चालू घडामोडी : ११ मे

माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या

  • राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आपल्या दीर्घ आजाराला कंटाळून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
  • फिटनेसवर प्रचंड भर देणारे हिमांशू रॉय यांना हाडांचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती.
  • अमेरिकेत जाऊन त्यांनी उपचारही घेतले होते. त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत होती. त्यामुळेच त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली.
  • गुन्हे विभागामध्ये काम करताना सगळ्यांना जपणारा, सहकाऱ्यांना मोकळिक देणारा व बॉडी बिल्डर ऑफिसर अशी हिमांशू रॉय यांची ओळख होती.
  • १९८८च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी होते. सेंट झेविअर्स या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले.
  • त्यांनी दहशतवादापासून ते खूनाच्या गंभीर गुन्ह्याची संवेदनशील प्रकरणे हाताळली होती. मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून रॉय यांची कारर्किद अत्यंत यशस्वी ठरली होती. त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली होती.
  • २०१३मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी त्यांच्या तपासामुळेच विंदू दारा सिंगला अटक झाली होती.
  • पत्रकार जे डे हत्या प्रकरणातील तपासात हिमांशू रॉय यांचा मोठा वाटा होता. याशिवाय अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीही हिमांशू रॉय यांच्याच नेतृत्त्वात झाली होती.
  • २०१४साली मुंबईच तत्कालिन पोलीस आयुक्त राकेश मारीया यांच्यासह हिमांशू रॉय यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळालेले ते मुंबई पोलीस दलातील पहिले अधिकारी होते. 
 झेड प्लस सिक्युरिटी 
  • राज्यांचे मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कॅबिनेट मंत्र्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाते.
  • झेड प्लस टीममध्ये ३६ पोलिसांचा समावेश होतो. कार्यालय, घर अशा ठिकाणी या पोलिसांची तैनाती केली जाते.
  • सतत २४ तास हे पोलीस सुरक्षेसाठी सोबत असतात. झेड प्लस सुरक्षा असणाऱ्यांना बुलेटप्रूफ गाडी दिली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेपाळ दौरा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११ व १२ मे रोजी दोन दिवसीय नेपाळ दौरा पाडला. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या निमंत्रणावरुन मोदी नेपाळला गेले होते.
  • या दोन दिवसीय दौऱ्यात मोदींनी तीन तीर्थस्थळांना भेटी दिल्या तसेच एका प्रकल्पाचे भूमिपूजनही केले. याशिवाय दोन्ही देशांमध्ये महत्वाचे करारही करण्यात आले.
  • पंतप्रधानपदी आल्यापासून मोदी यांची गेल्या ४ वर्षातील ही तिसरी नेपाळ भेट आहे. तसेच नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भारताकडून प्रथमच हा उच्च स्तरीय दौरा होता.
  • भारत आणि नेपाळमध्ये प्राचीन काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत. रणनितीक दृष्टीकोनातून नेपाळ भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे पण अलीकडच्या काळात नेपाळवर चीनचा प्रभाव वाढू लागला आहे.
  • तसेच दोन वर्षांपुर्वी मधेसी समुदायाच्या निदर्शनांनंतर तयार झालेल्या कोंडीनंतर दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आणि तणावाचे प्रसंग निर्माण झाले होते.
  • त्यामुळे भारत-नेपाळ संबंध अधिक दृढ करणे हा मोदींच्या दौऱ्यामागचा महत्वाचा उद्देश होता.
  • या भेटीदरम्यान नेपाळ आणि भारत यांच्यामध्ये रेल्वेमार्ग, अंतर्गत जलवाहतुक, कृषीविषयक मुद्दे, पंचेश्वर बहुउद्देशिय धरण प्रकल्प यावर चर्चा झाली.
  • सीतेचे माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनकपूरच्या जानकी मंदिरात मोदी यांनी पूजाही केली, तसेच त्यांनी राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांचीही भेट घेतली.
 जनकपूर-अयोध्या बससेवेचे उद्धाटन 
  • या दौऱ्यात नेपाळमधले सीतेचे जन्मगाव जनकपूर ते उत्तर प्रदेशातील रामाचे जन्मस्थान अयोध्या या मार्गावर बससेवेचे उद्धाटन नरेंद्र मोदी व केपी शर्मा ओली यांच्या उपस्थितीत झाले.
  • रामायण सर्किट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थळांना जोडणारी धार्मिक पर्यटन अशी ही कल्पना असून तिचे उद्घाटन मोदींनी केले.
  • अयोध्या, नंदीग्राम, श्रींगवेरपूर, नंदिग्राम, महेंद्रगिरी, नाशिक, नागपूर, रामेश्वरम, हम्पी आणि चित्रकूटसारख्या १५ ऐतिहासिक स्थळांचा समावेश या रामायण सर्किटमध्ये असेल.
 अरुण ३ प्रकल्पाची पायाभरणी 
  • या दौऱ्यात नरेंद्र मोदी आणि के पी शर्मा ओली यांनी अरुण ३ या प्रकल्पाची पायाभरणी केली.
  • ९०० मेगावॅट ऊर्जा निर्मितीच्या क्षमतेचा हा प्रकल्प संखुवासभा या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येत आहे.
  • हा प्रकल्प तयार होण्यास ५ वर्षांचा कालावधी जाईल आणि त्यासाठी ६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि नेपाळला वीज मिळणार आहे.
  • नेपाळने नुकताच चीनला बुधी-गंडकी हायड्रोइलेक्टीकल प्रोजेक्ट या २.३ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या प्रकल्पाला नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा