प्रश्नसंच ५३ - [भूगोल]

[प्र.१] आक्राणी टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आहेत?
१] सातपुडा
२] गाविलगढ
३] सातमाळा
४] दरकेसा

उत्तर
१] सातपुडा
------------------
[प्र.२] महाराष्ट्रात सर्वाधिक तिळाची लागवड कोठे केली जाते?
१] औरंगाबाद
२] जळगाव
३] नाशिक
४] धुळे

उत्तर
२] जळगाव
------------------
[प्र.३] सुवर्णदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे?
१] सागरी
२] भुईकोट
३] घाटमाथा
४] डोंगरमाथा

उत्तर
१] सागरी
------------------
[प्र.४] महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वाधिक सापेक्ष आद्रतेचे प्रमाण कोठे असते?
१] उत्तर महाराष्ट्र
२] नागपूर
३] कोकण
४] मराठवाडा

उत्तर
३] कोकण
------------------
[प्र.५] कोकणात उंचीवरील प्रदेशातील जांभा जमिनीवर कोणती अरण्ये आढळतात?
१] उप-समशीतोष्ण
२] समशीतोष्ण
३] वर्षारण्ये
४] पानझडी

उत्तर
३] वर्षारण्ये
------------------
[प्र.६] सुरजागड डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत?
१] नागपूर
२] चंद्रपूर
३] गोंदिया
४] गडचिरोली

उत्तर
४] गडचिरोली
------------------
[प्र.७] खालीलपैकी कोठे तांदूळ संशोधन केंद्र आहे?
१] नाशिक
२] गोंदिया
३] खोपोली
४] दापोली

उत्तर
३] खोपोली
------------------
[प्र.८] अयोग्य विधाने ओळखा.
अ] मध्यप्रदेशात सातमाळा पर्वतरांगांमध्ये तापी नदी उगम पावते.
ब] तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] अ व ब दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
[मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये तापी नदी उगम पावते.]

------------------
[प्र.९] 'अल्लापल्ली अरण्ये' खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात?
१] आंध्रप्रदेश सीमेवर
२] गडचिरोली
३] विदर्भ
४] सिंधुदुर्ग

उत्तर
३] विदर्भ
------------------
[प्र.१०] महाराष्ट्रात प्रमुख खनिजांच्या उत्खननासाठी एकूण किती खनिजपट्टे आहेत?
१] २००
२] ८५
३] २८५
४] ५५

उत्तर
३] २८५
-------------------------------------------------------------