प्रश्नसंच ४३ - [इतिहास]

[प्र.१] १९४०च्या 'ऑगस्ट प्रस्तावा'नुसार काय तरतुदी सादर करण्यात आल्या?
१] भारताला टप्प्यांमध्ये स्वातंत्र्य देणे.
२] वसाहतींचे स्वातंत्र्य
३] प्रांतिक स्वायत्तता
४] केंद्रात प्रातिनिधिक सरकार

उत्तर
२] वसाहतींचे स्वातंत्र्य
------------------
[प्र.२] कोणत्या कायद्याने बर्मा [म्यानमार] भारतापासून वेगळे करण्यात आले?
१] १९०९ मोर्ले मिंटो कायदा
२] १९१९ भारत सरकार कायदा
३] १९३५ भारत सरकार कायदा
४] १९४७ भारत स्वातंत्र्याचा कायदा

उत्तर
३] १९३५ भारत सरकार कायदा
------------------
[प्र.३] खालीलपैकी कोणी रेडशर्टस संघटना स्थापन केली?
१] खान अब्दुल गफार खान
२] भगत सिंग
३] राजगुरू
४] सूर्यसेन

उत्तर
१] खान अब्दुल गफार खान
------------------
[प्र.४] १८५७ च्या उठावात मणिराम देवण याने कोणत्या भागात नेतृत्व केले?
१] दक्षिण भारत
२] आसाम
३] ओरिसा
४] बंगाल

उत्तर
२] आसाम
------------------
[प्र.५] ऑक्टोबर १९४३ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी अरजी-हुकुमत-ए-हिंद कोठे स्थापन केली?
१] जपान
२] जर्मनी
३] सिंगापूर
४] रंगून

उत्तर
३] सिंगापूर
------------------
[प्र.६] महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली गुजरात सभेने खालीलपैकी कशामध्ये प्रमुख भूमिका निभावली?
१] भटमाद्ची गिरणी कामगार आंदोलन
२] खेडा चळवळ
३] बार्डोली चळवळ
४] मीठ सत्याग्रह

उत्तर
२] खेडा चळवळ
------------------
[प्र.७] घटना कालानुक्रमे लावा.
अ] रौलेट कायदा असंतोष
ब] खेडा सत्याग्रह
क] चंपारण्य लढा
ड] अहमदाबाद गिरणी कामगार आंदोलन

१] क-ब-अ-ड
२] क-ब-ड-अ
३] ब-क-अ-ड
४] क-ड-ब-अ

उत्तर
२] क-ब-ड-अ
------------------
 [प्र.८] असहकार चळवळीचा भाग म्हणून जंगल सत्याग्रहाची चळवळ पुढीलपैकी कोठे सुरु झाली?
१] ओरिसा, महाराष्ट्र
२] मद्रास, बंगाल, महाराष्ट्र
३] कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रांत
४] केरळ, गुजरात, आसाम

उत्तर
३] कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रांत
------------------
[प्र.९] पुढीलपैकी कोणत्या स्वातंत्र्यसैनिकांना लॉर्ड हार्डींग्जवर बॉम्ब फेकल्याप्रकरणी शिक्षा झाली?
अ] अमीरचंद
ब] अवध बेहरी
क] बालमुकुंद
ड] वसंतकुमार विश्वास

१] अ आणि ब
२] ब, क आणि ड
३] अ, क आणि ड
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.१०] १८८० साली स्थापन झालेल्या स्ट्रॅची आयोगाने दुष्काळ निवारणाकरिता केलेल्या शिफारशींपैकी चुकीची शिफारस ओळखा.
अ] उपासमारीला तोंड देण्यापूर्वीच लोकांना काम दिले जावे व वेळोवेळी त्यांची मजुरी पूर्वनिर्धारित केली जावी.
ब] जोपर्यंत संपूर्ण देशाची अन्नधान्याची स्थिती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत अन्नधान्य निर्यात करू नये.
क] दुष्काळ मदतीचा संपूर्ण भार केंद्राने उचलावा.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] फक्त क
४] एकही नाही.

उत्तर
३] फक्त क
-------------------------------------------------------------