प्रश्नसंच ३६ - [राज्यघटना]

-------------------------------------------------------------
[प्र.१] राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हि दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास राष्ट्रपती म्हणून कोण काम पाहतो?
१] पंतप्रधान
२] लोकसभा सभापती
३] सरन्यायाधीश
४] महालेखापाल

उत्तर
३] सरन्यायाधीश
------------------
[प्र.२] स्वातंत्र्य, समता, बंधुता या सरनाम्यातील तत्वांमागची प्रेरणा कोणती आहे?
१] अमेरिकन राज्यक्रांती
२] आयरिश राज्यक्रांती
३] रशियन राज्यक्रांती
४] फ्रेंच राज्यक्रांती

उत्तर
४] फ्रेंच राज्यक्रांती
------------------
[प्र.३] राज्यसभेचे सदस्य कशाप्रकारे निवडले जातात?
१] लोकांकडून
२] विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून
३] विधान परिषदेच्या सदस्यांकडून
४] यापैकी नाही

उत्तर
२] विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून
------------------
[प्र.४] राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क बहाल करण्यात आला आहे?
१] १२ ते १४
२] २१ ते २४
३] २५ ते २८
४] २९ ते ३०

उत्तर
३] २५ ते २८
------------------
[प्र.५] खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
१] लोकसभा सभापतींकडून विसर्जित केली जाते.
२] राज्यसभेचा कालावधी ६ वर्षे असतो.
३] धनविधेयक राज्यसभेत प्रथम मांडले जाते.
४] राज्यसभेचे १/३ सदस्य दर २ वर्षांनी निवृत्त होतात.

उत्तर
४] राज्यसभेचे १/३ सदस्य दर २ वर्षांनी निवृत्त होतात.
------------------
[प्र.६] लोकसभा सभापतीची निवड कोण करते?
१] राष्ट्रपती
२] पंतप्रधान
३] संसद सदस्य
४] लोकसभा सदस्य

उत्तर
४] लोकसभा सदस्य
------------------
[प्र.७] घटनेच्या सरनाम्यातून खालीलपैकी काय दिसून येते?
अ] साध्य करावयाचे स्त्रोत
ब] शासन व्यवस्था
क] सत्तेचा स्त्रोत

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ आणि ब
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
 [प्र.८] विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी किती वाचन अवस्थांमधून जावे लागते?
१] तीन
२] चार
३] पाच
४] दोन

उत्तर
१] तीन
------------------
[प्र.९] लोकसभेची लोकनिर्वाचित सदस्यसंख्या जास्तीत जास्त किती असू शकते?
१] ५४५
२] ५५०
३] ५५२
४] ५४३

उत्तर
२] ५५०
------------------
[प्र.१०] खालीलपैकी राज्यांचा अस्तित्वात येण्याचा योग्य क्रम लावा.
१] सिक्कीम-अरुणाचल प्रदेश-नागलॅंड-हरियाणा
२] सिक्कीम-हरियाणा-नागलॅंड-अरुणाचल प्रदेश
३] नागलॅंड-हरियाणा-सिक्कीम-अरुणाचल प्रदेश
४] हरियाणा-सिक्कीम-अरुणाचल प्रदेश-नागलॅंड

उत्तर
३] नागलॅंड-हरियाणा-सिक्कीम-अरुणाचल प्रदेश
-------------------------------------------------------------