०मध्ये धूत यांच्या मालकीच्या सुप्रीम एनर्जी प्रा.लि.ने एनआरपीएलला ६४ कोटी रूपयांचे कर्ज दिले. त्याबदल्यात न्यूपॉवरचे भाग सुप्रीम एनर्जीच्या नावे हस्तांतरित करण्यात आले.
  • सुप्रीम एनर्जी मार्च २०१०पर्यंत न्यूपॉवरमध्ये ९४.९९ टक्क्यांची भागीदार होती. उर्वरित ४.९९ टक्के भाग दीपक यांच्याकडे राहिली. 
  • वर्ष २०१० ते २०१३ दरम्यान सुप्रीम एनर्जीचे संपूर्ण भाग आधी महेश पुंगलिया यांना आणि नंतर दीपक यांच्या मालकीच्या एका ट्रस्टला नऊ लाखात हस्तांतरित करण्यात आले.
  • याचदरम्यान २०१२मध्ये व्हिडीओकॉनला आयसीआयसीआयबँकेने ३२५० कोटी रूपयांचे कर्ज मंजूर केले होते. यामध्ये २८४९ कर्ज अजूनही थकीत आहे. आता हे कर्ज एनपीएमध्ये गेल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षा भ्रष्टाचार प्रकरणात दोषी

  • दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षा पार्क ग्यून यांना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असून त्यांना २४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
  • पार्क ग्युन या दक्षिण कोरियाच्या पहिला महिला अध्यक्षा होत्या. त्या लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या देखील पहिल्या राष्ट्राध्यक्ष होत्या.
  • लाच घेतल्याचा आणि पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपांमुळे त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि जनक्षोभाचाही सामना करावा लागला होता.
  • मार्च २०१७मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. पार्क यांच्यावर लाच घेणे, सत्तेचा दुरुपयोग करण्यासह भ्रष्टाचाराच्या १६ प्रकरणांचा ठपका होता. त्यात त्या दोषी आढळून आल्या आहेत.
  • पार्क यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत, या खटल्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता.
  • राष्ट्राध्यक्ष पदावर असताना अधिकाराचा गैरवापर केल्याचा व फौजदारी गुन्ह्याखाली दोषी आढळून येणाऱ्या पार्क दक्षिण कोरियाच्या तिसऱ्या राष्ट्रप्रमुख ठरल्या आहेत.
  • यापूर्वी चून डू वॉन, रोन टे वू यांनाही भ्रष्टाचार व देशविरोधी कारवायांमुळे १९९० च्या दशकात दोषी ठरवण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा