प्रश्नसंच ३५ - [चालू घडामोडी]

[प्र.१] किती रुपयांच्या प्लास्टिकच्या चलनी नोटा RBI लवकरच व्यवहारात आणणार आहे?
१] १० रु.
२] १०० रु
३] २० रु
४] ५० रु

उत्तर
१] १० रु.
----------------
[प्र.२] नुकतीच कोणत्या क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद ११ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला?
१] महेला जयवर्धने
२] महेंद्रसिंग धोनी
३] विराट कोहली
४] कुमार संगाकारा

उत्तर
४] कुमार संगाकारा
----------------
 [प्र.३] कोणत्या सोशल नेट्वर्किंग साईटला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली?
१] ओर्कुट
२] फेसबुक
३] ट्विटर
४] फ्लिकर  

उत्तर
२] फेसबुक
----------------
[प्र.४] डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली?
१] १९५६
२] १९५७
३] १९५८
४] १९५९

उत्तर
३] १९५८
----------------
[प्र.५] सध्या जागृत असलेला तुंगराहुआ  ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?
१] इक्वेडोर
२] इटली
३] जपान
४] लातीव्हीया

उत्तर
१] इक्वेडोर
----------------
[प्र.६] भारताने नुकताच कोणत्या देशाबरोबर ग्रीन एनर्जी कॉरीडॉरबाबतचा करार केला?
१] अमेरिका
२] रशिया
३] जर्मनी
४] मलेशिया

उत्तर
३] जर्मनी
----------------
[प्र.७] नोव्हेंबर २०१३ मध्ये ब्युबॉनिक प्लेगच्या साथीमुळे ३२ लोकांचा मृत्यू कोणत्या देशात झाला?
१] मादागास्कर
२] नायजेरिया
३] अल्जेरिया
४] सोमालिया

उत्तर
१] मादागास्कर
----------------
[प्र.८] महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने नुकतीच 'इको सेन्सेटिव्ह झोन' म्हणून मंजुरी दिली?
१] मेळघाट
२] ताडोबा
३] सह्याद्री
४] पेंच

उत्तर
२] ताडोबा
'इको सेन्सेटिव्ह झोन'चा दर्जा मिळविणारा ताडोबा हा राज्यातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे.आता या प्रकल्पाच्या १० किमी परिघातील वीज-खाण प्रकाल्पांसारख्या मानवी हस्तक्षेपांवर बंदी येणार आहे.

----------------
[प्र.९] ५ जानेवारी २०१४ रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या 'जीसॅट-१४' उपग्रहाबाबत योग्य विधाने ओळखा.
अ]  या उपग्रहाचे प्रक्षेपण GSLV-D5 या प्रक्षेपकाद्वारे करण्यात आले.
ब]  यासाठी संपूर्ण देशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला होता.
क]  'जीसॅट-१४' हा उपग्रह 'जीसॅट-५' या उपग्रहाला पर्याय ठरणार असून त्याची जागा घेणार आहे.

१] अ आणि ब योग्य
२] ब आणि क योग्य
३] अ आणि क योग्य
४] वरील सर्व योग्य

उत्तर
१] अ आणि ब योग्य
'जीसॅट-१४' हा उपग्रह 'जीसॅट-३' या उपग्रहाला पर्याय ठरणार असून त्याची जागा घेणार आहे.

----------------
[प्र.१०] २०१४ या वर्षात RBI १० रुपयांच्या प्लास्टिकच्या १ अब्ज नोटा पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर व्यवहारात आणणार आहे. खालीलपैकी कोणते शहर त्या पाच शहरांपैकी नाही?
१] मुंबई
२] कोची
३] म्हैसूर
४] जयपूर

उत्तर
१] मुंबई
२०१४ या वर्षात RBI १० रुपयांच्या प्लास्टिकच्या १ अब्ज नोटा कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर व्यवहारात आणणार आहे. या नोटांचे सरासरी आयुर्मान ५ वर्षाचे असेल व या नोटांची नक्कल करणे कठीण असेल.

-------------------------------------------------------------