प्रश्नसंच ५२ - [इतिहास]

[प्र.१] 'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा व सेवाभाव धरा’ असे कोणी म्हटले आहे?
१] विनोबा भावे
२] पंजाबराव देशमुख
३] महात्मा फुले
४] वि.रा.शिंदे

उत्तर
२] पंजाबराव देशमुख
------------------
[प्र.२] डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल अयोग्य विधान ओळखा.
१] ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले.
२] १९५२ ते १९६२ या दरम्यान ते अर्थमंत्री होते.
३] ते भारताचे पहिले कृषीमंत्री होते.
४] १९५५ मध्ये त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली.

उत्तर
२] १९५२ ते १९६२ या दरम्यान ते अर्थमंत्री होते.
------------------
[प्र.३] 'वैदिक वाङ्ग्मयातील धर्माचा उद्ग२म आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख यांना कोणत्या विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली?
१] कोलंबिया
२] ऑक्सफर्ड
३] एडीम्बरो
४] मराठवाडा

उत्तर
१] कोलंबिया
------------------
[प्र.४] महात्मा फुलेंवर कोणत्या संस्कृत ग्रंथाचा प्रभाव होता?
१] वज्रसुची
२] मनुस्मृती
३] भगवतगीता
४] वज्रापती

उत्तर
१] वज्रसुची
------------------
[प्र.५] महात्मा फुलेंनी पुण्यात पहिला पुनर्विवाह कधी घडवून आणला?
१] १८५८
२] १८५९
३] १८६०
४] १८६१

उत्तर
३] १८६०
------------------
[प्र.६] 'महाराष्ट्राला पुढील ५ हजार वर्षात मुंबई मिळणार नाही' हे उद्गार कोणाचे?
१] मोरारजी देसाई
२] स.का.पाटील
३] पा.वा.गाडगीळ
४] एस.एम.जोशी

उत्तर
२] स.का.पाटील
------------------
[प्र.७] पानिपत युद्धामध्ये मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवून दिली?
१] राघोबादादा
२] माधवराव पेशवे
३] दुसरा बाजीराव
४] नानासाहेब

उत्तर
२] माधवराव पेशवे
------------------
[प्र.८] अयोग्य विधाने ओळखा.
अ] व्ही.डी.देशपांडे यांनी १९५२ मध्ये 'संयुक्त महाराष्ट्र' साप्ताहिकात मुंबईसह महाराष्ट्राची मागणी केली होती.
ब] फाझल अली कमिशनने आपल्या अहवालात स्वतंत्र तेलंगणा आणि स्वतंत्र विदर्भाची शिफारस केली होती.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ व ब दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
४] एकही नाही
------------------
[प्र.९] महात्मा फुले यांनी नभिकाञ्चा संप कोठे घडवून आणला?
अ] तळेगाव
ब] हडपसर
क] ओतूर

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
३] अ आणि क
------------------
[प्र.१०] रणांगण या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?
१] शिवाजी सावंत
२] विश्राम बेडेकर
३] चिंतामणराव कोल्हटकर
४] दिनानाथ जोशी

उत्तर
२] विश्राम बेडेकर
-------------------------------------------------------------